Eye shape and color: डोळ्यांचा आकार आणि रंग सांगतो बरंच काही... पाहा तुमच्याबद्दल काय आहे खास... 

Eye Palmistry in marathi: समुद्रशास्त्रात मनुष्याच्या शरीराच्या संरचनेवरुन त्याचा स्वभाव आणि व्यक्तीमत्त्व याच्या बद्दल खूप माहिती मिळवली जाऊ शकते. तसेच डोळ्यांच्या आकार आणि रंगावरुनही बरंच काही समजते. 

our eye shape color tells many things about life relation and behaviour palmistry read in marathi
Eye shape and color: डोळ्यांचा आकार आणि रंग सांगतो बरंच काही... पाहा तुमच्याबद्दल काय आहे खास... (प्रातिनिधिक फोटो) 
थोडं पण कामाचं
  • डोळ्यांच्या आकार आणि रंगावरुन ओळखा समोरील व्यक्तीचे व्यक्तीमत्व 
  • डोळ्यांचा रंग आणि आकार सांगतो मनुष्याच्या संदर्भात खूप काही गोष्टी 

Eye color and shape: अनेक व्यक्तींचा स्वभाव हा त्यांच्यासोबत राहिल्यानंतरही बहुतेक वेळा कळत नाही. अनेकदा असंही म्हटलं जातं की, माणूस आपल्या तोंडाने न सांगणाऱ्या अनेक गोष्टी त्याच्या नजरेतून सांगतो. डोळे इतके प्रभावशाली असतात की, अनेकदा मनुष्याच्या मनात काय सुरू आहे हे त्याच्या डोळ्यांकडे पाहूनच आपण ओळखू शकतो. समुद्रशास्त्रात मनुष्याच्या डोळ्यांवरुन त्याच्या स्वभावाच्या संदर्भातील बऱ्याच गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. पाहूयात याच संदर्भात काही माहिती. (our eye shape color tells many things about life relation and behavior palmistry read in marathi)

मोठे डोळे

समुद्रशास्त्रानुसार, ज्या लोकांचे डोळे मोठे असतात असे लोक खूप नम्र आणि चांगल्या मनाचे तसेच दयाळू असतात. या व्यक्तींमध्ये इतरांच्या भावना समजण्याची क्षमता असते. यासोबतच ते खूप नशीबवान असतात आणि बुद्धीमानही असतात.

लहान डोळे

अनेकांचे डोळे हे फार लहान असतात असं तुम्ही पाहिलं असेल. लहान डोळे असलेल्या व्यक्ती फार धाडस करत नाहीत. अशा व्यक्तींना राग जास्त येतो. तसेच विविध गोष्टींबाबत ते खूपच उत्साही असतात. ही लोक आपल्या भविष्याच्या संदर्भात जास्त विचार करत नाहीत तर वर्तमानाबाबत अधिक विचार करतात.

अधिक वाचा : वयाच्या 13व्या वर्षी करिना 'याच्या' प्रेमात झाली होती वेडी​

गोल डोळे

ज्या व्यक्तींचे डोळे गोल असतात अशा लोकांना फिरायला भरपूर आवडते. संधी मिळताच असे व्यक्ती कुठल्या ना कुठल्या कारणावरुन फिरायला निघतात. या व्यक्तींना जगभरातील विविध माहिती मिळवण्याची इच्छा असते. त्यामुळेच ते लांबचा प्रवास करण्यास पसंती देतात.

खोल डोळे

लाल रंग आणि चमकणाऱ्या निखाऱ्या सारखे डोळे असलेल्या व्यक्तींना प्रचंड राग येतो. या व्यक्तींमध्ये सहनशीलतेचा अभाव सुद्धा असतो. हाच राग या व्यक्तींना अनेकदा धोकादायक ठरण्याची शक्यता असते.

अधिक वाचा : मुलं नेहमी अशा प्रकारे खोटं बोलतात​

काचेप्रमाणे डोळे

अशा रंगाचे डोळे ज्या व्यक्तींचे असतात त्यांची विचार करण्याची शक्ती अधिक असते. त्यासोबतच ही लोक खूप हुशारही असतात.

खोल डोळे

ज्या व्यक्तीचे डोळे खोल असतातते खूप हुशार असतात. या व्यक्ती समोरील व्यक्तीकडून आपलं काम करुन घेण्यात हुशार असतात.

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी