Papmochani Ekadashi 2023 : कधी आहे पापमोचनी एकादशी? जाणून घ्या मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व

Papmochani Ekadashi 2023 Date and Time For Puja, Puja Vidhi And Muhurat or Muhurta : महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील अकराव्या दिवसाला अर्थात एकादशी या तिथीला पापमोचनी एकादशी असे म्हणतात.

Papmochani Ekadashi
पापमोचनी एकादशी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • कधी आहे पापमोचनी एकादशी?
 • जाणून घ्या मुहूर्त आणि पूजाविधी
 • जाणून घ्या महत्त्व

Papmochani Ekadashi 2023 Date and Time For Puja, Puja Vidhi And Muhurat or Muhurta : हिंदूंमध्ये एकादशीला प्रचंड महत्त्व आहे. एकादशीच्या दिवशी भाविक उपवास करतात. विष्णू देवाची पूजा करतात. आपापल्या ऐपतीनुसार दान करतात. महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील अकराव्या दिवसाला अर्थात एकादशी या तिथीला पापमोचनी एकादशी असे म्हणतात. यंदा शनिवार 18 मार्च 2023 रोजी पापमोचनी एकादशी आहे. पापमोचनी एकादशी ही सर्व एकादशींमध्ये सर्वाधिक महत्त्वाची तिथी समजली जाते. या दिवशी मनोभावे विष्णू देवाची पूजा केली आणि व्रत पाळले तर पुण्य लाभते. सुखांचा लाभ होतो. अडचणी आणि संकटे दूर होतात. मोक्षाचा मार्ग मोकळा होतो.

वेबस्टोरी : पापमोचनी एकादशी, जाणून घ्या मुहूर्त आणि पूजाविधी

पापमोचनी एकादशी  या दिवशी केलेले व्रत आरोग्य, संतानप्राप्ती, प्रायश्चित यासाठी महत्त्वाचे आहे. विष्णू म्हणजे सृष्टीचा संरक्षक. चांगल्याचे रक्षण करणारा देव. विष्णूचा अवतार अर्थात भगवान श्रीकृष्ण यांनी स्वतः युधिष्ठीर आणि अर्जुन या दोघांना पापमोचनी एकादशी व्रताचे महत्त्व सांगितले होते; असे सांगतात. पापमोचनी एकादशीला केलेल्या व्रताने ग्रहांचा अशुभ प्रभाव दूर करण्यास मदत होते. यामुळेच या व्रताचे महत्त्व जास्त आहे. 

papamochani ekadashi Vrat Katha । पापमोचनी एकादशीला करा या व्रत कथेचे पठण, सर्व पापांपासून मिळेल मुक्ती

पापमोचनी एकादशी भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या दिवशी विष्णू देव आणि त्यांची पत्नी माता लक्ष्मी यांची मनोभावे पूजा करतात. या पूजेमुळे घरात सुखसमृद्धी नांदते. अडचणी आणि संकटे दूर होतात. अपत्य प्राप्तीसाठी (संतानप्राप्तीसाठी) हे व्रत करतात. पापमोचनी एकादशीचे व्रत करण्यासाठी पहाटे उठून पती आणि पत्नी या दोघांनी आंघोळ करून घ्यावी. नंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची मनोभावे पूजा करावी. विष्णू सहस्त्रनामाचा जप करावा. पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या (राई) तेलाचा दिवा लावा. कारण पिंपळाच्या झाडावर ब्रह्मदेव, विष्णूदेव आणि महेश अर्थात भगवान शंकर यांचे वास्तव्य असते असे सांगतात.

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

Important Days in March 2023 : मार्च महिन्यात साजरे करतात हे महत्त्वाचे दिवस

Papmochani Ekadashi 2023 Date Time पापमोचनी एकादशी 2023 

 1. पापमोचनी एकादशी 2023 : शनिवार 18 मार्च 2023
 2. पापमोचनी एकादशी 2023, आरंभ : शुक्रवार 17 मार्च 2023 रोजी दुपारी 2 वाजून 6 मिनिटांनी तिथी आरंभ
 3. पापमोचनी एकादशी 2023, समाप्ती : शनिवार 18 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजून 13 मिनिटांनी तिथी समाप्ती

अशी करावी पूजा

एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने सुर्योदयापूर्वी उठावे आणि आंघोळ करून घ्यावी. त्यानंतर भगवान विष्णूची पुजा करावी. भगवान विष्णूला धूप, चंदन आणि फळ अर्पण करून दिवा लावावा. देवाची व्रत कथा ऐकावी आणि आरती करावी. गरजूंना दान करावे. अन्नदान करावे. एकादशीच्या काळात देवाची आराधना करावी. व्रत काळात उपवास करावा. चांगले कर्म करावे. वाईट, चुकीचे कर्म करू नये. हे व्रत दुसर्‍या दिवशी द्वादशीच्या तिथीला सोडावे. उपवास सोडण्यापूर्वी भगवान विष्णूची पूजा करावी.  

वेगाने वजन कमी करायचे असेल तर बेडवर करा ही कृती

स्पर्म काउंट वाढवणारे 7 सुपरफूड

एकादशीचे व्रत

 1. सकाळी नित्यकर्म आटोपून घ्या. आंघोळ करा. यानंतर व्रतासाठी तयारी सुरू करा. भगवान विष्णू यांचे नामस्मरण करा.
 2. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची मनापासून पूजा करा.
 3. विष्णू सहस्रनामाचे पठण करा.
 4. मांसाहार टाळा. धूम्रपान टाळा. मद्यपान टाळा. खोटे बोलू नका. फसवणूक करू नका. 
 5. गरजूंना अन्नदान, वस्त्रदान, पैशांचे दान करा.

एकादशी म्हणजे काय?

एकादशी हा हिंदू पंचांगाप्रमाणे प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला (पंधरवड्यातला) अकरावा दिवस आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यातल्या दोन पंधरवड्यांत (पक्षांत) प्रत्येकी एक अशा प्रकारे दोन वेळा एकादशी येते. मध्य प्रदेशात आणि उत्तर प्रदेशात महिन्यातला कृष्ण पक्ष शुक्ल पक्षाच्या आधी येत असल्याने कृष्ण पक्षात येणारी विशिष्ट नावाची एकादशी नंतरचे नाव असलेल्या महिन्यात येते. उदा : ज्या दिवशी महाराष्ट्रात आषाढ महिन्यातील कामिका एकादशी असते, त्यादिवशी मध्य प्रदेशात श्रावण महिन्यातली कामिका एकादशी असते. हा प्रकार शुक्ल एकादशींच्या बाबतीत होत नाही.

एकादशीचे महत्त्व

प्रत्येक मासात (महिन्यात) 2 प्रमाणे वर्षाला 24 एकादशी असतात. यातील चैत्रापासून फाल्गुन मासातील शुक्ल पक्षात कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जयदा व आमलकी यांचा समावेश होतो. कृष्ण पक्षात पापमोचनी, वरुधिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, फलदा, सफला, षट्‌तिला व विजया या एकादशींचा समावेश होतो. पौराणिक कथेनुसार, एकादशीच्या दिवशी सर्व पापे अन्नाचा आश्रय करून राहतात. म्हणून जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करतो त्याला ती पापे लागतात. म्हणून एकादशीला उपवास केला जातो. या दिवशी दान केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात.

Coconut Water : नारळ पाणी पिण्याचे फायदे

प्रायव्हेट पार्टची स्वच्छता करताना घ्यायची काळजी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी