Paush Purnima 2023, Paush Purnima Date Time Rituals : नव्या वर्षातली पहिली पौर्णिमा शुक्रवार 6 जानेवारी 2023 रोजी आहे. ही पौष महिन्यातील पौर्णिमा तसेच नव्या वर्षातील पहिली पौर्णिमा आहे.
पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून नित्यकर्म आटोपून आंघोळ करावी. मनोभावे देवपूजा करावी. देवाचे नामस्मरण करावे. नंतर आरती करावी. देवाला प्रसाद अर्पण करावा. दिवसभर कामं करताना इष्ट देवतेचे नामस्मरण करावे. उपवास करावा. रात्री चंद्रदर्शन केल्यानंतर पूर्ण जेवण घेऊन उपवास सोडावा.
चंद्र जेव्हा सूर्यापासून पृथ्वीच्या विरुद्ध बाजूस असतो, तेव्हा दिसणाऱ्या चंद्राच्या कलेस पौर्णिमा असे म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचे तर, पौर्णिमा ही अशी वेळ आहे, जेव्हा भूमध्यापासून दृग्गोचर सूर्याच्या आणि चंद्राच्या रेखावृत्तांमध्ये १८० अंशाचा फरक असतो. पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे पूर्णबिंब सूर्यास्ताच्या वेळी पूर्व क्षितिजावर उगवते आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला मावळते. पौणिमा ही हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यात एकदा येते. प्रतिपदेपासून आरंभ झालेल्या शुक्ल (शुद्ध) पक्षाचा तो शेवटचा दिवस असतो. इंग्रजीत पौर्णिमेला फुल मून Full Moon म्हणतात. पौर्णिमेलाच मराठीत पुनव हा शब्द आहे. तसेच हिंदीत पूर्णिमा किंवा पूनम या नावाने पौर्णिमेला ओळखले जाते.
दर १९ वर्षांनंतर येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात पौर्णिमा नसते. ज्या कॅलेंडर वर्षात १३ पौर्णिमा असतात, त्यातल्या दुसऱ्या पौर्णिमेला ब्लू मून Blue Moon म्हणतात.
January 2023 : जानेवारी 2023 मधील व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस
पेरू खाणे पुरुष आणि गरोदर महिलांसाठी फायद्याचे