Pausha Putrada Ekadashi 2023 : Date, Time, Puja Vidhi, Rituals and significance in Marathi : पंचांगानुसार रविवार 1 जानेवारी 2023 पासून नव्या वर्षाची सुरुवात होत आहे. नव्या वर्षातील पहिली एकादशी सोमवार 2 जानेवारी 2023 रोजी आहे. सोमवारी पौष महिन्यातील पुत्रदा एकादशी आहे. या एकादशीच्या दिवशी मुलांसाठी उपवास करावा आणि विष्णू देवाची मनोभावे पूजा करावी असे सांगतात. पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने मुलांना सुखी दीर्घायुष्य लाभते. मुलांच्या माध्यमातून त्यांच्या आईवडिलांना सुखाचा आनंदाचा लाभ होतो. अडीअडचणी, संकटे दूर होण्यास मदत होते.
पौष एकादशीचा आरंभ रविवार 1 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी 7 वाजून 12 मिनिटांनी होणार आहे. या एकादशीचा समारोप सोमवार 2 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी 8 वाजून 24 मिनिटांनी होणार आहे. पुत्रदा एकादशीचे व्रत सोमवार 2 जानेवारी 2023 रोजी करावे.
पहाटे उठून नित्यकर्म आटोपून घ्यावी. आंघोळ करावी. धूतवस्त्र परिधान करावे. घरातील देवांची पूजा करावी. विष्णू देवाची मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरात असेल तर त्याची मनोभावे पूजा करावी. अथवा देवघरापुढे विष्णू देवाची मूर्ती किंवा फोटोची प्रतिष्ठापना करावी. पूजा करण्यासाठी विष्णू देवाची पिवळ्या रंगाच्या वस्त्रावर प्रतिष्ठापना करावी. विष्णू देवाची मनोभावे पूजा करावी. देवासमोर सकाळी तुपाचा आणि संध्याकाळी तेलाचा दिवा प्रज्वलित करावा. विष्णू देवाचे नामस्मरण करावे. विष्णू देवाची आरती करावी.
पुत्रदा एकादशीच्या दिवशी पहाटे उठून आंघोळ करुन धूतवस्त्र परिधान करा. नंतर पूजा करण्यासाठी एक चौरंग तयार करा. चौरंगावर पिवळ्या रंगाच्या वस्त्रावर विष्णू देवाची मूर्ती किंवा फोटो यांची प्रतिष्ठापना करा. विष्णू देवाची फळे, फुले, नारळ, पान सुपारी, लवंग यांनी पूजा करा. पूजेनंतर विष्णू देवाची आरती करा. विष्णू देवाला नैवेद्य अर्पण करा. विष्णू देवाला तुपाच्या दिव्याने ओवाळून घ्या.
पौष महिन्यातील द्वादशीच्या दिवशी पहाटे उठून नित्यकर्म आटोपून घ्यावी. आंघोळ करावी. धूतवस्त्र परिधान करावे. ब्राह्मणांना आणि गरजूंना यथाशक्ती दान करावे. दानधर्म करुन मंगळवार 3 जानेवारी 2022 रोजी सकाळी 7 वाजून 12 मिनिटे ते सकाळी 9 वाजून 20 मिनिटे या काळात पुत्रदा एकादशीचे व्रत पूर्ण करावे.