Shravan 2022: ग्रहांचे दुष्परिणाम दूर करण्यासाठी श्रावण महिन्यात मोरपंख ठरेल फायद्याचे, करा 'हे' उपाय होईल सकारात्मक लाभ

आध्यात्म
भरत जाधव
Updated Aug 08, 2022 | 07:13 IST

हिंदू धर्मात (Hinduism) श्रावण महिन्याला (Shravan Mahina 2022) विशेष महत्त्व आहे. हा महिना भगवान शंकराला (Lord Shankara) समर्पित आहे. या महिन्यात भगवान शंकरासह भगवान श्रीकृष्णाचीही पूजा (Lord Krishna Pooja Vidhi) केली जाते. या पवित्र महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि वेदनांपासून मुक्ती मिळते तसेच व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. 

Peacock will be beneficial in the month of Shravan
ग्रहांचे दुष्परिणाम दूर करण्यासाठी मोर पिस ठरेल फायद्याचे  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • या पवित्र महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि वेदनांपासून मुक्ती मिळते.
  • तुम्हाला ज्या ग्रहाचा दोष आहे त्या ग्रहाचा 21 वेळा मंत्र जप करत मोर पिसावर पाणी शिंपडा.
  • श्रावण महिन्यात मोर पिसाचा उपाय धन लाभासाठी खूप फायदेशीर आहे.

Shravan 2022: हिंदू धर्मात (Hinduism) श्रावण महिन्याला (Shravan Mahina 2022) विशेष महत्त्व आहे. हा महिना भगवान शंकराला (Lord Shankara) समर्पित आहे. या महिन्यात भगवान शंकरासह भगवान श्रीकृष्णाचीही पूजा (Lord Krishna Pooja Vidhi) केली जाते. या पवित्र महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि वेदनांपासून मुक्ती मिळते तसेच व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. 

श्रीकृष्णाला मोर पंख (Morpankh) विशेष प्रिय आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात श्रीकृष्णाच्या पूजेसह मोर पिसांचे काही उपाय (Shravan Upay) केल्यास अनेक समस्यांवर मात करता येते. आजचा हा लेख याच विषयावर असून या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मोर पिसांच्या उपायांबद्दल माहिती देणार आहोत. 

हे आहेत उपाय –

ग्रहांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी –

तुमच्या कुंडलीत जर ग्रहदोष असेल आणि तुम्ही ग्रहांचा दुष्परिणाम सहन करत असाल तर श्रावण महिन्यात मोर पिसाचा उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यासाठी तुम्हाला ज्या ग्रहाचा दोष आहे त्या ग्रहाचा 21 वेळा मंत्र जप करत मोर पिसावर पाणी शिंपडा. त्यानंतर हे मोर पीस पूजास्थानी ठेवा आणि ग्रहशांतीसाठी देवाची प्रार्थना करा. काही दिवसांनी तुम्हाला सकारात्मक परिणाम जाणवतील.

Read Also : नितीश कुमार भाजपची साथ सोडत काँग्रेसशी हात मिळवणी करणार

धन लाभ हवा 

श्रावण महिन्यात मोर पंख उपाय धन लाभासाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी घरातील श्रीकृष्ण मंदिरात मोर पिसांची स्थापना करा. तसेच 40 दिवस दररोज या मोर पिसांची पूजा करा, 40 दिवसांनी मोर पीस तुमच्या तिजोरीत ठेवा, असे केल्याने धनवृद्धी होत रखडलेली कामे पूर्ण होतील.

Read Also : भारताने विंडीजविरुद्धची T२० सीरिज ४-१ अशी जिंकली

कालसर्प दोष दूर करण्यासाठी 

कालसर्प दोष दूर करण्यासाठी मोर पीस हे खूप उपयुक्त ठरते. पौराणिक मान्यतेनुसार, कालसर्प दोषापासून मुक्ती मिळावी म्हणून भगवान श्रीकृष्णाने आपल्या मुकुटात मोर पीस लावले होते. त्यामुळे कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उशीखाली मोर पीस ठेवून झोपावे.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाउ याचे समर्थन करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी