Astrology: मित्र बनवण्यासाठी माहिर असतात या राशीतील लोक; गोड बोलण्याने सर्वांना करतात आकर्षित 

आध्यात्म
Updated Jun 04, 2022 | 16:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

Astrology, Zodiac Sign । मैत्री हे एक नाते आहे जे माणूस स्वतः तयार करतो. कारण मैत्रीचे नाते जरी रक्ताचे नसले तरी या नात्यामध्ये खूप ताकद असते. एक खरा मित्र आयुष्य चांगले बनवण्यास मदत करतो, तर चुकीचा मित्र जीवनाचा नाश करतो.

People in this zodiac sign are good at making friends
मित्र बनवण्यासाठी माहिर असतात या राशीतील लोक, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मैत्री हे एक नाते आहे जे माणूस स्वतः तयार करतो.
  • वृषभ राशीवर शुक्र ग्रहाचा विशेष प्रभाव पाहायला मिळतो.
  • वृश्चिक राशीच्या लोकांचे मित्र खूप मर्यादित स्वरूपात असतात.

Astrology, Zodiac Sign । मुंबई : मैत्री हे एक नाते आहे जे माणूस स्वतः तयार करतो. कारण मैत्रीचे नाते जरी रक्ताचे नसले तरी या नात्यामध्ये खूप ताकद असते. एक खरा मित्र आयुष्य चांगले बनवण्यास मदत करतो, तर चुकीचा मित्र जीवनाचा नाश करतो. यामुळेच लोक मित्र बनवताना खूप काळजी घेतात. जाणकार असेही म्हणतात की प्रत्येक हस्तांदोलन करणारा हा खरा मित्र नसतो. आचार्य चाणक्य म्हणतात की खरा मित्र संकटकाळात ओळखला जातो. मित्र तोच असतो जो सुख-दुःखात सोबत असतो. चला तर म जाणून घेऊया ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्या राशीचे लोक मित्र बनवण्यात माहिर आहेत. (People in this zodiac sign are good at making friends). 

अधिक वाचा : क्रिकेटच्या कसोटी फॉरमॅटचे भवितव्य धोक्यात - ICC अध्यक्ष

  1. वृषभ राशी - या राशीवर शुक्र ग्रहाचा विशेष प्रभाव पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला लग्जरी जीवनाचा कारक मानला जातो. शुक्राच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांची मित्र-मंडळी खूप असते. त्यांच्याकडे इतरांना आकर्षित करण्याची विशेष कला आहे. त्याच्या बोलण्याने आणि जीवनशैलीने प्रभावित होऊन प्रत्येकाला त्यांच्या जवळ यावेसे वाटते.
  2. मिथुन राशी- ज्या लोकांची रास मिथुन आहे त्यांच्यासाठी मैत्रीचे नाते खूप महत्वाचे असते. ते कोणाशीही सहज मैत्री करत नाहीत, पण ज्याच्याशी ते मैत्री करतात, त्यांना आयुष्यभर आपल्या सोबत ठेवतात. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. हा तर्कशास्त्र, विनोदबुद्धी, गणित, लेखन, गायन इत्यादींचा कारक ग्रह आहे. जेव्हा हा ग्रह शुभ असतो तेव्हा तो या राशीच्या लोकांना अनेक कलागुणांमध्ये आघाडीवर नेत असतो. ज्यामुळे ते जिथे असतील तिथे लोकप्रिय होतात. यांची मैत्रीत फसवणूक देखील होते. म्हणूनच त्यांनी नीट विचार करून मित्र बनवायला पाहिजे. 
  3. वृश्चिक राशी - या राशीच्या लोकांचे मित्र खूप मर्यादित स्वरूपात असतात. पण यांचे मोजकेच असलेले मित्र आयुष्यभर सोबत राहणाऱ्यांपैकी असतात. वृश्चिक राशीच्या लोकांची मैत्री होऊनही ते अनेक बाबतीत मित्रांपासून दूर राहतात. या राशीचा स्वामी मंगळ आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला धैर्य, ऊर्जा, टेक्नॉलॉजी इत्यादींचा कारक मानले जाते. ते जीवनात मोठे पद मिळवतात. ते खूप मेहनती आहेत. त्यांच्या कार्याचे नेहमी कौतुक होत असते. या राशीच्या लोकांमध्ये महिला मैत्रिणींची संख्याही चांगली असते. मैत्रीत ते सीमा ओलांडत नाहीत. यामुळेच मित्रही त्यांचा नेहमी आदर करतात.

डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी