Chanakya Niti: धनवान होण्यासाठी व्यक्तीत असायला हवे हे गुण, जाणून घ्या काय म्हणतात चाणक्य

अनेक लोक धनवान होण्यासाठी खूप मेहनत करतात, पण त्यांना सफलता मिळत नाही. चाणक्य नीतीनुसार धनवान होण्यासाठी आपल्याकडे हे चार गुण असावे लागतात. जाणून घ्या काय आहेत चाणक्याच्या मते हे महत्वाचे गुण.

Arya Chanakya
धनवान होण्यासाठी व्यक्तीत असायला हवे हे गुण, जाणून घ्या काय म्हणतात चाणक्य 

थोडं पण कामाचं

  • खर्च आणि बचत यांच्यात असावा ताळमेळ
  • पैशांच्या देवाणघेवाणीत मध्ये आणू नये संकोच
  • व्यक्तीला असावे आपल्या ध्येयाचे भान

आचार्य चाणक्यांच्या (Acharya Chanakya) नीतींबद्दल (Niti) आपण अनेकदा वाचत किंवा ऐकत असतो. पण बहुतेक लोक त्या गोष्टी अंमलात आणू शकत नाहीत. चाणक्यनीती ही जीवनाचा धर्म (life philosophy), शांती (peace) आणि शिक्षणाच्या (education) प्रत्येक पैलूबद्दल मार्गदर्शन (guidance) करते. प्रत्येकच व्यक्ती ही श्रीमंत (rich) आणि धनवान (wealthy) होण्याची स्वप्ने (dreams) पाहते, जेणेकरून तिला आपली सर्व स्वप्ने पूर्ण करता येतील. अनेक लोक यासाठी खूप प्रयत्न (efforts) करतात, पण त्यांना यश मिळत नाही. चाणक्यनीतीत (Chanakya Niti) धनवान होण्याबाबतही सांगितले गेले आहे की धनवान होण्यासाठी व्यक्तीत कोणते गुण (qualities) असावे लागतात. जाणून घेऊया या गुणांबद्दल.

खर्च आणि बचत यांच्यात असावा ताळमेळ

चाणक्य म्हणतात की मनुष्याला धनवान होण्यासाठी काही गोष्टींवर लक्ष द्यावे लागते. त्यांनी म्हटले आहे की सर्वात आधी व्यक्तीला हे ठाऊक असायला हवे की तिला खर्च किती करायचा आहे आणि किती पैसे वाचवायचे आहेत. पैशांचा गैरवापर व्यक्तीला गरीब बनवतो. चाणक्यनीतीत म्हटले आहे की योग्य वेळी पैसे न वापरल्यास त्याचे महत्व संपून जाते. जे लोक अनावश्यक खर्च करतात ते बुद्धिहीन असतात.

पैशांच्या देवाणघेवाणीत मध्ये आणू नये संकोच

चाणक्य सांगतात की पैशांच्या देण्याघेण्याच्या बाबतीत व्यक्तीने संकोची असू नये. अनेकदा या संकोचामुळे व्यक्तीला आपल्याच पैशांपासून वंचित राहावे लागते. गरज असूनही संकोचामुळे पैसे न घेतल्याने आर्थिक नुकसान होते आणि गरीबी येते. त्यामुळे पैशांच्या बाबतीत व्यवहार नेहमीच स्पष्ट ठेवावेत. तसेच पैसे हातात असल्याचा अहंकार बाळगू नये. ज्या व्यक्ती आयुष्यात धोका पत्करतात त्यांना सफलता हमखास मिळते. जोखीम घेणारे अडचणींना घाबरत नाहीत, तर त्यांचा सामना करतात.

व्यक्तीला असावे आपल्या ध्येयाचे भान

शास्त्रांनुसार व्यक्तीला आपल्या ध्येयाचे भान असायला हवे. जर व्यक्तीचे ध्ये निश्चित नसेल तर त्याला सफलता मिळत नाही. चाणक्यनीती सांगते की पैशांशी संबंधित गोष्टी लोकांना सांगू नयेत. चाणक्य सांगतात की लक्ष्मी ही चंचल असते. त्यामुळे पैशांचा विनियोग हा योग्य ठिकाणी करावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी