Pithori Amavasya 2022: कधी आहे पिठोरी अमावस्या? जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त

Pithori Amavasya 2022 Puja Vidhi: भाद्रपद महिन्यात येणाऱ्या अमावस्याला पिठोरी अमावस्या म्हणतात. यावर्षी पिठोरी अमावस्या 27 ऑगस्टला शनिवारी येत आहे. पिठोरी अमावस्येला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.

pithori amavasya 2022 know when is pithori amavasya pola tithi and auspicious time shravan month
कधी आहे पिठोरी अमावस्या? जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त 
थोडं पण कामाचं
  • या अमावास्येला केलं जातं विशेष धार्मिक कार्य
  • यावर्षी पिठोरी अमावस्या 27 ऑगस्टला शनिवारी येईल
  • या अमावास्येला 'पोळा', 'पिठोरी' असेही म्हणतात. या अमावास्येला दानधर्माला विशेष महत्त्व आहे

Pithori Amavasya 2022 Shubh Muhurat: वर्षातील प्रत्येक महिन्यात एक अमावस्या (Amavasya) असते. यापैकीच एक म्हणजे पिठोरी अमावस्या (pithori amavasya). तिला 'कुषोत्पतिनी अमावस्या' असेही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार कुशोत्पतिनी म्हणजे कुशांचा संग्रह. ही अमावस्या भाद्रपद महिन्यात येते. यावर्षी पिठोरी अमावस्या 27 ऑगस्टला शनिवारी येणार आहे. (pithori amavasya 2022 know when is pithori amavasya pola tithi and auspicious time shravan month)

या अमावास्येला 'पोळा' (pola) किंवा 'पिठोरी' असेही म्हणतात. या अमावास्येला दानधर्माला विशेष महत्त्व आहे. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या अमावास्येला नियमानुसार भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. त्यामुळेच या अमावस्येचं व्रत अत्यंत शुभ मानला जातं. चला जाणून घेऊया पिठोरी अमावस्या व्रताचा शुभ मुहूर्त आणि व्रताचे नेमके महत्त्व (tithi and auspicious time ).

शुभ वेळ

अमावस्या प्रारंभ तिथी शुक्रवार, 26 ऑगस्ट 2022 दुपारी 12:24 वाजता. आणि अंतिम तिथी शनिवार 27 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 01:47 वाजता आहे. या दिवशी उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे.

अधिक वाचा: Narali pournima: जाणून घ्या कधी आहे नारळी पोर्णिमा, यासंबंधित गोष्टी

पिठोरी अमावस्येचे महत्त्व

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, माता पार्वतीने इंद्राणीला या दिवशी हे व्रत करण्यास सांगितले होते. या व्रताच्या फायद्यांविषयी त्यांनी सांगितले होते की, हे व्रत केल्याने अपत्य प्राप्ती होते आणि मुलांच्या आरोग्यासाठीही हा उपवास ठेवला जातो. तेव्हापासून, या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या मुलांच्या कल्याणासाठी पिठोरी अमावस्येचा उपवास करतात. या  अमावस्येचं व्रत सर्व अमावस्येमध्ये सर्वात फलदायी आहे. या दिवशी विवाहित महिलांनी काही मुलांना शुद्ध शाकाहारी भोजन दिले पाहिजे. यामुळे विशेष फायदा होतो.

अधिक वाचा: Vastu Tips: घराच्या ' या' दिशेला अन्नपूर्णेचा फोटो लावल्यास धन आणि अन्नाची कधीही कमतरता भासणार नाही

या दिवशी स्नान करावे

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. या दिवशी पवित्र नदी किंवा तलावात स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी नदीत स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. जर जवळ तलाव नसेल तर घरी स्नान करताना गंगेचे पाणी पाण्यात टाकून स्नान करू शकता.

(टीप: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सामान्य समजुती आणि सामग्रीवर आधारित आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी