पितृपक्ष २०२० चे संपूर्ण कॅलेंडर, जाणून घ्या या दरम्यान श्राद्ध करण्याचे महत्त्व 

पितृ पक्ष २०२० श्राद्धाच्या तिथी :  पितृ पक्ष पौर्णिमेच्या दिवशी सुरू होणार आहे. या ठिकाणी जाणून घ्या २०२० मध्ये पितृपक्षाच्या तारखा आणि १६ दिवस पूजेचे महत्त्व 

pitru paksha 2020 date time calendar
पितृपक्ष २०२० चे संपूर्ण कॅलेंडर  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • पौर्णिमेला १ सप्टेंबरपासून सुरू होणार पितृ पक्षाचा कालवधी 
  • पूर्वजांच्या आत्माला शांतीसाठी केले जाते हे अनुष्ठान 
  • या ठिकाणी पाहा पितृ पक्षाचे संपूर्ण कॅलेंडर आणि जाणून घ्या त्याचे महत्त्व 

मुंबई :  हिंदू कॅलेंडरनुसार पितृ पक्ष असा कालावधी असतो ज्या वेळी लोक आपल्या मृत पूर्वजांचे श्राद्ध आणि तर्पण अनुष्ठान करून त्यांना श्रद्धांजली देतात. अमावसंत कॅलेंडरनुसार पितृ पक्ष भाद्रपद कृष्ण पक्ष महिन्यात येतो. जे लोक पौर्णिमांत कॅलेंडरचे पालन करतात ते अश्विन महिन्यात याचे अनुष्ठान करतात. 

विशेष म्हणजे यात केवळ महिन्यांचे नाव वेगवेगळे आहेत. पण तारीक आणि वेल एकच आहे. पितृ पक्ष पौर्णिमेच्या दिवशी सुरू होतो. या पौर्णिमेला तमिळमध्ये पूनम किंवा पूर्णमनी म्हणतात. २०२० मध्ये पितृ पक्षाच्या तारखा आणि महत्त्व जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.. 

पितृ पक्ष 2020 श्राद्ध तिथी (Pitru Paksha shradh Tithi and dates calender):
पंचांगानुसार, पितृ पक्षाच्या तिथी या प्रकारे आहेत:

क्रमांक  तारीख दिन
1. 2 सप्टेंबर पूर्णिमा श्राद्ध
2 3 सप्टेंबर प्रतिपदा श्राद्ध
3 4 सप्टेंबर द्वितीया श्राद्ध
4 5 सप्टेंबर तृतीया श्राद्ध
5 6 सप्टेंबर चतुर्थी श्राद्ध
6 7 सप्टेंबर पंचमी श्राद्ध
7 8 सप्टेंबर षष्टि श्राद्ध
8 9 सप्टेंबर सप्तमी श्राद्ध
9 10 सप्टेंबर अष्टमी श्राद्ध
10 11 सप्टेंबर नवमी श्राद्ध
11 12 सप्टेंबर दशमी श्राद्ध
12 13 सप्टेंबर एकादशी श्राद्ध
13 14 सप्टेंबर द्वादशी श्राद्ध
14 15 सप्टेंबर त्रियोदशी श्राद्ध
15 16 सप्टेंबर चतुर्दशी श्राद्ध
16 17 सप्टेंबर  सर्वपित्री अमावस्या श्राद्ध

पितृ पक्षाचे महत्व (Pitru Paksha 2020 Significance)

पितृ पक्ष पौर्णिमेच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी सुरू होतो. हे चंद्र चक्राच्या वानिंग चरणाच्या सुरूवातीला चिन्हीत करते. हे हिंदू कॅलेंडरमध्ये १६ दिवसांच्या कालावधीसाठी आहे. त्याला पितृ पक्ष म्हटले जाते. यात लोक आपल्या मृत नातेवाईक किंवा पूर्वजांना सन्मान देण्यासाठी तर्पण किंवा श्राद्ध अनुष्ठान करतात. 

असे म्हटले जाते की मृत आणि असंतुष्ट आत्मा आपल्या कुटुंबातील सदस्यांना पाहण्यासाठी पुन्हा पृथ्वीवर येतात. त्यामुळे त्यांचा मोक्ष सुनिश्चित करण्यासाठी लोक विधी करून पिंड दान ( उकडलेला भात आणि काळे तीळ युक्त भोजन अपर्ण करण्याची विधी) करतात. 

पिंड दानामुळे त्या लोकांना आनंद आणि समाधान देण्याची प्रथा आहे. यावेळी अशी प्रार्थना केली जाते त्यानुसार आत्म्यांना शांत करून जन्म, मृत्यू आणि पूनर्जन्माच्या चक्रातून त्यांची सुटका होण्यासाठी या विधीचा उपयोग होतो असे मानले जाते. 

पितृ पक्ष किंवा पितरांच्या श्राप असलेल्या व्यक्तींसाठी हा कालावधी महत्त्वाचा आहे.  लोक अनुष्टान करतात आणि कावळ्यांना भोजन देतात.  (मानले जाते की हे मृतकांचे प्रतिनिधी असतात) 

मान्यतेनुसार लोक छतावर भोजन ठेवतात, त्याचा स्वीकार कावळ्यांनी केला तर पूर्वज त्यांच्यावर प्रसन्न आहेत. जर कावळ्याने भोजन स्वीकारले नाही तर हे संकेत मिळतात की मृत नातेवाईक नाराज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी