Vastu Tips: घराच्या या ठिकाणी ठेवा चांदीचा हत्ती; सोन्या-चांदीने भरेल तुमची तिजोरी 

आध्यात्म
Updated Jun 18, 2022 | 09:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vastu Tips In Marathi | वास्तुशास्त्रामध्ये चांदीची गणना अत्यंत शुभ केली जाते. त्याचप्रमाणे चांदीचे प्राणी देखील शुभ लाभ दर्शवतात. या शुभ प्राण्यांमध्ये चांदीच्या हत्तीचाही समावेश आहे. त्यामुळे जेव्हा दोन शुभ गोष्टींचे मिलन होते तेव्हा त्याचा दुहेरी शुभ लाभ होत असतो.

Placing a silver elephant in this direction in the house brings a lot of wealth in the house
घराच्या या ठिकाणी चांदीचा हत्ती ठेवल्याने वाढेल धनसंपत्ती  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वास्तुशास्त्रामध्ये चांदीची गणना अत्यंत शुभ केली जाते.
  • वास्तुशास्त्रानुसार चांदीच्या हत्तीची मूर्ती घराच्या उत्तर दिशेला ठेवल्यास ऐश्वर्य वाढते.
  • हत्तीची मूर्ती कधीच दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवू नये.

Vastu Tips In Marathi | मुंबई : वास्तुशास्त्रामध्ये चांदीची गणना अत्यंत शुभ केली जाते. त्याचप्रमाणे चांदीचे प्राणी देखील शुभ लाभ दर्शवतात. या शुभ प्राण्यांमध्ये चांदीच्या हत्तीचाही समावेश आहे. त्यामुळे जेव्हा दोन शुभ गोष्टींचे मिलन होते तेव्हा त्याचा दुहेरी शुभ लाभ होत असतो. दरम्यान आज आपण चांदीच्या हत्तीबद्दल भाष्य करणार आहोत. घरामध्ये चांदीचा हत्ती योग्य ठिकाणी ठेवल्यास पैशाची समस्या तर दूर होतेच, शिवाय व्यक्तीला मान-सन्मान, कीर्ती, ऐश्वर्य इत्यादींचा भरघोस लाभ मिळतो. चला तर मग जाणून घेऊया घरामध्ये चांदीचा हत्ती नेमका कोणत्या दिशेला ठेवायचा आणि त्याचे फायदे काय आहेत. (Placing a silver elephant in this direction in the house brings a lot of wealth in the house). 

अधिक वाचा : डोळ्यांत मीठ टाकून आणि पट्टी बांधून काढलं सोनू सूदचं पेंटिंग

चांदीच्या हत्तीचे फायदे 

  1. वास्तुशास्त्रानुसार चांदीच्या हत्तीची मूर्ती घराच्या उत्तर दिशेला ठेवल्यास ऐश्वर्य तर वाढतेच, पण सुख-शांतीही प्राप्त होते. असे म्हणतात की, चांदीच्या हत्तीवरून गणेश आणि देवी लक्ष्मीच्या आशिर्वादांचा वर्षाव होतो.
  2. चांदीचा हत्ती घरात आणल्याने मान-सन्मान वाढतो. तसेच ते इच्छाशक्ती देखील मजबूत करते.
  3. व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती करायची असेल तर घरात चांदीच्या हत्तीची जोडी ठेवा.
  4. मुलाला अभ्यास करायला आवडत नसेल अथवा त्याचे अभ्यासात लक्ष लागत नसेल तर चांदीच्या हत्तीची मूर्ती अभ्यासाच्या खोलीत ठेवावी.
  5. जर पैशाची कमतरता असेल तर घराच्या मुख्य दरवाजासमोर चांदीच्या हत्तीची मूर्ती ठेवा. स्वतंत्र बेडरूममध्ये हत्तीची मूर्ती जोडीने ठेवल्यास पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येतो.

कुठे ठेवू नये हत्तीची मूर्ती

लक्षणीय बाब म्हणजे हत्तीची मूर्ती कधीच दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवू नये, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा शिरते. याशिवाय हत्तीची मूर्ती घरात किंवा दुकानात धनप्राप्तीसाठी ठेवायची असेल तर तिची सोंड वरच्या बाजूला असणे गरजेचे आहे. काही कारणाने तुम्हाला चांदीचा हत्ती पाळता येत नसेल तर तुम्ही हत्तीची पितळेची मूर्ती ठेवू शकता. याशिवाय पितळेचीही मूर्ती ठेवता येत नसेल तर दगडी मूर्ती ठेवता येते. मात्र प्लास्टिकच्या मूर्ती ठेवणे अशुभ मानले जाते. 

डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी