Astrology Tips : आर्थिक प्रगती आणि सुख समृद्धीसाठी घराजवळ लावा ही झाडे

Plant these trees near your home for economic growth and prosperity ज्योतिषशास्त्रानुसार घराजवळ निवडक झाडे लावली तर आपल्या आर्थिक प्रगतीला चालना मिळू शकते. घरात सुख समृद्धी नांदू शकते. घराचे सौंदर्य खुलते आणि वातावरण चांगले राहते. प्रगती होते.

Plant these trees near your home for economic growth and prosperity
आर्थिक प्रगती आणि सुख समृद्धीसाठी घराजवळ लावा ही झाडे 
थोडं पण कामाचं
  • आर्थिक प्रगती आणि सुख समृद्धीसाठी घराजवळ लावा ही झाडे
  • ज्योतिषशास्त्रानुसार घराजवळ निवडक झाडे लावा
  • आर्थिक प्रगतीला चालना मिळेल

Plant these trees near your home for economic growth and prosperity ज्योतिषशास्त्रानुसार घराजवळ निवडक झाडे लावली तर आपल्या आर्थिक प्रगतीला चालना मिळू शकते. घरात सुख समृद्धी नांदू शकते. घराचे सौंदर्य खुलते आणि वातावरण चांगले राहते. प्रगती होते.

  1. शमी - शमी वनस्पती धार्मिकदृष्ट्या पवित्र आहे. घराच्या बाहेर दक्षिण आणि पूर्व-उत्तर कोनात शमीची लागवड करता येते. या ठिकाणी दररोज शमीची पूजा करावी यामुळे शनि देव प्रसन्न होतात. भगवान शंकराची कृपा होते. घरात सुख, समृद्धी, धन, धान्य यांची कमतरता कधी होत नाही.
  2. रोझमेरी - घराच्या नैऋत्य दिशेला रोझमेरीची लागवड करता येते. दररोज आंघोळीनंतर रोझमेरीला पाणी द्यावे. यामुळे कर्जाच्या संकटातून सहज सुटका होते. 
  3. पिंपळ - पिंपळावर सर्व देवीदेवतांचा वास असतो असे म्हणतात. पिंपळाचे रोप आता कुंडीत लावणे शक्य आहे. दररोज आंघोळीनंतर पिंपळाची पूजा करावी आणि पिंपळाला पाणी द्यावे. यामुळे भगवान विष्णू आणि शनि देव प्रसन्न होतात.
  4. लाजवंती - लाजवंतीचे रोप घराच्या उत्तर-पूर्व दिशेला लावावे. यामुळे कुंडलीतील राहू दोषाचा त्रास कमी होण्यास मदत होते. 
  5. तुळस - तुळशीचे रोप कुंडीत लावता येते. शक्यतो तुळशीचे रोप लावलेली कुंडी पूर्व दिशेला घराच्या अंगणात अथवा खिडकीत वा दाराजवळ ठेवतात. दररोज आंघोळीनंतर तुळशीची पूजा करावी आणि तुळशीला पाणी द्यावे. सकाळी-संध्याकाळ तुळशीसमोर दिवा लावावा. यामुळे देव प्रसन्न होतात. घरात सुख समृद्धी राहते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी