Astrology Tips: आर्थिक चणचणीने झालाय त्रस्त? घराच्या आजूबाजूला लावा ही वनस्पती, माता लक्ष्मी देईल आशिर्वाद

आध्यात्म
Updated May 26, 2022 | 12:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

Astrology Tips About Plants । जीवनात चांगले आरोग्य आणि आनंद मिळावा अशी प्रत्येक माणसाची इच्छा असते. त्यासाठी तो सर्व उपाय योजनाही करतो, तरीही प्रत्येकाला हवे ते मिळत नाही.

Planting these trees around the house will save you from financial problems
घराच्या बाजूला लावा ही वनस्पती, माता लक्ष्मी देईल आशिर्वाद  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • घराला सुंदर बनवण्यासाठी आणि हिरवाई वाढवण्यासाठी झाडे लावणे चांगले मानले जाते.
  • ज्योतिषशास्त्रानुसार, घराच्या मागील बाजूस केळीचे रोप लावणे शुभ मानले जाते.
  • डाळिंबाचे रोप लावल्याने झोपलेले नशीबही चमकते. 

Astrology Tips About Plants । मुंबई : जीवनात चांगले आरोग्य आणि आनंद मिळावा अशी प्रत्येक माणसाची इच्छा असते. त्यासाठी तो सर्व उपाय योजनाही करतो, तरीही प्रत्येकाला हवे ते मिळत नाही. दरम्यान आज आपण अशा काही वनस्पतींबद्दल भाष्य करणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकता. असे केल्याने तुमचे घर संपत्तीने भरण्यास वेळ लागणार नाही. (Planting these trees around the house will save you from financial problems). 

अधिक वाचा : ज्यांच्या पत्नीमध्ये हे गुण असतात ते खूप भाग्यवान

दरम्यान, घराला सुंदर बनवण्यासाठी आणि हिरवाई वाढवण्यासाठी झाडे लावणे चांगले मानले जाते. पण मनात नेहमी प्रश्न असा येतो की घरात कोणती झाडे लावावीत, ज्यामुळे आपले घरही चमकेल आणि माता लक्ष्मीही प्रसन्न होईल. आज आपण तुमचा हाच संभ्रम दूर करणार आहोत. 

अधिक वाचा : नवज्योतसिंग सिद्धू यांना तुरुंगात मिळाले सहाय्यकाचे काम

घराबाहेर केळी आणि बेलाचे झाड लावा 

ज्योतिषशास्त्रानुसार, घराच्या मागील बाजूस केळीचे रोप लावणे शुभ मानले जाते. केळी हे भगवान विष्णूचे प्रिय मानले जाते आणि माता लक्ष्मी त्यांची पत्नी आहे. त्यामुळे केळीचे रोप लावल्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते. जर आपण घराच्या पुढील भागाबद्दल भाष्य केले तर घराच्या पुढील भागात बेलाच्या पानाचे रोप लावले पाहिजे. ही वनस्पती भगवान शंकराची लाडकी मानली जाते. शिवरात्रीला फक्त बेलाची पाने दान केली जातात.

मुख्य प्रवेशद्वाराजवळ डाळिंबाचे झाड लावा 

घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबद्दल भाष्य करायचे झाले तर मुख्य गेटच्या उजव्या बाजूला डाळिंबाचे रोप लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने माता लक्ष्मी आणि धनकुबेर तुमच्या घरी ओढले जातात आणि कुटुंबात सुख-समृद्धी येते. डाळिंबाचे रोप लावल्याने झोपलेले नशीबही चमकते. 

मनी प्लांट देते शुभ लाभ 

आता घरातील आतील भागाबद्दल भाष्य केले तर, तिथे शमीचे रोप लावावे. मुख्य गेटवर हे रोप लावल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते आणि कुटुंबाला कधीही आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत नाही. घरामध्ये मनी प्लांटचे रोप देखील लावू शकता. त्याला देखील भाग्यवान मानले जाते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी