Navratri 2020 Maa Kushmanda Puja: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवी अशी करा पूजा आणि जपा मंत्र

Navratri 2020 Maa Kushmanda Puja : नवरात्रीचा चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन अनाहत चक्रामध्ये असते. या दिवशी आई कुष्मांडा देवीची पूजा केल्याने व्यक्तीवरआईची कृपादृष्टी राहते. 

pooja path navratri 2020 kushmanda puja mantra aarti and vidhi
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माता कुष्मांडा अशी करा पूजा  |  फोटो सौजन्य: Twitter

Navratri 2020 Maa Kushmanda Puja: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दूर्गा मातेची कुष्मांडा रुपात पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन अनाहत चक्रामध्ये असते. या दिवशी आई कुष्मांडा देवीची पूजा केल्याने व्यक्तीवर आईची कृपादृष्टी राहते.  अशी मान्यता आहे की सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा कुष्मांडा मातेनेच ब्रह्मांडाची रचना केली होती. ही सृष्टीची आदीस्वरूप आहे. आई कुशमंदाच्या शरीराची कांती आणि प्रभा सूर्याप्रमाणे दैदीप्यमान आहे. तिच्या प्रकाशाने दाही दिशा उजळून निघतात.  या देवीला अष्टभुजा देवीही म्हटले जाते.  तिच्या सात हातांमध्ये कमंडलू, धनुष्य, बाण, कमल-पुष्प, अमृतपूर्ण कलश, चक्र आणि गदा असते. तर आठव्या हातात. सर्व सिद्धी आणि निधीची जपमाळ असते. आई कुशमंदाचे वाहन सिंह आहे. 

अशी करा आई कुष्मांडाची पूजा  (kushmanda rasayana) 

या दिवशी सकाळी स्नान करून आई कुशमंदाचे स्मरण करा. आईला धूप, गंध, अक्षता, लाल पुष्प, पांढऱा कोहळा, फळ, सुकामेवा आणि सौभाग्याचे साहित्य अर्पित केले जाते. आईला शिरा आणि दहीचा नैवैद्य दाखविला जातो. त्यानंतर या प्रसादाचे ग्रहण करा. शेवटी आईचा मंत्र आणि आरती म्हणा.   


आई कुष्मांडाचा मंत्र:

1. या देवी सर्वभू‍तेषु मां कुष्मांडा रूपेण संस्थिता

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:

2. वन्दे वांछित कामर्थे चन्द्रार्घकृत शेखराम्

सिंहरूढ़ा अष्टभुजा कूष्माण्डा यशस्वनीम्॥

3. दुर्गतिनाशिनी त्वंहि दारिद्रादि विनाशिनीम्

जयंदा धनदां कुशमंदे प्रणमाम्यहम्॥

4. जगन्माता जगतकत्री जगदाधार रूपणीम्

चराचरेश्वरी कुष्मांडे प्रणमाम्यहम्॥
आई कुष्मांडा आरती:

चौथा जब नवरात्र हो, कुष्मांडा को ध्याते।

जिसने रचा ब्रह्मांड यह, पूजन है

आद्य शक्ति कहते जिन्हें, अष्टभुजी है रूप।

इस शक्ति के तेज से कहीं छांव कहीं धूप॥

कुम्हड़े की बलि करती है तांत्रिक से स्वीकार।

पेठे से भी रीझती सात्विक करें विचार॥

क्रोधित जब हो जाए यह उल्टा करे व्यवहार।

उसको रखती दूर मां, पीड़ा देती अपार॥

सूर्य चंद्र की रोशनी यह जग में फैलाए।

शरणागत की मैं आया तू ही राह दिखाए॥

नवरात्रों की मां कृपा कर दो मां

नवरात्रों की मां कृपा करदो मां॥

जय मां कुष्मांडा मैया।

जय मां कुष्मांडा मैया॥ 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी