कधी आहे प्रबोधिनी एकादशी, सुखसमृद्धी आणि धनलाभाच्या दृष्टीने या दिवसाचे काय आहे महत्त्व?

Prabodhini Ekadashi 2022 Date Day And Time Details Read In Marathi : शुक्रवार 4 नोव्हेंबर 2022 रोजी कार्तिक शुद्ध एकादशी अर्थात प्रबोधिनी एकादशी आहे. वैष्णव पंथीय अर्थात भगवान विष्णूवर श्रद्धा असलेले या दिवशी एकादशीचे व्रत करतील.

Prabodhini Ekadashi 2022 Date Day And Time Details Read In Marathi
कधी आहे प्रबोधिनी एकादशी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कधी आहे प्रबोधिनी एकादशी
  • सुखसमृद्धी आणि धनलाभाच्या दृष्टीने या दिवसाचे काय आहे महत्त्व?
  • पूजेचा विधी

Prabodhini Ekadashi 2022 Date Day And Time Details Read In Marathi : शुक्रवार 4 नोव्हेंबर 2022 रोजी कार्तिक शुद्ध एकादशी अर्थात प्रबोधिनी एकादशी आहे. वैष्णव पंथीय अर्थात भगवान विष्णूवर श्रद्धा असलेले या दिवशी एकादशीचे व्रत करतील. प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी सूर्योदय सकाळी 6.40 वाजता आणि सूर्यास्त संध्याकाळी 6 .03 वाजता तर चंद्रोदय संध्याकाळी 6.18 वाजता आहे.

पूजेचा विधी

प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी पहाटे उठून आंघोळ आदी सकाळची नित्यकर्म आटोपून धूतवस्त्र अथवा सोवळं नेसून विष्णू देवाची पूजा करा. यासाठी पूर्व दिशेला पिवळ्या रंगाच्या वस्त्रावर विष्णू देवाची मूर्ती किंवा प्रतिमा याची प्रतिष्ठापना करा. नंतर विष्णूची मनोभावे पूजा करा. तुपाचा दिवा प्रज्वलित करा. विष्णू देवाची आरती करा. विष्णू देवाला फळांचा प्रसाद अर्पण करा. ॐ अच्युताय नमः या मंत्राचे १०८ वेळा मनोभावे पठण करा. ॐ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे १०८ वेळा मनोभावे पठण करा. एकादशीच्या काळात फक्त फलाहार करा. दुसऱ्या दिवशी ब्राह्मण भोजन करून अथवा गरजू ब्राह्मणांना अन्नदान, धान्यदान करून तसेच आपल्या मर्जीने इतर गरजूंना यथाशक्ती अन्नदान, धान्यदान करून तसेच दान-दक्षिणा देऊन व्रताची समाप्ती करावी.

कोणतेही दुष्कर्म करू नये

प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी फलाहार करून राहावे. फक्त फळे खावी आणि पाणी प्यावे. कोणतेही दुष्कर्म करू नये. कोणालाही दूषणे लावू नये. खोटे बोलू नये. शरीराला अपायकराक असलेली धूम्रपान, मद्यपान, अंमली पदार्थ, तंबाखू, मावा, गुटखा ही किंवा अशा स्वरुपाची व्यसने करू नये. कायदे-नियम यांचे पालन करावे उल्लंघन करू नये. वाद घालू नये. कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे मानसिक संतुलन ढळू देऊ नये.

पुण्याची प्राप्ती

प्रबोधिनी एकादशीच्या व्रताचे योग्य प्रकारे पालन केले तर पुण्याची प्राप्ती होते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद लाभतात.

Numerology: खूपच शक्तिशाली आणि शुभ मानला जातो हा आकडा, तुमची जन्मतारीख देखील तीच आहे?

Grah Gochar November 2022:  नोव्हेंबर महिन्यात एका राशीत शुक्र आणि बुध होणार गोचर, या चार राशीच्या लोकांना होणार धनलाभ

एकादशी म्हणजे काय?

एकादशी हा हिंदू पंचांगाप्रमाणे प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला (पंधरवड्यातला) अकरावा दिवस आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यातल्या दोन पंधरवड्यांत (पक्षांत) प्रत्येकी एक अशा प्रकारे दोन वेळा एकादशी येते. मध्य प्रदेशात आणि उत्तर प्रदेशात महिन्यातला कृष्ण पक्ष शुक्ल पक्षाच्या आधी येत असल्याने कृष्ण पक्षात येणारी विशिष्ट नावाची एकादशी नंतरचे नाव असलेल्या महिन्यात येते. उदा : ज्या दिवशी महाराष्ट्रात आषाढ महिन्यातील कामिका एकादशी असते, त्यादिवशी मध्य प्रदेशात श्रावण महिन्यातली कामिका एकादशी असते. हा प्रकार शुक्ल एकादशींच्या बाबतीत होत नाही.

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी