Brahma Vaivarta Purana: ब्रह्मवैवर्त पुराणातील या गोष्टी जीवनात आचरणात आणल्याने मान-सन्मान वाढेल

आध्यात्म
Updated May 09, 2022 | 14:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

Brahma Vaivarta Purana | ब्रह्मवैवर्त नावाच्या पुराणात भगवान श्रीकृष्णाला या विश्वाचा निर्माता मानले गेले आहे. अशा अनेक गोष्टी आणि नियम या पुराणात सांगितले आहेत जे मानवी जीवनासाठी आवश्यक आहेत.

Practicing these things in Brahmavaivarta Purana will increase respect
ब्रह्मवैवर्त पुराणातील या गोष्टींनी मान-सन्मान वाढेल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ब्रह्मवैवर्त नावाच्या पुराणात भगवान श्रीकृष्णाला या विश्वाचा निर्माता मानले गेले आहे.
  • सकाळी सूर्योदय पाहणे शुभ असते त्यामुळे कोणत्याही कामात यश मिळते.
  • पुरुषाने परक्या स्त्रीकडे कधीही वाईट नजरेने पाहू नये किंवा तिचा अपमान करू नये.

Brahma Vaivarta Purana | मुंबई : ब्रह्मवैवर्त नावाच्या पुराणात भगवान श्रीकृष्णाला या विश्वाचा निर्माता मानले गेले आहे. अशा अनेक गोष्टी आणि नियम या पुराणात सांगितले आहेत जे मानवी जीवनासाठी आवश्यक आहेत. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात काही गोष्टींचा अवलंब केला तर प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्यासोबतच मान-सन्मानातही वाढ होते. (Practicing these things in Brahmavaivarta Purana will increase respect). 

अधिक वाचा : मदरशात 11 वर्षाच्या मुलावर अत्याचार

 
१) या गोष्टी जमिनीवर ठेवू नका - ब्रह्मवैवर्त पुराणानुसार यज्ञातील वस्तू, पूजेचे दिवे, देवतांच्या मूर्ती किंवा फोटो, सोन्याच्या वस्तू, शंख आणि शिवलिंग कधीही जमिनीवर ठेवू नयेत. या गोष्टी नेहमी जमिनीपेक्षा उंच ठिकाणी ठेवाव्यात. जर कधी जमिनीवर ठेवावे लागले तर आधी त्याखाली थोडे कापड अंथरावे. त्यांना मोकळ्या जागेवर ठेवणे अपमानास्पद असल्याचे मानले जाते.

२) सूर्य किंवा चंद्र मावळताना पाहू नका - ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितले आहे की, सकाळी सूर्योदय पाहणे शुभ असते त्यामुळे कोणत्याही कामात यश मिळते. तसेच मनुष्याने कधीच सूर्य आणि चंद्र मावळताना पाहू नये कारण यामुळे जीवनात नकारात्मका येते आणि आर्थिक समस्यांना सामोर जावे लागण्याची शक्यता असते. 

३) परक्या स्त्रीला वाईट नजरेने पाहू नये - पुरुषाने परक्या स्त्रीकडे कधीही वाईट नजरेने पाहू नये किंवा तिचा अपमान करू नये. कारण या गोष्टी तुम्हाला अपयशाकडे घेऊन जातात. तसेच ब्रह्मवैवर्त पुराणानुसार जो व्यक्ती दुसऱ्यांच्या स्त्रीवर वाईट नजर टाकतो त्याला समाजात कधीच मान-सन्मान मिळत नाही आणि त्याच्या आयुष्यात गरिबी वास करते. याउलट ज्या व्यक्तीचे आयुष्यात आपल्या स्त्रीवर प्रेम असते तो पुरूष तिचा आदर करण्याबरोबरच इतर स्त्रियांचाही आदर करतो, त्याच्याकडे सर्वजण आदराने पाहतात आणि असे लोक खूप प्रगती करतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी