Vastu Shastra:या दिशेला घड्याळ लावल्याने चमकणार तुमचे नशीब

आध्यात्म
Updated Jun 01, 2022 | 13:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

Clock Direction in vastu Shastra: घड्याळ आपल्याला नेहमी योग्य वेळ सांगते. याशिवाय याचा प्रभाव आपल्या जीवनावरही होत असतो. योग्य दिशेला घड्याळ असल्यास त्याचा सकारात्मक परिणम आपल्यावर होते. 

clock
Vastu Shastra:या दिशेला घड्याळ लावल्याने चमकणार तुमचे नशीब 
थोडं पण कामाचं
  • घरात तसेच ऑफिसमध्ये योग्य दिशेला असावे घड्याळ
  • घड्याळ केवळ वेळच दाखवत नाही तर जीवनावरही परिणाम करते
  • योग्य दिशेला लावलेले घड्याळ व्यक्तीला शक्तीशाली बनवते. 

मुंबई: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वेळेला(time) अतिशय महत्त्व आहे. वेळेशिवाय कोणतेच काम पूर्ण होत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती ही वेळेनुसार चालते. घड्याळ ही प्रत्येकासाठी अतिशय गरजेची अशी वस्तू आहे. घड्याळ(clock) केवळ आपल्याला वेळच दाखवत नाही तर त्याचा आपल्या जीवनावरही परिणाम होतो. योग्य दिशेला लावलेले घड्याळ व्यक्तीला शक्तीशाली बनवतात आणि त्या व्यक्तीचे नशीबही बदलते. मात्र जर हे चुकीच्या जागी लावले तर त्या व्यक्तीच्या जीवनावर अशुभ प्रभाव पडतो.Proper Clock Direction in vastu Shastra 

अधिक वाचा - यंदा या दिवशी आहे गायत्री जयंती, जाणून घ्या योग्य मुहूर्त

दक्षिण दिशेला घड्याळ लावू नये

वास्तुशास्त्रानुसार घड्याळ कधीही दक्षिण दिशेला लावू नये. दक्षिण दिशेला घड्याळ लावणे अशुभ मानले जाते. या दिशेला घड्याळ लावल्याने घरात नकारात्मक उर्जा येते. व्यक्तीच्या आयुष्यावरही वाईट परिणाम होतो. 

दरवाजाच्या वर घड्याळ लावू नये

याशिवाय घराच्या कोणत्याही दरवाजाच्या वर घड्याळ लावू नये. वास्तुशास्त्रानुसार ही जागा योग्य नाही. असे केल्याने दरवाजाखालून जाणाऱ्या व्यक्तीवर याचा परिणाम होतो. 

या दिशेला घड्याळ लावणे शुभ

घड्याळ लावण्यासाठीची योग्य दिशा म्हणजे पूर्व दिशा. वास्तुनुसार पूर्व दिशेला घड्याळ लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक उर्जा येते. तसेच लक्ष्मी मातेचे आगमन होते. याशिवाय घड्याळ पश्चिम दिशेला लावणेही शुभ मानले जात नाही. 

अधिक वाचा - मुलांसाठी या ४० टोपणनावांमधील निवडा एक नाव, वाचा सविस्तर

ड्रॉईंग रूमम अथवा बेडरूममध्ये येथे लावा घड्याळ

तसेच जर ड्रॉईंग रूम अथवा बेडरूममध्ये घड्याळ लावायचे असेल तर असे लावा ज्यामुळे रूममध्ये प्रवेश करताना नजर घड्याळावर पडेल. दरम्यान, घड्याळावर धूळ जमू देऊ नका. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी