तिजोरीत या धातूची वीट ठेवल्यानं उघडेल नशिबाचे दार, जाणून घ्या का ठेवली जाते वीट

आध्यात्म
भरत जाधव
Updated Jul 05, 2022 | 08:53 IST

प्रत्येक घराचा पाया विटांनी घातला जातो. त्याच वेळी, जुन्या काळात लोक त्यांच्या घराच्या पायामध्ये चांदीच्या विटा बसवत. असे मानले जाते की जर घराचा पाया चांदीच्या विटेने घातला गेला तर घरात सुख-शांती तर येतेच पण समृद्धीही राहते. दरम्यान, हिंदू धर्मानुसार चांदीची वीट अत्यंत महत्त्वाची आणि विशेष आहे. पण आज आपण तिजोरीत काही वीट ठेवण्याबद्दल बोलत आहोत.

find out why the silver brick is kept in safe
तिजोरीत या धातूची वीट ठेवल्यानं उघडेल नशिबाचे दार   |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • हिंदू धर्मानुसार चांदीची वीट अत्यंत महत्त्वाची आणि विशेष आहे.
  • घराचा पाया चांदीच्या विटेने घातला, तर घरात सुख-शांती तर राहते.
  • तिजोरीत चांदीची वीट ठेवल्यास त्यातून धनाची कमतरता भासत नाही.

नवी दिल्ली : प्रत्येक घराचा पाया विटांनी घातला जातो. त्याच वेळी, जुन्या काळात लोक त्यांच्या घराच्या पायामध्ये चांदीच्या विटा बसवत. असे मानले जाते की जर घराचा पाया चांदीच्या विटेने घातला गेला तर घरात सुख-शांती तर येतेच पण समृद्धीही राहते. दरम्यान, हिंदू धर्मानुसार चांदीची वीट अत्यंत महत्त्वाची आणि विशेष आहे. पण आज आपण तिजोरीत काही वीट ठेवण्याबद्दल बोलत आहोत. हो काही लोक घरातील तिजोरीत चांदीची वीट ठेवतात. यामागील काय कारण आहे यांची माहिती आपण आज घेणार आहोत. 

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की काही लोकांच्या तिजोरीत चांदीची वीट असते आणि ती वीट पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की ती वीट ठेवण्यामागची कारणं काय आहेत.  त्याबद्दल जाणून घ्या...

चांदीच्या विटा तिजोरीत ठेवल्याने काय होतो फायदा 

  • घराचा पाया चांदीच्या विटेने घातला, तर घरात सुख-शांती तर राहते.
  • तिजोरीत चांदीची वीट ठेवल्यास त्यातून धनाची कमतरता भासत नाही, असे मानले जाते. तिच्या घरात पैसा नेहमीच स्थिर असतो. चांदीची वीट ठेवून तिजोरी कधीच रिकामी होत नाही.
  • तिजोरीत चांदीची वीट ठेवल्यास नात्यात गोडवा येतो. लोकांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम वाढते.
  • चांदीची वीट वैवाहिक जीवनात सुख-शांती आणते. अशा परिस्थितीत पती पत्नीला चांदीची वीटही भेट देऊ शकतो.
  • जर तुम्हाला मुलांच्या करिअरची चिंता वाटत असेल किंवा त्यांच्या नोकरीचा ताण वाटत असेल तर अशा परिस्थितीत तुमच्या मुलाला चांदीची वीट द्या किंवा त्याच्या डोक्यावर चांदीची वीट ठेवा. असे केल्याने मुलाच्या करिअरमध्ये प्रगती होईल.

टीप – या लेखात दिलेली माहिती गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाउ याची पुष्टी करत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी