Maha Shivratri 2023, 12 Jyotirlinga: येत्या 18 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. शिवभक्तांसाठी हा सण खूप खास आहे आणि भक्त मंदिरात जाऊन दर्शन घेतात. भारतात शंकराची अनेक प्राचीन मंदिरे आहेत. 12 शिव ज्योतिर्लिंग या मंदिरांपैकी प्रसिद्ध आहेत आणि महाशिवरात्रीच्या आधी आयआरसीटीसीने शिवभक्तांसाठी खास भेट दिली आहे.
खरतरं आयआरसीटीसीने 12 शिव ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जे इच्छुक आहेत त्यांचासाठी एक टूर पॅकेज काढले आहे. या पॅकेज मार्फत तुम्ही ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, सोमनाथ ज्योतिर्लिंग, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, भीमाशंकर ज्योतिर्लिंग, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग, परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग, मल्लिकार्जुन स्वामी ज्योतिर्लिंग याठिकाणी जाऊन दर्शन घेऊ शकता.
आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेजचे नाव MahaShivratri Nava Jyotirlinga Yatra SZBD384 असे आहे. हे टूर पॅकेज पुढील महिन्याच्या 8 मार्चपासून चालू होईल. तसेच यात 12 रात्री आणि 13 दिवसांचा समावेश आहे. या पॅकेजची सुरूवात मदुराईपासून होईल. या टूरमध्ये तिरुनेलवेली, मदुरै, डिंडीगुल, इरोड, सलेम, जोलारपेट्टई, काटपाडी, पेरंबूर,नेल्लोर या स्थानकांचा समावेश आहे. या टूर पॅकेजची किंमतही परवडेल अशी आहे. 15,350 रूपये आहे. तुम्ही स्लीपर कोचनेही प्रवास करू शकता. यासोबतच जेवनाची पण उत्तम सोय आहे.
जर तुम्हाला हे पॅकेज बूक करायचे असल्यास तुम्ही विभागीय कार्यालयातूनही करू शकता आणि आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर ही उपलब्ध आहे.