Happy Raksha Bandhan 2022 Marathi Messages : रक्षाबंधन निमित्त Facebook, Instagram, WhatsApp, Twitter आणि Social  Media वर शेअर करा मराठी संदेश

Happy Rakhi Purnima 2022 Marathi Messages : आज आहे रक्षाबंधन, बहीण आणि भावाचे हे पवित्र नाते असते त्यासाठी रक्षाबंधन हा साजरा केला जातो. श्रावण हा हिंदूसांठी पवित्र महिना आहे. त्यात हा सण येतो. संस्कृतमध्ये रक्षण या शब्दाला रक्षा असे म्हणतात तर मराठी राखी हा श्ब्द प्रचलित आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भावाने आपले रक्षण करावे असे वचन मागते.

rakshabandhan marathi messages
रक्षाबंधन मराठी संदेश  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज आहे रक्षाबंधन.
  • या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि आपल्या रक्षणाचे वचन घेते.
  • या निमित्ताने मराठी संदेश पाठवून रक्षाबंधन साजरी करा.

Happy Raksha Bandhan 2022 Marathi Messages : आज आहे रक्षाबंधन, बहीण आणि भावाचे हे पवित्र नाते असते त्यासाठी रक्षाबंधन हा साजरा केला जातो. श्रावण हा हिंदूसांठी पवित्र महिना आहे. त्यात हा सण येतो. संस्कृतमध्ये रक्षण या शब्दाला रक्षा असे म्हणतात तर मराठी राखी हा श्ब्द प्रचलित आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भावाने आपले रक्षण करावे असे वचन मागते. पूर्वी फक्त उत्तर भारतात हा सण साजरा केला जातो. आता भारतासह अनेक देशातही हा सण साजरा केला जातो. या रक्षाबंधनानिमित्त आपल्या बहीणीला किंवा भावाला रक्षाबंधनाचे मराठी संदेश पाठवून शुभेच्छा द्या.

रक्षाबंधनाचे मराठीतून शुभेच्छा संदेश (Raksha Bandhan 2022 Marathi Messages ) 

बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,

बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती….

औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती…..

रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती….

बंधन असूनही, बंधन हे थोडेच,

या तर हळव्या रेशीमगाठी…….

रेशमी धाग्यात रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..

दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…

राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन

घेऊन आला हा श्रावण

लाख लाख शुभेच्छा तुला

आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

सोबत वाढले सोबत खेळले

प्रेमात न्हाले बालमन

याच प्रेमाची आठवण म्हणून

आला हा रक्षाबंधनाचा सण

दृढ बंध हा राखीचा,

दोन मनांचं अतूट एक बंधन आहे..

हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलणारं,

अलवार स्पंदन आहे…

थोडी लढणारी थोडी भांडणारी

थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी

मस्ती करणारी एक बहीण असते

तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी