Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाला लक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद अन् लाभेल उत्तम आरोग्य, राखी बांधण्यापूर्वी करावे लागेल हे काम

आध्यात्म
भरत जाधव
Updated Aug 10, 2022 | 14:48 IST

रक्षाबंधन (Raksha Bandhan) हा सण (festival) भाऊ-बहिणीच्या (brothers and sisters) प्रेमाचे प्रतीक आहे. या दिवशी बहिणी शुभ मुहूर्तावर भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्याची कामना करतात. त्याच वेळी, भाऊ देखील त्यांच्या बहिणींना भेटवस्तू (gifts) देतात आणि त्यांचे आयुष्यभर संरक्षण करण्याचे वचन देतात. रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण (Shravan) महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. यावेळी 11 ऑगस्ट रोजी म्हणजेच उद्याच राखीचा सण साजरा होत आहे.

Rakshabandhan will get blessings of Lakshmi and get good health
रक्षाबंधनाला लक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद अन् लाभेल उत्तम आरोग्य  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण (Shravan) महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो.
  • रक्षाबंधनाबाबत धार्मिक ग्रंथांमध्ये अनेक प्रकारच्या कथा सांगण्यात आल्या आहेत.
  • राखी बांधण्यापूर्वी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने आरोग्याचे वरदान मिळते.

Raksha Bandhan Puja: रक्षाबंधन (Raksha Bandhan) हा सण (festival) भाऊ-बहिणीच्या (brothers and sisters) प्रेमाचे प्रतीक आहे. या दिवशी बहिणी शुभ मुहूर्तावर भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्याची कामना करतात. त्याच वेळी, भाऊ देखील त्यांच्या बहिणींना भेटवस्तू (gifts) देतात आणि त्यांचे आयुष्यभर संरक्षण करण्याचे वचन देतात. रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण (Shravan) महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. यावेळी 11 ऑगस्ट रोजी म्हणजेच उद्याच राखीचा सण साजरा होत आहे.

रक्षाबंधनाबाबत धार्मिक ग्रंथांमध्ये अनेक प्रकारच्या कथा सांगण्यात आल्या आहेत. यातील एक कथा देवी लक्ष्मीच्या पूजेशी संबंधित आहे. राखी बांधण्यापूर्वी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने आरोग्याचे वरदान मिळते, असे मानले जाते. विष्णूची पूजा केल्यानं भाऊ आणि बहीण या दोघांच्याही आयुष्यात आनंद येत असतो.

Read Also : अंगणवाडी शिक्षिकेनं मुलासोबत पास केली लोकसेवा आयोगाची Exam

रक्षाबंधनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याचा नियम 

रक्षाबंधनात भावाला राखी बांधण्यापूर्वी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करण्याचा नियम आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी लक्ष्मीसह देवी-देवतांची पूजा करणे शुभ मानले जाते, असे केल्याने भाऊ-बहिणीचे नाते अतूट राहते आणि जीवनात यश व प्रगती मिळते असे म्हणतात.

Read Also : खड्ड्यातील पाण्याने आंघोळ करत एका पायावर केली तपश्चर्या

अशी करा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा 

भावाच्या मनगटावर राखी बांधण्यापूर्वी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करावी. धार्मिक ग्रंथानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी कनकधारा स्तोत्र आणि विष्णु सहस्रनामाचे पठण करावे. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि दोन्ही भावा-बहिणींना निरोगी आरोग्य लाभत असते. दरम्यान भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यानं दोघांच्या नात्यात गोडवा येतो आणि जीवनात यश मिळत असते.

श्रीकृष्णाला राखी बांधा

रक्षाबंधनाला भावा राखी बांधण्याआधी भगवान श्रीकृष्णाला राखी बांधा. धर्मग्रंथात असे सांगितले आहे की श्रीकृष्णाने द्रौपदीला बहीण मानले आणि जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होते तेव्हा भगवान श्रीकृष्णानेच तिचे रक्षण केले. अशा स्थितीत श्रीकृष्णाला राखी बांधणे शुभ मानले जाते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाउ याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी