Ram Navami 2022 Date: कधी आहे यंदा राम नवमी; जाणून घ्या राम जन्माची वेळ, पूजेचा मुहूर्त 

Ram Navami Date in marathi। रामनवमी उत्सवाची सुरुवात सूर्याला अर्घ्य देऊन आणि दिनकराच्या सकाळी आशीर्वादाने होते.  राम हे सूर्यवंशी होते, ते सूर्याचे वंश असल्याने सूर्याला पाणी अर्पण केले जाते. 

ram navami 2022 date know ram janma and puja timings here in marathi
कधी आहे यंदा राम नवमी; जाणून घ्या राम जन्माची वेळ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गुढी पाडव्याच्या नवव्या दिवशी राम नवमी (Ram Navami) साजरी केली जाते.
  • नव वर्षातील पहिल्या महिना चैत्रातील नवमी ही राम नवमी अर्थात श्रीरामाचा जन्म दिवस म्हणून साजरा केल जातो.
  •  यंदा तिथीनुसार हा राम नवमीचा सोहळा 10 एप्रिल दिवशी साजरा केला जाणार आहे.

Ram Navami Date in marathi। मुंबई : हिंदू आणि मराठी नूतन वर्षाची सुरूवात गुढी पाडवा यालाच चैत्र पाडवा म्हणतात. (Chaitra Padwa) या  दिवसाने होते. गुढी पाडव्याच्या नवव्या दिवशी राम नवमी (Ram Navami) साजरी केली जाते. (ram navami 2022 date know ram janma and puja timings here in marathi )

अधिक वाचा :  हा विकेटकिपर फलंदाज करणार पंतचा पत्ता कट

नव वर्षातील पहिल्या महिना चैत्रातील नवमी ही राम नवमी अर्थात श्रीरामाचा जन्म दिवस म्हणून साजरा केल जातो.  यंदा तिथीनुसार हा राम नवमीचा सोहळा 10 एप्रिल दिवशी साजरा केला जाणार आहे. देशभर कोरोना संकट आटोक्यात असल्याने यावर्षी दोन वर्षांनंतर देशात पुन्हा मोठ्या जल्लोषात राम नवमी साजरी केली जाणार आहे. त्यासाठी रामाचे भक्त जय्यत तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रातही सारे कोविड 19 निर्बंध उठवण्यात आल्याने यंदा राज्यातही राम नवमी मोठ्या मंगलमय वातावरणामध्ये साजरी केली जाईल. 

अधिक वाचा : हातात आणि पायात काळे धागे बांधणे वाईट की चांगलं, वाचा

राम नवमी 2022 कधी... 

  1. राम नवमी दिवशी श्रीरामाचा जन्म मध्यान्ह म्हणजेच दुपारी 12 च्या सुमारास साजरा केला जातो. पाळणा गाऊन तान्ह्या रामाला पाळण्यात झोपवून त्याचा जन्म सोहळा दरवर्षी साजरा करण्याची पद्धत आहे.
  2. यंदा राम नवमी तिथी 10 एप्रिल दिवशी पहाटे 1 वाजून 23 मिनिटांनी सुरू होणार असून समाप्ती 11 एप्रिल दिवशी पहाटे 3 वाजून 15 मिनिटांनी होणार आहे.
  3. राम नवमी दिवशी रामायण वाचले जाते तर कुठे नाटीका सादर करण्याची रीत आहे. यानिमित्त रामायणातील काही प्रसंग लहान नाटीकेच्या रूपात सादर केल्या जातात. रामभक्त दिवसभर व्रत करतात. राम जन्म साजरा करताना खीरीचा गोड नैवेद्य बनवण्याची देखील रीत आहे.
  4. दुपारी १२ वाजता राम जन्म झाला की प्रसाद म्हणून सुंठवडा वाटला जातो. हा सुंठवडा हा फक्त राम जन्म आणि हनुमान जयंतीला प्रसाद म्हणून वाटला जातो.
  5. रामनवमी उत्सवाची सुरुवात सूर्याला अर्घ्य देऊन आणि दिनकराच्या सकाळी आशीर्वादाने होते.  राम हे सूर्यवंशी होते, ते सूर्याचे वंश असल्याने सूर्याला पाणी अर्पण केले जाते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी