ram navami 2023 Messages in marathi : चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी हिंदू पंचागानुसार खूपच महत्त्वाचा दिवस असतो. हा दिवस प्रभू रामचंद्र यांचा जन्मदिवस असून या दिवसाला श्रीरामनवमी असेही म्हणतात. यंदा 30 मार्च 2023 रोजी रामनवमी आहे. (Ram Navami 2023 Whatsapp Status Whatsapp stickers messages wishes in marathi)
ज्याप्रमाणे कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता झाला तसेच प्रभू रामाचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी 12 वाजता झाला असे म्हणतात. रामनवमीच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. राम मंदिरात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा करण्यात येत असतो. मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. रामनवमी निमित्त शुभेच्छापत्रं, Wishes, Greetings, Whatsapp Stickers, Images तुम्ही सोशल मीडियाद्वारे शेअर करु शकता.