नवरात्रीत (Navratri) दुर्गादेवीला (goddess Durga) प्रसन्न करण्यासाठी भक्तगण अनेक प्रयत्न करतात. देवीच्या आगमनाच्या वेळी जर आपण मुख्य दरवाजाबाहेर (main door) आणि देवघराच्या समोर रांगोळी (Rangoli) काढली तर आपल्याला देवीचा आशीर्वाद भरभरून मिळेल. देवीचे स्वागत (welcoming the deity) करण्यासाठी रांगोळी काढणे हा सर्वात सोपा उपाय आहे. धार्मिक दृष्टीनेही रांगोळीचे (religious importance) महत्व खूप असते. ती शुभतेचे प्रतीक (symbol of auspiciousness) असते आणि तिच्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा (positive energy) वास होतो. देवीच्या पूजेसाठी आपण घरात सहज रांगोळी काढू शकता. फूल (flowers), रंगीत तांदूळ (colorful rice) किंवा पिठासोबतच (flour) आपण रंगीत रांगोळीनेही ही नक्षी काढू शकतो. बांगड्या (bangles), पेन (pen) किंवा चमच्याच्या (spoons) सहाय्याने आपण रांगोळी काढू शकता. आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत काही सोप्या आणि सुंदर रांगोळीच्या डिझाईन्स.
खडूने रांगोळीची डिझाईन तयार करा आणि त्यावर झेंडू, मोगरा, गुलाबाच्या फुलांनी आणि पाकळ्यांनी सजावट करा. हा रांगोळी सजवण्याचा सर्वात सोपा आणि सुंदर मार्ग आहे. आपण फुलाच्या पाकळ्यांनी देवघर आणि घराचे प्रवेशद्वारही सजवू शकता. फुले ही रांगोळीच्या पावित्र्यासह सुगंधही देतात.
देवीच्या स्वागतासाठी आपण पीठ किंवा तांदूळ रंगवून त्यानेही रांगोळी काढू शकता. स्वस्तिक काढणे हे सर्वात सोपे असते. आपण स्वस्तिक रांगोळीत सजवून फुले आणि रंगीत तांदळांनी त्याची सजावट करू शकता.
बाजारात अगदी सहज स्पार्कल कलर मिळतात. आपण दोन किंवा तीन रंग एकत्र करून कोणतीही रांगोळी सहज काढू शकता. ही रांगोळी दिसायलाही सुंदर दिसते आणि अनेक दिवस तशीच टवटवीत दिसते.
रांगोळी काढण्यासाठी आपण चमच्याचाही वापर करू शकता. यासाठी रंगीत रांगोळी गोलाकारात भरा. आता चमच्याने फुलाच्या पाकळीसारखे आकार करत फुलासारखी रांगोळी काढा. हल्ली बाजारात रांगोळीचे स्टेन्सिल्सही मिळतात. आपण त्यांचाही वापर करू शकता.
कोणत्याही रंगाची रांगोळी घ्या आणि त्याला बांगड्यांच्या मदतीने गोल आकार द्या. आता यावर कोणतेही डिझाईन काढण्यासाठी पेन्सिलचा वापर करा. ही रांगोळी सुंदर दिसते आणि सोप्याने काढताही येते.
मग वाट कशाची पाहताय? देवीच्या आगमनाच्या शुभसकाळी स्नानादिक आन्हिके उरकून आवर्जून रांगोळी काढा आणि देवीला प्रसन्न करा.