Astrology News In Marathi | मुंबई : यंदाच्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण शनिवारी ३० एप्रिल रोजी होणार आहे. या दिवशी शनि अमावस्येचा योगही तयार होत आहे. आगामी शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनि अमावस्या किंवा शनिचरी अमावस्या असेही म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण आणि शनि अमावस्या एकाच दिवशी पडणे अत्यंत शुभ मानले जाते. लक्षणीय बाब म्हणजे अनेक वर्षांनी हा योगायोग घडत आहे. हा संयोग सर्व १२ राशींवर परिणाम करणारा ठरणार आहे. चला तर म जाणून घेऊया या संयोगाचा कोणत्या राशीला किती फायदा होणार आहे. (Rare combination of solar eclipse and Saturn lunar eclipse on April 30).
१) मिथुन राशी - हा संयोगातील काळ मिथुन राशीतील लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. या दरम्यान नवीन कार्य हाती घेण्याचा विचार तुमच्या मनात येऊ शकतो, ज्याचा भविष्यात तुम्हाला खूप फायदा होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसेच कामाच्या ठिकाणी बदलाची शक्यता आहे. या काळात आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरवर्गातील लोकांच्या उत्पन्नात वाढ आणि प्रमोशन होण्याची शक्यता आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. रवि आणि बुध यांच्यात मैत्रीची भावना असेल तर तुम्हाला शुभ परिणाम मिळतील.
२) धनु राशी - धनु राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण शुभ असणार आहे. या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यवसायात एखादी मोठी डील फायनल होऊ शकते. दीर्घकाळ प्रलंबित राहिलेले अथवा कुठे अडकलेले पैसे मिळू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. गुरु हा धनु राशीचा अधिपती ग्रह आहे. ज्योतिष शास्त्रानुसार गुरु आणि सूर्य यांच्यात मैत्रीची भावना आहे, त्यामुळे हा संयोगाचा काळ तुमच्यासाठी चांगले परिणाम देईल.
३) कर्क राशी - कर्क राशीच्या लोकांमध्ये सूर्यग्रहणाचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. या संयोगाच्या क्रियेमुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. व्यावसायिकांना मोठा फायदा होऊ शकतो. आईची साथ मिळेल. या काळात तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल आहे. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते.