vastutips घरात या दिशेला देवी लक्ष्मीचा फोटो ठेवल्याने होईल आर्थिक भरभराट

read vastutips in marathi : देवीची लक्ष्मीची कृपा राहावी यासाठी काही सोपे घरगुती उपाय केले तर लाभ होऊ शकतो. घरात विशिष्ट दिशेला देवी लक्ष्मीची प्रतिमा ठेवल्यास लाभ होतो, असे सांगतात. 

read vastutips in marathi keep photo of Goddess Lakshmi in this direction in the house will bring financial prosperity
vastutips घरात या दिशेला देवी लक्ष्मीचा फोटो ठेवल्याने होईल आर्थिक भरभराट  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • vastutips घरात या दिशेला देवी लक्ष्मीचा फोटो ठेवल्याने होईल आर्थिक भरभराट
  • देवी लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी 
  • लक्ष्मीची प्रतिमा घरात कुठे लावावी?

read vastutips in marathi keep photo of Goddess Lakshmi in this direction in the house will bring financial prosperity : प्रत्येकाला वैयक्तिक आयुष्यात कधी ना कधी अडचणींना सामोरे जावे लागते. याच कारणामुळे प्रत्येकाची इच्छा असते की आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा राहावी. देवीची लक्ष्मीची कृपा असेल तर आर्थिक अडचणी जाणवत नाही आणि काही अडचणी आल्या तर त्या लवकर दूर होतात. यामुळेच देवी लक्ष्मीची कृपा राहावी असे प्रत्येकाला वाटते. 

देवीची लक्ष्मीची कृपा राहावी यासाठी काही सोपे घरगुती उपाय केले तर लाभ होऊ शकतो. घरात विशिष्ट दिशेला देवी लक्ष्मीची प्रतिमा ठेवल्यास लाभ होतो, असे सांगतात. 

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

Astro Tips: पायात सोन्याचे दागिने घातल्यानं येते गरिबी; पैसा मिळण्यासाठी करावी लागेल पळ-पळ, तरीही हाती येणार नाही रुपया

Surya Gochar 2022: 'या' 5 राशींचे नशीब 'सूर्या'सारखे चमकेल, 30 दिवसात मिळेल सर्व काही

देवी लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी 

वास्तुशास्त्रात देवी लक्ष्मीची कृपा राहावी यासाठी काही सूचना करण्यात आल्या आहेत. घरात योग्य दिशेला लक्ष्मीची प्रतिमा ठेवली तर आर्थिक अडचणी दूर होतील, अडचणी सुटण्यास मदत होईल; असे वास्तुशास्त्र सांगते. लक्ष्मीची प्रतिमा ठेवण्याची दिशा चुकली तर आर्थिक अडचणी येऊ शकतात. आर्थिक नुकसान होऊ शकते, असा धोक्याचा इशारा पण वास्तुशास्त्र देते. 

लक्ष्मीची प्रतिमा घरात कुठे लावावी?

वास्तुशास्त्रानुसार घरात लक्ष्मीची प्रतिमा पश्चिम दिशेच्या कोपऱ्यात लावावी. यामुळे देवी लक्ष्मीचा चेहरा पूर्व दिशाभिमुख होतो. यामुळे संबंधित घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच अनेक आर्थिक अडचणी दूर होतात. लक्षात ठेवा कमळाच्या फुलात बसलेली प्रसन्न मुद्रेची देवी लक्ष्मी आणि तिच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी एक या पद्धतीने दोन हत्ती सोंडेतून सुवर्णमुद्रांची वर्षा करत असतील तर हा फोटो पश्चिम दिशेच्या कोपऱ्यात ठेवावा. फोटोतील देवी लक्ष्मीचा चेहरा पूर्व दिशाभिमुख ठेवावा. वास्तुशळास्त्रानुसार या कृतीमुळे संबंधित घर आणि त्या घरातील सदस्य यांच्यावर देवी लक्ष्मीची कृपा राहते. आर्थिक अडचणी दूर होतात. मोठ्या अडचणी दूर होण्यास मदत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी