सूर्याला अर्घ्य देताना करा 'या' मंत्राचं पठण, तुमच्या मनोकामना होतील पूर्ण

आध्यात्म
Updated Oct 22, 2019 | 11:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

सूर्य उपासनेमुळे मानवला जीवन यश, धन-संपत्ती, सुख-शांती प्राप्त होते असं शास्त्रात म्हटलं आहे. रविवारी सूर्य उपासना केल्यास त्याचा बराच फायदा होतो. 

reading the mantra while praying to the sun, your desires will be fulfilled
सूर्याला अर्घ्य देताना करा 'या' मंत्राचं पठण, तुमच्या मनोकामना होतील पूर्ण  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • सूर्याला अर्घ्य दिल्याने जीवनात समृद्धी प्राप्त होते
  • अर्घ्य देणाऱ्या भांड्यामध्ये लाल फूल आणि अक्षता जरूर घ्या
  • सूर्याला अर्घ्य अर्पण करताना विशेष मंत्र पठण करणं फायदेशीर

मुंबई: सूर्य देवतेची मनोभावे पूजा केल्यास आणि त्यास अर्घ्य अर्पण केल्यास आपल्या मनोकामना निश्चित पूर्ण होतील. सूर्य उपासनेसोबतच आदित्यस्त्रोत्र देखील पाठ करणं आवश्यक आहे. कारण की, ते देखील लाभदायक आहे. जर आपल्या कुंडलीत सूर्य जर कमकुवत स्थानी असेल तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर झालेला दिसून येतो. त्यामुळे आपण कितीही मेहनत केली तरी आपल्याला अपेक्षित यश हे मिळतच नाही. 

हिंदू धर्मानुसार सूर्याला देवत्व प्रदान करण्यात आलं आहे. यामुळे दर रविवारी सूर्याची उपासना करणं गरजेचं आहे. जाणून घ्या सूर्याची उपासना कशी कस

रविवारी सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर सूर्य मंत्राचा जप करा. सूर्याची उपासना केल्याने बळ, बुद्धी, विद्या, वैभव, तेज आणि पराक्रम याची आपल्याला प्राप्ती होते असं शास्त्रात म्हटलं आहे. सूर्य देवतेची उपासना करण्यासाठी राष्ट्रवर्द्धन मंत्र देखील आहे. सूर्याला अर्घ्य देताना या मंत्राचं पठण केल्यास त्याचा फायदा होता. 

'उदसौ सूर्यो अगादुदिदं मामकं वच:। यथाहं शत्रुहोऽसान्यसपत्न: सपत्नहा।।
सपत्नक्षयणो वृषाभिराष्ट्रो विष सहि:। यथाहभेषां वीराणां विराजानि जनस्य च।।'

रविवारी सूर्याला अर्घ्य देणाऱ्या भांड्यात लाल रंगाचं फुल आणि अक्षता जरुर ठेवा. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ॐ सूयार्य नमः #chatpuja #bihar #festival #lordsurya #prayer #dighaghat #patna

A post shared by Vikash patel (@vikashthegodfather) on

या मंत्राचं देखील करा पठण: 

ध्येय सदा सविष्तृ मंडल मध्यवर्ती। नारायण: सर सिंजासन सन्नि: विष्ठ:।। केयूरवान्मकर कुण्डलवान किरीटी। हारी हिरण्यमय वपुधृत शंख चक्र।। जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महाधुतिम। तमोहरि सर्वपापध्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम।। सूर्यस्य पश्य श्रेमाणं योन तन्द्रयते। चरश्चरैवेति चरेवेति…!

१३ वेळा करा सूर्याला नमस्कार 

सूर्य नमस्कार १३ वेळा करणं आवश्यक आहे. प्रत्येक वेळेस सूर्याच्या १३ नावांचा जप करणं आवश्यक आहे. 

1. ॐ मित्राय नमः, 2. ॐ रवये नमः, 3. ॐ सूर्याय नमः, 4.ॐ भानवे नमः, 5.ॐ खगाय नमः, 6. ॐ पूष्णे नमः,7. ॐ हिरण्यगर्भाय नमः, 8. ॐ मरीचये नमः, 9. ॐ आदित्याय नमः, 10.ॐ सवित्रे नमः, 11. ॐ अर्काय नमः, 12. ॐ भास्कराय नमः, 13. ॐ सवितृ सूर्यनारायणाय नमः।

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी