Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला असावं घराचं मुख्य प्रवेशद्वार

आध्यात्म
Updated Jun 11, 2019 | 14:33 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

कोणत्याही घरातील प्रवेशद्वाराचं वास्तुशास्त्रानुसार खूप महत्त्व असतं.ज्योतिषशास्त्रानुसार घराचं मुख्य प्रवेशद्वार वास्तुशास्त्रानुसार बनवणं आवश्यक आहे.कारण त्यामुळंच घरात सुख-समृद्धी नांदते आणि संकटं येत नाहीत.

Vastu Tips- Main Door
घराचं प्रवेशद्वार कोणत्या दिशेला असावं, जाणून घ्या वास्तू टिप्स  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: साधारणपणे कोणत्याही घरी मग तो फ्लॅट असो किंवा बंगला घराला एक मुख्य प्रवेशद्वार असतं. प्रत्येकासाठी या प्रमुख दरवाज्याचं खूप महत्त्व असतं. घरात राहणारी माणसं प्रवेशद्वारानं घरात येत असतात. त्यासोबतच सर्व प्रकारची सकारात्मक ऊर्जा सुद्धा प्रवेशद्वारातून घरात येत असते.

ज्योतिषशास्त्रानुसार घराचं प्रमुख द्वार हे वास्तुनुसार बनवणं आवश्यक आहे. त्यामुळे घरात सुख-समृद्धी कायम राहते आणि कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही. मात्र घराचं प्रवेशद्वार बनवतांना वास्तुशास्त्रातील काही नियम पाळणं आवश्यक आहे. जाणून घ्या घरातील प्रवेशद्वाराचं महत्त्व आणि ते बनवतांना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे ते...

वास्तुशास्त्रानुसार एक महत्त्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी, घराचं प्रवेशद्वार उघडतांना किंवा बंद करतांना कोणत्याही प्रकारचा आवाज येऊ नये, नाहीतर कोणती तरी अशुभ बातमी मिळू शकते. अनेकदा ऑईलिंग न केल्यानं किंवा कोणत्याही कारणानं दाराचा करकर आवाज येत असतो. तर वास्तुशास्त्रानुसार दाराचा असा आवाज आल्यास लगेच त्यावर उपाय करावा, असा आवाज येणं योग्य नाही.

घरातील मुख्य दरवाजा संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी...

  • घराचं मुख्य प्रवेशद्वार हे नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला बनवावं.
  • घराच्या मुख्यदरवाज्याच्या अगदी समोर पायऱ्या असू नये.
  • घराचं मुख्य प्रवेशद्वार हे घराच्या मधोमध नसावं. घराच्या डाव्या किंवा उजव्या कोपऱ्यात ते असावं.
  • घराच्या मुख्य दरवाज्यासमोर झाड, भिंत किंवा खंबा नसावा, तो असेल तर तो काढून टाकावा. सोबतच वरील गोष्टींची सावली सुद्धा प्रवेशद्वारावर पडू नये, याकडे लक्ष द्यावं.
  • घराच्या प्रवेशद्वाराचा उंबरठा हा रस्त्याच्या उंचीपेक्षा अधिक उंच असावा.

घराचा दरवाजा नेहमी आतल्या बाजूनं उघडेल असाच असावा.

वास्तू शास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा असा बनवावा की, जो आतल्या बाजूनं उघडेल. बाहेरच्या बाजूनं उघडणारा दरवाजा घरासाठी अशुभ मानला जातो. जर आपल्या घराचा मुख्य दरवाजा बाहेरच्या बाजूनं उघडत असेल तर आपल्याला आर्थिक संकटासोबतच अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
तेव्हा आपलं नवीन घर बनवतांना किंवा घेतांना या सूचनांचा नक्की वापर करा.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार ‘या’ दिशेला असावं घराचं मुख्य प्रवेशद्वार Description: कोणत्याही घरातील प्रवेशद्वाराचं वास्तुशास्त्रानुसार खूप महत्त्व असतं.ज्योतिषशास्त्रानुसार घराचं मुख्य प्रवेशद्वार वास्तुशास्त्रानुसार बनवणं आवश्यक आहे.कारण त्यामुळंच घरात सुख-समृद्धी नांदते आणि संकटं येत नाहीत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola