शुक्रवारी गुळाचा हा उपाय केल्यानं लक्ष्मी माता होते प्रसन्न, जाणून घ्या कसा ते

आध्यात्म
Updated Jul 01, 2019 | 21:20 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

जीवनात सुख प्राप्त करण्यासाठी शुक्रवारी केलेला गुळाचा हा उपाय खूप यशस्वी ठरतो. लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी जाणून घ्या हे खास उपाय...

Ma Laxmi Gud
शुक्रवारी गुळाचा हा उपाय केल्यानं लक्ष्मी माता होते प्रसन्न  |  फोटो सौजन्य: Getty Images

शुक्रवारचा दिवस हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी जर आपण धन, संपत्ती, सन्मान आणि यशाची इच्छा बाळगली असेल आणि आयुष्यातील चढ-उतार आपल्याला दूर करायचे असतील, तर शुक्रवारी प्राचीनकाळापासून ज्योतिषांनी सांगितलेला हा उपाय करून बघा. शुक्रवारी लहानच्या गुळाचा हा उपाय आहे, ज्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल.

हा उपाय केल्यानं आपल्या घरावर लक्ष्मीची कृपा होईल आणि आयुष्य सुखमय होऊन जाईल. या उपायांचा कोणताही वैज्ञानिक आधार नाहीय, मात्र तरीही प्राचीनकाळापासून या उपायावर लोकांचा विश्वास अबाधित आहे.

जर आपण प्रत्येक शुक्रवारी देवळात जावून देवी लक्ष्मीची पूजा करता आणि प्रसाद अर्पण करत असाल तर आपलं काम अजूनच सोपी होईल. जर आपल्या घरात गूळ असेल तर या उपाय केल्यास आपलं नशीब चमकेल.

जाणून घ्या शुक्रवारी गुळाचा कोणता उपाय करावा

  • शुक्रवारी तुपाचं दान करावं, असं केल्यास आयुष्यात आनंद कायम राहतो आणि संपत्तीचा लाभ मिळतो.
  • जर आपल्याला अपघाताची भीती वाटत असेल तर तांब्याच्या भांड्यात गूळ ठेवून लक्ष्मीमातेच्या मंदिरात ते दान करावं. त्यानंतर मंदिरातच बसून लक्ष्मीदेवीची उपासना करावी, स्तोत्र म्हणावं. हे केल्यानं अचानक होणाऱ्या अपघातापासून आपला बचाव होऊ शकतो.
  • जर आपल्या कुंडलीतील सूर्य कमकुवत असेल तर शुक्रवारी गूळ खाऊन पाणी पिणं सुरू करावं.
  • जर शुक्रवारच्या दिवशी गूळ दान केलं तर यामुळे आपले पूर्वज आनंदी होतात आणि आपल्याला वैभवशाली होण्याचं वरदान देतात.
  • शुक्रवारी ब्राह्मण आणि गरीब व्यक्तींना धान्य आणि गूळ मिळून दान करावं. यामुळे जीवनात येणाऱ्या सर्व संकटांपासून सुटका होते.
  • यादिवशी काळे तीळ सुद्धा दान केले जातात. ते दान केल्यानंतर जीवनातील नकारात्मक शक्तीचा नाश होतो.
  • धनप्राप्तीसाठी शुक्रवारी उपवास ठेवावा. या दिवशी एक दक्षिणमुखी शंख पाण्यानं भरून त्यानं विष्णू देवाला अभिषेक करावा. असं सलग तीन शुक्रवारी न विसरता करावं, त्यानं देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
  • देवी लक्ष्मीची कृपा झाल्यास घरात धनसंपत्ती, वैभव आणि भरभराट होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
शुक्रवारी गुळाचा हा उपाय केल्यानं लक्ष्मी माता होते प्रसन्न, जाणून घ्या कसा ते Description: जीवनात सुख प्राप्त करण्यासाठी शुक्रवारी केलेला गुळाचा हा उपाय खूप यशस्वी ठरतो. लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी जाणून घ्या हे खास उपाय...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola