Ganga Dussehra 2022 Upay: गंगा दसरा महोत्सवाच्या दिवशी करा हे उपाय; कर्जमुक्ती, धनप्राप्तीसाठी होईल लाभ

आध्यात्म
Updated Jun 08, 2022 | 12:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ganga Dussehra 2022 Upay in Marathi | हिंदू धर्मामध्ये गंगाजल अत्यंत पवित्र मानले जाते. कोणत्याही शुभ आणि शुभ कार्यासाठी गंगाजलाचा वापर केला जातो. त्यामुळे गंगा दसरा हा पवित्र सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

Do this remedy on the day of Ganga Dussehra festival
गंगा दसरा महोत्सवाच्या दिवशी करा हे उपाय, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हिंदू धर्मामध्ये गंगाजल अत्यंत पवित्र मानले जाते.
  • ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमीला गंगा दसरा साजरा करण्याची परंपरा आहे.
  • यंदा ९ जून रोजी गंगा दसरा साजरा केला जाणार आहे.

Ganga Dussehra 2022 Upay in Marathi | मुंबई : हिंदू धर्मामध्ये गंगाजल अत्यंत पवित्र मानले जाते. कोणत्याही शुभ आणि अशुभ कार्यासाठी गंगाजलाचा वापर केला जातो. त्यामुळे गंगा दसरा हा पवित्र सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा गंगा दसरा महोत्सव ९ जून २०२२ रोजी गुरुवारी साजरा केला जाणार आहे. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी हस्त नक्षत्रात गंगा माता पृथ्वीवर अवतरली होती असा समज आहे. (Do this remedy on the day of Ganga Dussehra festival). 

दरम्यान, गंगा दसर्‍याच्या दिवशी लोक गंगा नदीत स्नान करतात आणि दान करतात. या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने माणसाची १० प्रकारची पापे नष्ट होतात असे बोलले जाते. या दिवशी काही विशेष उपाय केल्याने जीवनातील समस्यांपासून देखील सुटका होते. 

अधिक वाचा : बारावीचा निकाल, बोर्डाची पत्रकार परिषद

नोकरीतील अडथळे दूर करण्याचे उपाय

जर तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात मोठ्या कालावधीपासून अडथळे येत असतील तर गंगा दसर्‍याच्या दिवशी मातीचे भांडे घ्या. त्यात गंगाजलाचे काही थेंब आणि थोडी साखर घाला. आता त्या मातीच्या घागरीत पाणी भरून ते कोणत्याही गरजू व्यक्तीला दान करा. असे केल्याने नोकरीतील अडथळे दूर होतात असा समज आहे.

धनप्राप्तीसाठी उपाय 

गंगा दसर्‍याच्या दिवशी स्नान केल्यानंतर मंदिरात जाऊन शिवलिंगाला गंगाजलाने अभिषेक घालून थोडे पाणी साठवावे. तेच पाणी संपूर्ण घरात शिंपडल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. त्यामुळे घरातील पैसे येण्याचे अडथळे दूर होतात. 

कर्जमुक्तीसाठी उपाय

कर्जमुक्तीसाठी गंगा दसर्‍याच्या दिवशी आपल्या लांबीएवढा एक काळा धागा घेऊन तो नारळात गुंडाळून शिवलिंगासमोर ठेवावा. यानंतर तुमच्या समस्येच्या समाप्तीसाठी प्रार्थना करा आणि संध्याकाळी वाहत्या पाण्यात काळ्या धाग्यात गुंडाळलेला नारळ तरंगत सोडा. नारळ पाण्याबरोबर प्रवाहित झाल्यानंतर चुकूनही मागे वळून पाहू नका. असे केल्याने समस्या दूर होतात असे मानले जाते.

डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी