Rishi Panchami 2022: भाद्रपदाच्या शुक्ल पक्षच्या पाचव्या दिवशी ऋषी पंचमीचा उपवास केला जातो. यंदाच्या वर्षी ऋषी पंचमीचा उपवास हा 1 सप्टेंबर 2022 रोजी आहे. म्हणजेच गणेश चतुर्तीच्या दुसऱ्या दिवशी आणि हरतालिका तृतीयेच्या तिसऱ्या दिवशी. ऋषी पंचमीच्या दिवशी सप्त ऋषींची पूजा केली जाते. महिलांसाठी ऋषी पंचमीच उपवास फार महत्त्वाचा मानला जातो. ऋषीपंचमीच्या दिवशी जर महिला हा उपवास करतील तर सर्व दोषांपासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते.
असं म्हटलं जातं की, महिलांकडून जाणूनबुजून किंवा नकळत काही चूक झाली असेल तर हे व्रत पाळल्यास सर्व दोषांपासूनही मुक्ती मिळते. हिंदू धर्मात या व्रताचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. जाणून घेऊयात ऋषी पंचमीच्या दिवशी कोणत्या मंत्राचा जप करावा आणि हे व्रत करणाऱ्या महिलांनी काय करू नये.
असे मानले जाते की, ऋषीपंचमीचे व्रत करणाऱ्या महिलांनी जमिनीवर पेरलेले कुठलेही अन्यधान्य त्या दिवशी खाऊ नये. उपवासा दरम्यान हातसडीचा तांदूळ खावा. याशिवाय फळे-शाकाहारी पदार्थ खावे. मासिक पाळीच्या काळात हे व्रत महिलांनी करू नये.
'कश्यपोत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोथ गौतम: |'
जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषय: स्मृता: ||
दहन्तु पापं सर्व गृहन्त्वर्ध्यं नमो नम: ||
अर्थ - हे कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वमित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ तुम्ही सर्व ऋषिमुनींनो, माझ्याकडून अर्पण केलेला अर्घ्य स्वीकारा आणि तुमची कृपा सदैव माझ्यावर ठेवा.
या श्लोकामध्ये कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि, वसिष्ठ ऋषिंची नावे सांगितली आहेत. त्यांच्या नामस्मरणाने सर्व पाप कर्म नष्ट होतात. तसेच या दिवशी गरीब, गरजूंना दान करण्याला एक विशेष महत्त्व आहे.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)