Rishi Panchami 2022: ऋषी पंचमी व्रत महिलांसाठी खूप खास आहे, जाणून घ्या कथा

आध्यात्म
भरत जाधव
Updated Aug 22, 2022 | 22:17 IST

ऋषीपंचमी हा सण हिंदू धर्मात (Hinduism) महिलांसाठी (women) खूप महत्त्वाचा मानला जातो. ऋषीपंचमी (Rishi Panchami) हा सण दरवर्षी भाद्रपदाच्या (Bhadrapada) शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. यंदा ऋषीपंचमी (Rishi Panchami) १ सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे. या दिवशी सप्तऋषींची पूजा करण्याचा नियम आहे.

Rishi Panchami Vrat is associated with women's menstruation
महिलांच्या मासिकपाळीशी संबंधित आहे ऋषी पंचमी व्रत  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • या दिवशी सप्तऋषींची पूजा करण्याचा नियम आहे.
  • ऋषीपंचमीचे व्रत विशेषतः महिलांनी नकळत केलेले पाप नाहीसे करणारे व्रत मानली जाणारे आहे.
  • ऋषीपंचमी व्रताचा संबंध स्त्रियांच्या मासिक पाळीशीही आहे.

Rishi Panchami 2022: ऋषीपंचमी हा सण हिंदू धर्मात (Hinduism) महिलांसाठी (women) खूप महत्त्वाचा मानला जातो. ऋषीपंचमी (Rishi Panchami) हा सण दरवर्षी भाद्रपदाच्या (Bhadrapada) शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. यंदा ऋषीपंचमी (Rishi Panchami) १ सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे. या दिवशी सप्तऋषींची पूजा करण्याचा नियम आहे. धार्मिक मान्यतांनुसार, ऋषीपंचमीचे व्रत विशेषतः महिलांनी नकळत केलेले पाप नाहीसे करणारे व्रत मानली जाणारे आहे. या कारणास्तव प्रत्येक वयोगटातील महिला हे व्रत नक्कीच पाळतात. चला जाणून घेऊया ऋषीपंचमीचे व्रत महिलांसाठी खास का आहे.

ऋषी पंचमी व्रत २०२२ मुहूर्त (Rishi Panchami Shubh Muhurat 2022)

ऋषी पंचमीची तारीख सुरू होते - ३१ ऑगस्ट २०२२ दुपारी ०३:२२ वाजता
ऋषी पंचमीची तारीख संपेल - ०१ सप्टेंबर २०२२ दुपारी ०२:४९ वाजता
ऋषी पंचमी २०२२ पूजा मुहूर्त - १ सप्टेंबर २०२२ सकाळी  ११.०५ ते दुपारी ०१. ३७ पर्यंत

Read Also : भारताचा रोमांचक विजय, झिम्बाब्वेचा मालिकेत 3-0  व्हाईट वॉश

महिलांसाठी ऋषी पंचमी व्रताचे महत्त्व(Rishi panchami Vrat significance)

ऋषीपंचमी व्रताचा संबंध स्त्रियांच्या मासिक पाळीशीही आहे. हिंदू धर्मात मासिक पाळीच्या काळात महिलांना धार्मिक कार्य करण्यास मनाई आहे. मासिक पाळीच्या काळात महिलांनी धार्मिक कार्य केले किंवा अनवधानाने काही चूक झाली तर सप्त ऋषींची पूजा करून ऋषीपंचमीचे व्रत करत त्यातून पापातून आणि चुकीची दुरुस्ती करता येते, असे मानले जाते.

Read Also : सिंगल असण्याचे असतात अनेक फायदे

ऋषी पंचमी व्रत कथा (Rishi panchami Vrat katha)

भविष्य पुराणानुसार, एका राज्यात उत्तक नावाचा ब्राह्मण त्याची पत्नी सुशीला आणि मुलगा आणि मुलगी यांच्यासह राहत होता. ब्राह्मणाने आपल्या मुलीचे लग्न एका चांगल्या वराशी केले, परंतु काही काळानंतर त्याचा जावई मरण पावला. मुलगी घरी परतली. एके दिवशी मुलगी झोपली असताना आईने पाहिलं की तिच्या अंगावर जंत झाले आहेत. पत्नीने आपल्या पतीला मुलीच्या अशा अवस्थेचे कारण विचारले. 
मग उत्तक ब्राह्मणाने ध्यान लावत मुलीच्या मागील जन्माविषयीची माहिती घेतली.

Read Also : मंगळवारी मारुतीरायाला प्रसन्न करण्यासाठी करायचे उपाय

मागील जन्मात त्याचा मुलीने मासिक पाळी आली असताना पूजेच्या ताटाला स्पर्श केला होता.  ब्राह्मणाच्या मुलीने मागील जन्मी आणि या जन्मी ऋषीपंचमीचे व्रतही पाळले नाही, त्यामुळे त्यांची ही दुर्दशा होत आहे.  यानंतर, वडिलांच्या सांगण्यानुसार, त्यांच्या मुलीने या संकटांपासून मुक्त होण्यासाठी पंचमीचा उपवास केला, ज्यामुळे त्यांच्या मुलीला सौभाग्य प्राप्त झाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी