Lord Ganesha: तुमच्या घरात गणपतीच्या किती मूर्ती आहेत? जास्त असतील तर...

आध्यात्म
Updated May 12, 2022 | 15:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

Lord Ganesha: सर्व देव-देवतांमध्ये गणपती बाप्पाची पुजा सर्वप्रथम केली जाते. हिंदू धर्मात प्रत्येक घरात भगवान गणेशाची पुजा केली जाते. मात्र घरी गणपती पुजनाचे काही नियम आहे ज्यांचे पालन करणे गरजेचे असते. तेव्हाच शुभ फलप्राप्ती होते. 

ganesha
तुमच्या घरात गणपतीच्या किती मूर्ती आहेत? जास्त असतील तर... 
थोडं पण कामाचं
  • भगवान गणपतीची २ पेक्षा जास्त मूर्ती असू नये.
  • तुटलेली मूर्ती घरात ठेवू नये. 
  • उजव्या दिशेला सोंड असलेली मूर्ती घरात ठेवू नका. 

मुंबई: हिंदू धर्मात भगवान गणेशाची(lord ganesha worship) पुजा सगळ्यात आधी केली जाते. भगवान शंकराकडून(lord shankar) वरदान मिळाले असल्याने गणपतीला प्रथम पुजा केली जाते. यासाठी सर्व देवीदेवतांच्या आणि कोणत्याही शुभ कार्याच्याआधी भगवान गणेशाची पुजा केली जाते. कोणत्याही नव्या कार्याला आरंभ करण्यापूर्वी गणेशवंदना केली जाते. भगवान गणेश मंगलमूर्ती असतात त्यामुळेच हाती घेतलेली कार्ये मंगल होतात. मात्र सर्व देवीदेवतांप्रमाणेच गणपतीच्या पुजेचेही काही नियम आहेत. खासकरून घरात असलेल्या गणपतीच्या मूर्तींच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. rules about worship of lord ganesha

अधिक वाचा - मुंबईसह महाराष्ट्रात उत्तर भारतीय सुरक्षित! : जयंत पाटील

जर तुम्हीही घरी गणपतीची पुजा करता तर त्या पुजेबाबत काही खास नियम माहिती असणे गरजेचे आहे. तेव्हाच त्या पुजेचे फळ मिळेल. घरात गणपतीच्या मूर्ती ठेवण्याचेही नियम आहेत. तुम्ही जर त्यापेक्षा जास्त मूर्ती ठेवत असाल तर शुभ ऐवजी अशुभ फलप्राप्ती होऊ शकते. 

घरात गणपती बाप्पाची मूर्ती ठेवण्याचे नियम

सगळ्यात आधी जाणून घ्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती ठेवण्याचे काय नियम आहेत. जेव्हा तुम्ही घरात गणपतीची मूर्ती आणता तेव्हा सगळ्यात आधी त्याच्या सोंडेकडे लक्ष द्या. उजवी सोंड असलेल्या गणपतीला सिद्धीविनायक म्हटले जाते तर डावी सोंड असलेल्या गणपतीला वक्रतुंड म्हटले जाते. जर तुम्ही घरात गणपतीची स्थापना करत आहात तर नेहमी डावी सोंड असलेला गणपती म्हणजेच वक्रतुंडाची मूर्ती ठेवा. कारण यया पुजेचे नियम कमी असतात. मंदिराच्या तुलनेत घरात कोणत्याही देवी-देवतांच्या पुजेचे नियम पाळणे कठीण असते. 

तर दुसरीकडे उजव्या बाजूची सोंड असलेल्या गणपतीला सिद्धीविनायक म्हटले जाते. यांच्या पुजेत अनेक प्रकारचे नियम पाळणे गरजेचे असते. जे घरी शक्य नसते. यासाठी अशा गणपतींची मूर्ती मंदिरामध्ये स्थापित केली जाते. 

अधिक वाचा - ओला कपडा सांगेल सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे

घरात गणपतीची किती मूर्ती ठेवल्या पाहिजेत

जर तुम्ही घरात गणपतीची विधिवत पुजा करत आहात तर चुकूनही गणपतीची तीन मूर्ती ठेवू नका. कारण गणपतीच्या तीन मूर्ती घरात ठेवणे खूप अशुभ असते. घरात गणपतीची एक अथवा दोनच फोटो ठेवा. मात्र लक्षात ठएवा की दोन्ही मूर्ती समोरासमोर असता कामा नयेत. सोबतच जर घरात देवाची मूर्ती अथवा फोटो असेल तर त्याची विधिवत पुजा करा. ते शो पीससारखे ठेवू नका. पुजाची मूर्ती तुटलेली असता कामा नये. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी