नवरात्रीत नऊ वेळा का करतात संध्यारती?

sandhya aarti in navratri दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवीसमोर तुपाचा दिवा लावा. तसेच दररोज संध्याकाळी न चुकता, न विसरता मनोभावे संध्यारती (संध्या आरती) करा.

devi mata devi maa
नवरात्रीत नऊ वेळा का करतात संध्यारती? 

थोडं पण कामाचं

  • नवरात्रीत नऊ वेळा का करतात संध्यारती?
  • श्री दुर्गा देवीची आरती – मराठी आणि श्री महालक्ष्मीची आरती – मराठी
  • दुर्गा देवीची आरती - हिंदी आणि देवी वंदना - हिंदी

मुंबईः आज शनिवार, १७ ऑक्टोबर. घटस्थापना दिन. शारदीय नवरात्रारंभ. नवरात्रीच्या निमित्ताने झाले गेले विसरुन नवी सुरवात करण्याचा शुभ दिन. नवरात्र म्हणजे वाईटाचा विनाश आणि चांगल्याचे तसेच शौर्याचे कौतुक करण्याचा उत्सव. या उत्सवात दुर्गा देवीची (दुर्गा माता) पूजा सकाळी आणि संध्याकाळी केली जाते. जी व्यक्ती पवित्र कलशाची प्रतिष्ठापना करते, ती व्यक्तीच अखंड ज्योत प्रज्वलीत करते. आपण कलशाची प्राणप्रतिष्ठा करण्याऐवजी फोटोची पूजा करत असाल आणि अखंड ज्योतीचे प्रज्वलनही करत नसाल तरी दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवीसमोर तुपाचा दिवा लावा. तसेच दररोज संध्याकाळी न चुकता, न विसरता मनोभावे संध्यारती (संध्या आरती) करा. (sandhya aarti in navratri know the importance mahatva vidhi lyrics in marathi lyrics in hindi)

देवीच्या पूजेत संध्याकाळी आरती केली नाही तर दिवसभराच्या पूजेचे फळ मिळत नाही असे म्हणतात. याच कारणामुळे दररोज संध्याकाळी संध्यारती (संध्या आरती) करा. नवरात्रीत नऊ वेळा (नऊ संध्याकाळी) संध्यारती (संध्या आरती) केली जाते. असे म्हणतात की, तंत्रमंत्र विद्या करणारे मध्यरात्री देवीची पूजा आणि आरती करतात तर भाविक नवरात्रीत नऊ वेळा (नऊ संध्याकाळी) संध्यारती (संध्या आरती) करतात. स्वतःसोबत कुटुंबाला, भोवतालच्यांना चांगले दिवस यावे तसेच अडीअडचणी दूर व्हाव्यात असे वाटत असल्यास मनोभावे संध्यारती (संध्या आरती) करा.

गृहस्थाश्रमात असलेल्या महिला आणि पुरुषांपैकी कोणीही देवीची पूजा आणि आरती करणार असतील तर त्यांनी संध्यारती (संध्या आरती) करावी. अनेक ठिकाणी सकाळी पूजा आणि संध्याकाळी आरती अथवा संध्याकाळी पूजा व आरती असे केले जाते. यापैकी कोणत्याही प्रकारात संध्याकाळी केलेल्या आरतीला प्रचंड महत्त्व आहे. आरती, पाठ पठण, मंत्रोच्चार हे संध्याकाळी केले जातात.

दररोज संध्याकाळी संध्यारती (संध्या आरती) करतात. ही आरती करण्याची एक पद्धत आहे. देवीच्या समोर ज्योत प्रज्वलीत केली जाते. देवीचा नव्याने श्रृंगार केला जातो. नंतर धुपारती (धूप वापरुन केलेली आरती) केली जाते. सार्वजनिक उत्सवाच्या मंडपात देवीची आरती केली तर देवीला वस्त्र, लाल फळ, फुलं, तांदूळ, गोड पदार्थ, दागिने अर्पण केले जातात. शंखनाद, ढोल, नगारे, घंटानाद करत देवीची आरती केली जाते. ज्या देवीचा दिवस आहे त्या देवीची आरती गातात. 

श्री दुर्गा देवीची आरती – मराठी (Navratri Sandhya Aarti Lyrics in Marathi)

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी।
अनाथ नाथे अम्बे करुणा विस्तारी।
वारी वारी जन्म मरणांते वारी।
हारी पडलो आता संकट निवारी॥
जय देवी जय देवी महिषासुरमथिनी।
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥
त्रिभुवन-भुवनी पाहता तुज ऐसी नाही।
चारी श्रमले परन्तु न बोलवे काही।
साही विवाद करिता पडले प्रवाही।
ते तू भक्तालागी पावसि लवलाही॥
जय देवी जय देवी महिषासुरमथिनी।
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा।
क्लेशांपासुनि सोडवि तोडी भवपाशा।
अम्बे तुजवाचून कोण पुरविल आशा।
नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा॥
जय देवी जय देवी महिषासुरमथिनी।
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥

श्री महालक्ष्मीची आरती – मराठी

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता।
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता।
कमलाकारें जठरी जन्मविला धाता।
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां॥
जय देवी जय देवी…॥
मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं।
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी।
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी।
शशिकरवदना राजस मदनाची जननी॥
जय देवी जय देवी…॥
तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी।
गायत्री निजबीजा निगमागम सारी।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी॥
जय देवी जय देवी…॥
अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं।
मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं।
वारी मायापटल प्रणमत परिवारी।
हें रुप चिद्रूप दावी निर्धारी॥
जय देवी जय देवी…॥
चतुराननें कुश्चित कर्मांच्या ओळी।
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी।
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी॥
जय देवी जय देवी…॥

दुर्गा देवीची आरती - हिंदी (Navratri Sandhya Aarti Lyrics in hindi)

जय अम्बे गौरी, मैया जय श्यामा गौरी तुम को निस दिन ध्यावत

मैयाजी को निस दिन ध्यावत हरि ब्रह्मा शिवजी ।| जय अम्बे गौरी ॥

माँग सिन्दूर विराजत टीको मृग मद को |मैया टीको मृगमद को

उज्ज्वल से दो नैना चन्द्रवदन नीको|| जय अम्बे गौरी ॥

कनक समान कलेवर रक्ताम्बर साजे| मैया रक्ताम्बर साजे

रक्त पुष्प गले माला कण्ठ हार साजे|| जय अम्बे गौरी ॥

केहरि वाहन राजत खड्ग कृपाण धारी| मैया खड्ग कृपाण धारी

सुर नर मुनि जन सेवत तिनके दुख हारी|| जय अम्बे गौरी ॥

कानन कुण्डल शोभित नासाग्रे मोती| मैया नासाग्रे मोती

कोटिक चन्द्र दिवाकर सम राजत ज्योति|| जय अम्बे गौरी ॥

शम्भु निशम्भु बिडारे महिषासुर घाती| मैया महिषासुर घाती

धूम्र विलोचन नैना निशदिन मदमाती|| जय अम्बे गौरी ॥

चण्ड मुण्ड शोणित बीज हरे| मैया शोणित बीज हरे

मधु कैटभ दोउ मारे सुर भयहीन करे|| जय अम्बे गौरी ॥

ब्रह्माणी रुद्राणी तुम कमला रानी| मैया तुम कमला रानी

आगम निगम बखानी तुम शिव पटरानी|| जय अम्बे गौरी ॥

चौंसठ योगिन गावत नृत्य करत भैरों| मैया नृत्य करत भैरों

बाजत ताल मृदंग और बाजत डमरू|| जय अम्बे गौरी ॥

तुम हो जग की माता तुम ही हो भर्ता| मैया तुम ही हो भर्ता

भक्तन की दुख हर्ता सुख सम्पति कर्ता|| जय अम्बे गौरी ॥

भुजा चार अति शोभित वर मुद्रा धारी| मैया वर मुद्रा धारी

मन वाँछित फल पावत देवता नर नारी|| जय अम्बे गौरी ॥

कंचन थाल विराजत अगर कपूर बाती| मैया अगर कपूर बाती

माल केतु में राजत कोटि रतन ज्योती|| बोलो जय अम्बे गौरी ॥

माँ अम्बे की आरती जो कोई नर गावे| मैया जो कोई नर गावे

कहत शिवानन्द स्वामी सुख सम्पति पावे|| जय अम्बे गौरी ॥

देवी वंदना - हिंदी

या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता | नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ||

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी