Sankashti Chaturthi 2019: जाणून घ्या संकष्टी चतुर्थीचं महत्व, 'अशी' पूजा केल्यास प्रसन्न होतील श्रीगणेश

आध्यात्म
Updated Apr 22, 2019 | 10:23 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Sankashti Chaturthi Puja: शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. या दिवशी अनेकजण उपवास ही करतात.

Sankashti Chaturthi 2019
संकष्टी चतुर्थी  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: हिंदू धर्मात कुठल्याही चांगल्या किंवा शुभ कार्याची सुरूवात ही श्री गणेशाची पूजा करुनच केली जाते. मात्र, विनायक चतुर्थी एक असा उत्सव आहे ज्या दिवशी श्री गणेशाची विशेष पूजा केली जाते. शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक किंवा कृष्ण पक्ष (संकष्टी) चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. संकष्टीचं भाविकांमध्ये एक वेगळचं महत्व असतं. या दिवशी संपूर्ण दिवस भाविक उपवास सुद्धा करतात. 

असं म्हंटलं जातं की, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्यास सुख-समृद्धी, शांती लाभते. यासोबतच भाविकांच्या इच्छा पूर्ण होतात. यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाचा आशिर्वाद मिळवण्यासाठी प्रत्येकाला संपूर्ण विधीने श्रीगणेशाची पूजा करणं आवश्यक आहे. या लेखात आम्ही तुम्हाला संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाच्या पूजा नेमकी कशी करावी, पूजेची विधी कशी असावी हे सांगणार आहोत. 

श्री गणेशाच्या पूजेची विधी

  1. सुर्योदयापूर्वी उठून स्वच्छ पाण्याने आंघोळ करावी आणि लाल रंगाचे कपडे परिधान करावेत.
  2. दुपारच्या सुमारास घरातील देवस्थानात सोनं, चांदी, माती, तांबी किंवा पितळ्याची गणपतीची मुर्तीची प्रतिष्ठापना करा.
  3. यानंतर श्रीगणेशाची पूजा करुन आरती करा.

'ॐ गं गणपतेय नम:' चा जप करा 

आता श्रीगणेशाच्या मुर्तीवर सिंदूर लावा आणि 'ॐ गं गणपतेय नम:' या मंत्राचा जप करत २१ दुर्वा अर्पण करा. यानंतर गणपती बाप्पाला २१ लाडुंचा प्रसाद द्या. पाच लाडू ब्राम्हणांना द्या, पाच लाडू गणपती बाप्पाच्या चरणी ठेवा तर इतर लाडू नागरिकांना प्रसाद म्हणून वाटप करा. संपूर्ण विधी पूर्वक गणपती बाप्पांची पूजा करा आणि श्री गणेश स्त्रोत्र, अथर्वशीर्ष, गणेश स्त्रोत्राचं पठन करा.

(आम्ही या गोष्टींचं समर्थन करत नाही. मात्र, अशा प्रकारे पूजा केल्यास सुख-समृद्धी-शांती मिळते अशी अनेकांची मान्यता आहे. याचं आम्ही केवळ वृत्तांकन करत आहोत.) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Sankashti Chaturthi 2019: जाणून घ्या संकष्टी चतुर्थीचं महत्व, 'अशी' पूजा केल्यास प्रसन्न होतील श्रीगणेश Description: Sankashti Chaturthi Puja: शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. या दिवशी अनेकजण उपवास ही करतात.
Loading...
Loading...
Loading...