Moon rise time on Sankashti Chaturthi: गुरुवारी (9 फेब्रुवारी 2023) संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी भाविक श्री गणेशाची मनोभावे पूजा करतात. दिवसभर उपवास करतात. श्री गणेशाची पूजा करुन नैवेद्य दाखवला जातो. त्याननंतर चंद्रोदय झाल्यावर उपवास सोडतात.
पौराणिक मान्यतांनुसार, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत केल्याने आणि विधीवत पूजा केल्याने गणराय प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. तसेच कोणत्याही कार्याची, शुभ कामाची सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा केली जाते.
हे पण वाचा : Board Exam: बोर्डाच्या परीक्षेवेळी करू नका या चुका
संकष्ट चतुर्थी तिथी प्रारंभ 9 फेब्रुवारी सकाळी 6.23 वाजता होत आहे. तर संकष्ट चतुर्थी तिथी समाप्ती 10 फेब्रुवारी सकाळी 7.58 वाजता होत आहे. संकष्ट चतुर्थी चंद्रोदय वेळ 9 फेब्रुवारी रात्री 9.35 वाजता आहे. संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ रात्री 9 वाजून 35 मिनिटांनी आहे. मात्र, प्रत्येक शहरात चंद्रोदयाच्या वेळेत थोडा-थोडा फरक असतो. रात्री चंद्रोदय झाल्यावर पूजा करा आणि अर्ध्य करा. यानंतर कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती, आई-वडिलांचे आशीर्वाद घ्या. जाणून घ्या महाराष्ट्रातील कोणत्या शहरात चंद्रोदयाची वेळ किती आहे.
हे पण वाचा : हे संकेत दिसल्यास समजून जा तुमची किडनी खराब झालीय
शहराचे नाव (Maharashtra Important Cities) | चंद्रोदयाची वेळ (Moon Rise Time in Maharashtra's various cities) |
मुंबई | 09.35 |
ठाणे | 09.34 |
पुणे | 09.31 |
रत्नागिरी | 09.33 |
कोल्हापूर | 09.30 |
सातारा | 09.30 |
नाशिक | 09.31 |
अहमदनगर | 09.27 |
धुळे | 09.27 |
जळगाव | 09.24 |
वर्धा | 09.11 |
यवतमाळ | 09.13 |
बीड | 09.23 |
सांगली | 09.28 |
सावंतवाडी | 09.31 |
सोलापूर | 09.23 |
नागपूर | 09.09 |
अमरावती | 09.15 |
अकोला | 09.18 |
औरंगाबाद | 09.25 |
भुसावळ | 09.23 |
परभणी | 09.19 |
नांदेड | 09.16 |
उस्मानाबाद | 09.22 |
भंडारा | 09.07 |
चंद्रपूर | 09.08 |
बुलढाणा | 09.21 |
मालवण | 09.33 |
बेळगाव | 09.29 |
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही.)