Sankashti Chaturthi 2023: संकष्ट चतुर्थी कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Sankashti Chaturthi 2023: संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करण्यात येते. अशी मान्यता आहे की, या दिवशी उपवास करुन विधिवत पूजा केल्यास सर्व अडचणी दूर होण्यास मदत होते. जाणून घ्या संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी.

Sankashti Chaturthi 2023 march 11 know day date shubh muhurat timing puja vidhi in marathi
Bhalchandra Sankashti Chaturthi 2023: संकष्ट चतुर्थी कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी 
थोडं पण कामाचं
  • 11 मार्च रोजी संकष्ट चतुर्थी
  • जाणून घ्या पूजा विधी आणि चंद्रोदयाची वेळ

Sankashti Chaturthi March 2023: मार्च महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी म्हणजेच 11 मार्च 2023 रोजी संकष्ट चतुर्थी आहे. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करुन उपवास करण्यात येतो. श्री गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व आहे आणि या दिवशी भाविक मनोभावे पूजा करतात. या दिवशी विधिवत गणरायाची पूजा केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे. जाणून घ्या संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि चंद्रोदयाची वेळ काय आहे. (Sankashti Chaturthi 2023 march 11 know day date shubh muhurat timing puja vidhi in marathi)

हिंदू धर्मातील मान्यतांनुसार, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते. कारण, देवतांमध्ये श्री गणेशाचे सर्वप्रथम पूजन केले जाते. तसेच श्री गणराय हे बुद्धीची देवता आहेत. ज्योतिषांच्या मते, संकष्टी हा संस्कृत भाषेतील शब्द आहे. एखाद्या संकटातून बाहेर निघण्याला संकष्टी म्हटले जाते. यामुळेच आयुष्यातील सर्व समस्यांतून बाहेर पडण्यासाठी भाविक गणेश चतुर्थीचं व्रत, उपवास करतात.

हे पण वाचा : म्हणून लहान मुले माती किंवा खडू खातात

Sankashti Chaturthi 2023

संकष्ट चतुर्थी - 11 मार्च 2023

तिथी - कृ. चतुर्थी समाप्ती - 22.05 

नक्षत्र - चित्रा समाप्ती - 07.10

योग - ध्रुव समाप्ती - 19.49 

करण - बव समाप्ती - 09.57

हे पण वाचा : जास्त तहान लागणे आजारपणाचे लक्षण?

Sankashti Chaturthi Chandroday Time:

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री 10 वाजून 06 मिनिटांची आहे.

हे पण वाचा : निरोगी आणि मजबूत हिरड्या हव्या आहेत? मग हे करा

Sankashti Chaturthi Puja Vidhi:

  1. सर्वप्रथम सकाळी लवकर उठावे. त्यानंतर स्नान केल्यावर स्वच्छ कपडे परिधान करावेत.
  2. यानंतर जवळील मंदिरात जावून गणरायाचे दर्शन घ्यावे किंवा घरातील पूजास्थळी श्री गणेशाचा अभिषेक करावा.
  3. घरात पूजा करत असाल तर चौरंगावर लाल रंगाचा कपडा पांघरुन त्यावर श्री गणेशाचा फोटो, मूर्ती ठेवा.
  4. भगवान श्री गणेशाला लाल वस्त्र, फुले, सुपारी, पान आणि 11 दूर्वा अर्पण करा.
  5. श्री गणेशाजवळ लाडू आणि मोदकाचा प्रसाद ठेवा
  6. यानंतर आरती करा, मंत्रांचा जप करा
  7. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास करावा
  8. असे केल्याने श्री गणेशजी प्रसन्न होतात आणि भाविकांना सुख-समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे. यामुळेच भाविक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मनोभावे पूजा करतात, व्रत करतात.

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी