Sankashti Chaturthi 2023 Puja Time: जाणून घ्या संकष्ट चतुर्थी व्रत करण्याचे महत्व आणि पूजेचा शुभ मुहूर्त

Sankashti Chaturthi 2023 : संकष्ट चतुर्थीला भाविक मनोभावे पूजा करतात, उपवास करतात. 9 फेब्रुवारी रोजी संकष्ट चतुर्थी आहे. जाणून घ्या पूजा विधी, व्रत करण्याचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त

Sankashti Chaturthi 2023 Puja time Vrat Katha Significance Rituals Vrat Kahani in marathi
Sankashti Chaturthi 2023 Puja Time: जाणून घ्या संकष्ट चतुर्थी व्रत करण्याचे महत्व आणि पूजेचा शुभ मुहूर्त 

Sankashti Chaturthi 2023 : माघ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी (Sankasti Chaturthi) म्हणतात. या दिवशी भाविक मनोभावे पूजा करतात, उपवास सुद्धा करतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांच्या आयुष्यात कोणतीही बाधा, संकट येऊ नये म्हणून आणि दीर्घायुष्यासाठी आई प्रार्थना करते, निर्जल उपवास करते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण विधीवत पूजा केल्याने श्री गणराय प्रसन्न होतात असे मानले जाते. (Sankashti Chaturthi 2023 Puja time Vrat Katha Significance Rituals Vrat Kahani in marathi)

व्रत करण्याचं महत्त्व

हिंदू धर्मातील मान्यतांनुसार, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते. कारण, देवतांमध्ये श्री गणेशाचे सर्वप्रथम पूजन केले जाते. तसेच श्री गणराय हे बुद्धीची देवता आहेत. ज्योतिषांच्या मते, संकष्टी हा संस्कृत भाषेतील शब्द आहे. एखाद्या संकटातून बाहेर निघण्याला संकष्टी म्हटले जाते. यामुळेच आयुष्यातील सर्व समस्यांतून बाहेर पडण्यासाठी भाविक गणेश चतुर्थीचं व्रत, उपवास करतात. गुरुवारी 9 फेब्रवारी रोजी संकष्ट चतुर्थी आहे.

हे पण वाचा : Board Exam: बोर्डाच्या परीक्षेवेळी करू नका या चुका

Ganpati Puja on Sankashti: संकष्टीला श्री गणेशाची पूजा कशी करावी?

  1. सर्वप्रथम सकाळी लवकर उठावे. त्यानंतर स्नान केल्यावर स्वच्छ कपडे परिधान करावेत.
  2. यानंतर जवळील मंदिरात जावून गणरायाचे दर्शन घ्यावे किंवा घरातील पूजास्थळी श्री गणेशाचा अभिषेक करावा.
  3. घरात पूजा करत असाल तर चौरंगावर लाल रंगाचा कपडा पांघरुन त्यावर श्री गणेशाचा फोटो, मूर्ती ठेवा.
  4. भगवान श्री गणेशाला लाल वस्त्र, फुले, सुपारी, पान आणि 11 दूर्वा अर्पण करा.
  5. श्री गणेशाजवळ लाडू आणि मोदकाचा प्रसाद ठेवा
  6. यानंतर आरती करा, मंत्रांचा जप करा
  7. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास करावा

असे केल्याने श्री गणेशजी प्रसन्न होतात आणि भाविकांना सुख-समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे. यामुळेच भाविक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मनोभावे पूजा करतात, व्रत करतात.

हे पण वाचा : तुम्हाला सुद्धा नखे चावण्याची सवय आहे का? मग हे वाचाच

Sankashti Chaturthi Shubh Muhurat: संकष्ट चतुर्थी शुभ मुहूर्त

संकष्ट चतुर्थी प्रारंभ - 9 फेब्रुवारी सकाळी 6.23 वाजता

संकष्ट चतुर्थी तिथी समाप्ती - 10 फेब्रुवारी सकाळी 7.58 वाजता

संकष्ट चतुर्थी चंद्रोदय वेळ - 9 फेब्रुवारी रात्री 9.35 वाजता

हे पण वाचा : हे संकेत दिसल्यास समजून जा तुमची किडनी खराब झालीय

Ganesh Mantra for Sankashti

श्री गणेशाय नम: 

ॐ गं गणपतये नम: 

हे पण वाचा : घशाची खवखव दूर करण्यासाठी घरगुती अन् रामबाण उपाय

Ganesh Mantra as per zodiac sign: राशीनुसार गणेश मंत्र

मेष / Aries - ॐ लंबोदराय नम:

वृषभ / Tauras - ॐ विघ्नेश्वराय नम: 

मिथुन / Gemini - ॐ गौरीपुत्राय नम:

कर्क / Cancer - ॐ गजानन नम: 

सिंह / Leo - ॐ वक्रतुंडाय नम:

कन्या / Virgo - ॐ वरदमूर्ते नम: 

तूळ / Libra - ॐ विघ्नहर्ताय नम: 

वृश्चिक / Scorpio - ॐ रिद्धिदाताय नम: 

धनु / Sagittarius - ॐ सुखकर्ता नम: 

मकर / Capricorn - ॐ मंगलदाताय नम: 

कुंभ / Aquarius - ॐ सिद्धीवराय नम: 

मीन / Pisces - ॐ मोदकप्रियाय नम: 

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी