Sankashti Chaturthi 2023 : संकष्ट चतुर्थीला अशी करा पूजा गणपती बाप्पा होतील प्रसन्न, जाणून घ्या पूजा विधी आणि शुभ मुहूर्त

Sankashti Chaturthi 2023 Vrat Katha in marathi: 9 फेब्रुवारी रोजी संकष्ट चतुर्थी आहे. जाणून घ्या संकष्ट चतुर्थी पूजा विधी आणि शुभ मुहूर्त.

Sankashti Chaturthi 2023 Vrat Katha Vrat Kahani Puja Time Vidhi Rituals Significance in marathi
Sankashti Chaturthi : संकष्ट चतुर्थीला अशी करा पूजा गणपती बाप्पा होतील प्रसन्न, जाणून घ्या पूजा विधी आणि शुभ मुहूर्त (Photo: Pexels) 
थोडं पण कामाचं
  • वर्षभरात एकूण 24 चतुर्थी येतात. 9 फेब्रुवारी (गुरुवार) संकष्ट चतुर्थी
  • धार्मिक मान्यतांनुसार, या दिवशी श्री गणेशाची विधीवत पूजा केल्यास सुख-समृद्धी प्राप्त होते

Sankashti Chaturthi 2023 Vrat Katha in marathi: हिंदू धर्मात प्रत्येक सणाला विशेष महत्त्व असते आणि सर्व सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात. त्याचप्रमाणे संकष्ट चतुर्थीचेही खास महत्त्व आहे. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भाविक मनोभावे श्री गणेशाची पूजा करतात. वर्षभरात 24 चतुर्थी येतात. कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दिवशी देवतांपैकी श्री गणेशाचे सर्वप्रथम पूजन केले जाते. गुरुवारी (9 फेब्रुवारी 2023) संकष्ट चतुर्थी आहे. जाणून घ्या संकष्ट चतुर्थी पूजा-विधी, शुभ मुहूर्त.

Sankashti Chaturthi Shubh Muhurat: संकष्ट चतुर्थी शुभ मुहूर्त

  1. संकष्ट चतुर्थी प्रारंभ - 9 फेब्रुवारी सकाळी 6.23 मिनिटांनी
  2. संकष्ट चतुर्थी तिथी समाप्ती  - 10 फेब्रुवारी सकाळी 7.58 मिनिटांनी

हे पण वाचा : गुळाचा एक तुकडा तुमचा चेहरा बनवेल चमकदार

Sankashti Chaturthi Pooja Vidhi: पूजा विधी

  1. सकाळी लवकर उठावे आणि अंघोळ करुन स्वच्छ कपडे परिधान करावेत.
  2. पूजा स्थळाची चांगली साफ-सफाई करावी.
  3. चौरंगावर लाल रंगाचा कपडा पांघरुन त्यावर श्री गणेशाचा फोटो, मूर्ती ठेवा.
  4. श्री गणेशाचा अभिषेक करा
  5. भगवान श्री गणेशाला लाल वस्त्र, फुले, सुपारी, पान आणि 11 दूर्वा अर्पण करा.
  6. श्री गणेशाजवळ लाडू आणि मोदकाचा प्रसाद ठेवा
  7. यानंतर आरती करा, मंत्रांचा जप करा.
  8. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास सुद्धा करु शकता.

धार्मिक मान्यतांनुसार, अशा प्रकारे पूजा केल्यास श्री गणराय प्रसन्न होतात आणि आपल्या घरात सुख-समृद्धी येते.

हे पण वाचा : भारतात हा तांदूळ सर्वात जास्त खाल्ला जातो

Sankashti Chaturthi Upay: संकष्ट चतुर्थीला करा हे उपाय

ज्योतिष शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहे. जे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करता येऊ शकतात. हे उपाय केल्यास भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. जाणून घ्या काय आहेत हे उपाय...

  1. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी 11 दूर्वा आणि हळदीचा तुकडा एका पिवळ्या कपड्यांत बांधून घरातील मंदिरात ठेवा. त्यानंतर पुढील 10 दिवस याची विधीवत पूजा करा. त्यानंतर हे घरातील तिजोरीत ठेवा. यामुळे घरात पैशांची चणचण भासणार नाही.
  2. वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणी येत असतात अनेकदा दाम्पत्यात भांडणे होतात. अशा परिस्थितीत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पती-पत्नी दोघांनी एकत्रित श्री गणेशाची पूजा करायला हवी. पूजा केल्यानंतर 11 दूर्वा श्री गणेशाला अर्पण करा. असे केल्याने वैवाहिक आयुष्यात सुख-समृद्धी, आनंद येतो.
  3. जर तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी येत आहेत तर त्यावरही एक उपाय आहे. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीला पंचामृताने अभिषेक करा. गणरायाला तेल मिश्रित सिंदूर अर्पण करा. वस्त्र, फुले, माळा, पान, सुपारी अर्पण करा. श्री गणरायाला लाडूंचा नैवेद्य दाखवा.

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी