संकष्टी चतुर्थी- पूजा विधी, चंद्रोदय: ८ जुलैला संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि महत्त्व

Sankashti chaturthi-Pooja Vidhi, Chaand time: ८ जुलै रोजी संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहेत. संकष्टीच्या दिवशी घरी करा गणेश पूजन. जाणून घ्या चतुर्थीबद्दल अधिक.

Siddhivinayak Temple, Mumbai
जाणून घ्या आषाढात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचं महत्त्व 

थोडं पण कामाचं

  • ८ जुलैला आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी
  • आषाढातील या संकष्टी चतुर्थीला कृष्ण पिंगला संकष्टी चतुर्थी असंही म्हणातात.
  • या दिवशी गणेश पूजनाचं अधिक महत्त्व, जाणून घ्या चंद्रोदय कधी

Sankashti chaturthi-Pooja Vidhi, Chaand time: आषाढ महिना सुरू आहे. म्हणजे चार्तुमास सुरू झालेल्या आहे. याकाळात येणारे प्रत्येक सण, उत्सव यांचं महत्त्व वेगळंच असतं. येत्या ८ जुलैला येणारी संकष्टी चतुर्थी (Sankashti chaturthi) अनेक बाबतीत विशेष अशी आहे. यावेळी चतुर्थी बुधवारी आलेली आहे. बुधवार हा गणपती बाप्पाचा वार मानला जातो. या दिवशी केली जाणारी पूजा विशेष फलदायी ठरते. संकष्टीची पूजा ही चंद्रोदयानंतर केली जाते. हाच शुभ मुहूर्त (subh muhurat) समजला जातो. आज चंद्रोदय हा रात्री १० वाजता होणार आहे. (moon time today)

कृष्ण पिंगला संकष्टी चतुर्थी

आषाढ महिन्यात येणाऱ्या या चतुर्थीला कृष्ण पिंगला संकष्टी चतुर्थी सुद्धा म्हटलं जातं. (Krishna Pingla Sankashti Chaturthi) धार्मिक मान्यतेनुसार कृष्ण पिंगला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी महाकाल भगवान शंकरानं या गोष्टीची घोषणा केली होती की, गणपती बाप्पा सर्व देवी-देवतांमध्ये प्रथम पूज्यनिय असतील. असंही म्हटलं जातं की, कृष्ण पिंगला संकष्टीचं व्रत करणाऱ्या भक्तांच्या आयु्ष्यातील सर्व संकटं आणि त्रासांचा नाश होतो. यादिवशी जर रुद्राभिषेक केला तर यामुळे भगवान शंकराची सुद्धा कृपा प्राप्त होते, ज्यामुळे आयुष्यात आनंद आणि संपन्नता कायम राहते.

गणपती बाप्पा बुद्धीचे देवता

कुठल्याही नवीन कामाची सुरूवात करायची असेल तर आपण कार्याचा श्रीगणेशा असं म्हणतो. कारण गणपती बाप्पा सर्व देवी-देवतांमध्ये प्रथम पुज्यनिय मानले जातात. गणपती शक्ती, बुद्धी आणि विवेकाचं प्रतिक आहेत. आपल्या सर्व भक्तांचे विघ्न हरण्याचं काम बाप्पा करतो. म्हणूनच गणपती बाप्पाला आपण विघ्नहर्ता पण म्हणतो. ज्या लोकांच्या आयुष्यात कुठलंही संकट असेल जर त्यांनी संकष्टी चतुर्थीची विशेष पूज केली तर त्याचा उत्तम परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतो, कारण संकष्टीचा अर्थच संकट हरणारी चतुर्थी असा होतो.

गणेश पूजेचं महत्त्व (Sankashti chaturthi Puja importance)

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी आंघोळ करून व्रताचा संकल्प घ्यावा आणि पूजा सुरू करावी. या दिवशी पूजेत भगवान गणेशाच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास केला जातो. गणपती बाप्पाची विधी युक्त पूजा केली जाते तेव्हाच याचा संपूर्ण लाभ मिळतो.

जाणून घ्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ (moon time today)

चतुर्थी प्रारंभ - ८ जुलैला सकाळी ९ वाजून १८ मिनीटं

चतुर्थी समाप्ती - ९ जुलैला सकाळी १० वाजून ११ मिनीटं

संकष्टीच्या दिवशी चंद्रोदय - रात्री १० वाजता

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी