Dnyaneshwar Maharaj Jayanti 2022: महाराष्ट्रात भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी आणि तत्त्वज्ञ म्हणून ओळख असलेल्या संत ज्ञानेश्वर यांचा जन्म श्रावण कृष्ण अष्टमी झाला आहे. त्यामुळे राज्यात गोकुळाष्टमीच्या सोबतीने संत ज्ञानेश्वर यांची देखील जयंती साजरी केली जात आहे. पैठणच्या आपेगावमध्ये 11 व्या शतकात संत ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म झाला. (sant dnyaneshwar jayanti 2022 wishes messages hd images greetings to tribute him on his birth anniversary)
अधिक वाचा : मुलुखमैदानी तोफ गुलाबराव पाटलांना नीलम गोऱ्हेंनी सुनावलं
यंदा 19 ऑगस्ट रोजी ज्ञानेश्वर माऊलीची जयंती साजरी करण्यात येणार आहे. वडिल विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आई रुक्मिणीबाई यांच्या पोटी जन्माला आलेल्या संत ज्ञानेश्वरांना 3 भावंडं होती. संत निवृत्ती हे थोरले तर मुक्ताबाई आणि सोपानदेव ही धाकटी भावंडं होती. संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्य ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील 'ज्ञान' आणि साहित्य प्राकृत भाषेमध्ये आणले. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' मध्ये लिहला आहे. हाच ज्ञानेश्वरी ग्रंथ भावार्थदीपिका म्हणून देखील ओळखला जातो.
अधिक वाचा : बोटीवर AK-47 कुठून आले?, फडणवीस काहीच बोलले नाही!
तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा दुसरा ग्रंथ म्हणजे 'अनुभवामृत'. विशुद्ध तत्त्वज्ञान आणि जीव-ब्रह्म ऐक्याचा ग्रंथ म्हणून त्याची ओळख आहे. अवघ्या 21व्या वर्षी समाधी घेतलेल्या ज्ञानेश्वरांनी आपल्या अल्प आयुष्यामध्ये जगाला बहुमोहालाचा संदेश देणार्या रचना, साहित्य यांची निर्मिती केली. आज त्यांच्या जयंतीमिनित्त स्मृतीस वंदन करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी ही खास शुभेच्छापत्रं!
अधिक वाचा : फिफ्टी फिफ्टी चलो गुवाहाटी; विरोधकांची घोषणाबाजी
आज संत ज्ञानेश्वर यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्र WhatsApp,Facebook यांच्या माध्यमातून शेअर करून भागवत संप्रदयातील त्यांच्या अनुयायींचा दिवस खास बनवा.
Sant Dnyaneshwar Jayanti Wishes 2022 । Photo - Timesnow Marathi
Sant Dnyaneshwar Jayanti Wishes 2022 । Photo - Timesnow Marathi
संत ज्ञानेश्वर माऊली यांचे विचार:
1. देह हा रथ आहे. त्यातील इंद्रियं घोडे असून बुद्धी सारथी आहे आणि मन लगाम आहे. त्यामुळे केवळ देहाचे पोषण करणे हा आत्मघात आहे.
2. अशी कोणतीच गोष्ट नाही जी अभ्यासाने साध्य होणार नाही.
3. कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु:ख मिळणार आहे याची जाणीव ठेऊन, मी माझ्या आसपासच्या माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे.
4. माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्यावेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.
5. माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे हे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपुर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.