Sant Gadgebaba Jayanti 2023 Nibhandh in Marathi, मुंबई : आज 23 फेब्रुवारी राष्ट्रसंत थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती, मित्रांनो आज आपण गाडगेबाबा यांचे मराठीतून भाषण कसे करायचे याची माहिती करून घेणार आहोत. (Sant Gadgebaba Jayanti 2023 Bhashan in Marathi Bhashan Speech nibhandh PDF )
नमस्कार मित्रांनो आज 23 फेब्रुवारी राष्ट्रसंत थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती, मित्रांनो आज आपण गाडगेबाबा यांचे मराठीतून भाषण कसे करायचे याची माहिती करून घेणार आहोत. गाडगेबाबांविषयी तुम्हांला निबंध लिहायचा असेल तर ही माहिती नक्की उपयोगी पडणार आहे.
गाडगेबाबांच्या जयंती निमित्त आजच व्यासपीठावर जमलेल्या मा. मुख्याध्यापक, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला संत गाडगेबाबा यांच्या विषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती
भुकेलेल्यांना अन्न - तहानलेल्यांना पाणी, उघड्यानागड्यांना-वस्त्र , गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत, बेघरांना घर - अंध, अपंग रोगी यांना वैद्यकीय मदत , बेकारांना रोजगार - पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणींचे लग्न , दुःखी व निराशांना-हिंमत हाच खरा धर्म, अशी शिकवण देणारे संत गाडगे महाराज यांना सर्व प्रथम मी वंदन करतो /करते.
संत गाडगेबाबा यांचे मूळ नाव देविदास डेबूजी जानोरकर. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील शेणगाव गावात एका धोबी कुटुंबात झाला. मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरी येथे ते आपल्या आजोबांच्या घरी लहानाचे मोठे झाले. लहानपणीच त्यांना शेती आणि गुरांचा सांभाळ करण्यात रस होता. त्यांनी 1892 मध्ये लग्न केले आणि त्यांना तीन मुले झाली. त्यांच्या मुलीच्या नामकरण समारंभात, त्यांनी पारंपारिक मद्याऐवजी मिठाईसह शुद्ध शाकाहारी जेवण दिले. 1 फेब्रुवारी 1905 रोजी संत म्हणून आपले जीवन जगण्यासाठी आपले कुटुंब सोडण्यापूर्वी त्यांनी आपल्या गावात स्वयंसेवक म्हणून काम केले.
ते आपला ट्रेडमार्क झाडू घेऊन जात असे आणि टोपी घालत असे. जेव्हा ते गावात पोहोचायचे तेव्हा ते गावातील नाले आणि रस्ते स्वच्छ करायचे आणि गावकऱ्यांनी पैसे दिले तर ते समाजासाठी काहीतरी चांगले करण्यासाठी वापरायचे. गाडगे महाराजांनी मिळालेल्या पैशातून अनेक शैक्षणिक संस्था, धर्मशाळा, रुग्णालये, गुरांसाठी निवाऱ्यांची व्यवस्था सुरू केली . त्यांनी कीर्तनाचे वर्गही चालवले, बहुतेक कबिरांच्या दोह्यातून समाजाला नैतिकतेचे धडे मिळतात. त्यांनी लोकांना साधे जीवन जगावे, धार्मिक कारणांसाठी होणारी जनावरांची कत्तल थांबवावी आणि दारूबंदीविरोधात मोहीम राबवावी, असे आवाहन केले. त्यांनी कठोर परिश्रम, साधे जीवन आणि गरिबांची नि:स्वार्थ सेवा करण्याचा उपदेश केला. त्यांनी धार्मिक स्थळे आणि अनाथ आणि अपंगांसाठी धार्मिक शाळाही स्थापन केल्या. 20 डिसेंबर 1956 रोजी अमरावतीला जात असताना महाराजांचे निधन झाले.
कणकण करुनी कोटी केले,
कण न खर्चिला स्वहितासाठी,
वणवण फिरुनी कणकण झिजले,
बाबा दुःखी जनतेसाठी...
झाडूने परिसर आणि कीर्तनाने मनं साफ करणारे
संत गाडगे महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन
जय हिंद जय महाराष्ट्र
...........................
संत गाडगेबाबा जयंती 2023 : नमस्कार मित्रांनो आज आपण संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त भाषण, निबंध, कविता, शायरी आणि त्यांच्याविषयी माहिती घेणार आहोत.
संत गाडगेबाबा यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात मोठ्या आनंदात साजरी केली जाते. २७ फेब्रुवारी या दिवशी संपूर्ण शासकीय शाळांमध्ये विद्यार्थी भाषण,निबंध, कविता सादर करून संत गाडगेबाबा जयंती साजरी केली जाते. अशाप्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला पुढिल लेखात पहायला मिळेल.
“देव दगडात, देव नाही दगडात !
देव दाखविला तुम्ही,
माणसाच्या हृदयात ॥”
गाडगेबाबांच्या जयंती निमित्त आजच व्यासपीठावर जमलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष, मा. मुख्याध्यापक, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला संत गाडगेबाबा यांच्या विषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती
स्वातंत्र्यपूर्वीचा कालखंड, महाराष्ट्रामध्ये अंधश्रध्देचे साम्राज्य पसरलेले होते. साधेभोळे, अज्ञानी लोक देवळातील दगडाच्या देवाच्या मागे लागले होते. अशा वेळी या सामान्य माणसांना मनुष्याच्या हृदयातील देवाची ओळख करून देणाऱ्या महान संताचा जन्म महाराष्ट्रात झाला. असा हा माणसातील देव शोधणारा संत म्हणजे गाडगेबाबा होय.
संत गाडगे बाबां यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी विदर्भातील शेणगाव या गावी धोबी कुटुंबात झाला. त्यावेळी समाजावर अन्याय अत्याचारांचे डोंगर रचले जात होते. त्यातून दुःखाच्या नदया वाहत होत्या. अंधश्रध्देचे "थैमान माजले होते. मुक्या प्राण्यांचे बळी दिले जात होते. रक्ताचे पाट वाहत होते. माणसांचा चिखल होत होता. सावकार गरिबांच्या गळ्यात फास आवळत होते. हे सारे काही संत गाडगेबाबा यांना बघवले नाही आणि अखेर त्यांनी घराचा, संसाराचा त्याग केला आणि परिश्रमाचे व्रत स्विकारले.
सोडून सर्व घरदार, तोडले पाश मायेचे ।
अनवाणी फिरून पायी, अश्रू पुसले बहुजनांचे ॥
डोक्यावर झिंज्या, अंगावर चिंध्या, एका हाती खराटा, फुटक्या मडक्याच्या खापराचे भोजनपात्र असा संत गाडगेबाबांचा वेश होता. ज्या गावात संत गाडगेबाबा जात, ते गाव हाताती खराट्याने स्वच्छ करत आणि संध्याकाळी गावातील लोकांच्या मनातील घाण कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छ करत.
'हाती घेऊन खराटा
अवघ्या झाडल्या रे वाटा।
पुराणातील भाकडकथा संत गाडगे बाबांनी कीर्तनात कधीच सांगितल्या नाहीत. बाबांचे कीर्तन म्हणजे सर्वसामान्य माणसांना जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ होता.
संत गाडगेबाबा म्हणतात अडाणी राहू नका, पोरांना शाळेत पाठवा, सावकाराचे "कर्ज काढू नका, मुक्या प्राण्यांचा बळी देऊ नका. दगडा "च्या देवाची पूजा करू नका. देव दगडात नाही, अरे देव तर माणसांच्या हृदयात आहे. संत गाडगेबाबा यांचा हा उपदेश सामान्यांच्या जीवनाला दिशा देणारा होता. माणसाच्या हृदयातील देव शोधून दाखवणाऱ्या या संताने अंधश्रध्देला प्रखर विरोध केला.अनेक प्रसंगी स्वतः पुढाकर घेऊन सामान्य माणसांना अंधश्रध्देपासून परावृत्त करण्याचे काम गाडगेबाबांनी केले.
तहान भूकेची पर्वा न करता बहुजन समाजाची दुःख "स्थिती पहात, त्यांचे दुःख आपल्या हातांनी पुसण्यासाठी "अनवाणी पायांनी संत गाडगेबाबा वणवण भटकत राहिले. हातातील गाडग्यामुळे लोक त्यांना गाडगेबाबा म्हणत असे. एखाद्या गावात अंगावरील चिंध्यांमुळे चिंधेबाबा म्हणत तर विदर्भ आणि मराठवाड्यात वट्टीबाबा म्हणत. पण खऱ्या अर्थाने ते रंजल्या गांजलेल्यांचे बाबा होते.
संत गाडगेबाबा म्हणजे मानवतेचे पुजारी. माणसातील देव शोधणारे खरे आणि वीर बुद्धिवंत होते. मानवाची पूजा करणाऱ्या या थोर संताकडे पाहिले की, संत तुकारामांच्यात अभंगाची आठवण होते.
“जे का रंजले गांजले ।
त्यासी म्हणे जो आपुले ॥
तोचि साधू ओळखावा ।
देव तेथेचि जाणावा ॥"
संत गाडगे महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन
येवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो
जय हिंद जय भारत !