Gajanan Maharaj Prakat Din 2023 in Marathi : मुंबई : गजानन महाराज हे महाराष्ट्रातील महान संत होते. महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान त्यांच्यामुळे नावारूपाला आले आहे. गजानन महाराज हे भगवान गणेश यांचा अवतार मानले जातात. त्यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही, परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या वयाच्या 20 व्या वर्षी 1878 च्या फेब्रुवारी महिन्यात 23 तारखेला दिसले होते, त्यांचे अनुयायी ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरा करतात. तर ऋषीपंचमी हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात. (Sant gajanan maharaj prakatdin: What is the relationship between Gajanan Maharaj's death anniversary and Rishi Panchami)
श्री गजानन महाराज प्रकट झाल्यानंतर एकूण 32 वर्ष ते शेगावला राहिले. 8 सप्टेंबर 1910 रोजी संत गजानन महाराज यांनी समाधी घेतली होती. हा दिवस महाराजांचा पुण्यतिथी उत्सव म्हणून साजरा केला जातो. श्री गजानन महाराज अवतारी पुरुष असल्याने त्यांनी आपलं अवतारकार्य समाप्तीची सूचना आधीच भक्तांना दिली होती.
अधिक वाचा : मुलं मुलीला भेटल्यानंतर सर्वात आधी बघतात या गोष्टी
सन 1910 मध्ये आषाढी वारीच्या मुहूर्तावर महाराजांनी विठू माऊलीकडे अवतार कार्य पूर्ण करण्यासाठी आज्ञा मागितली. पुढे शेगावला आल्यानंतर भाद्रपद महिन्यातील गणेशचतुर्थीच्या दिवशी गजानन महाराजांनी सर्व भक्तांना एकत्र बोलावले व आपला विचार सर्व भक्तांना सांगून ऋषीपंचमीच्या दिवशी आपण हा देह त्याग करू असे सांगितले.
अधिक वाचा : Chanakya Niti डोक्यात ठेवली तर कधीच नाही बिघडणार आपला बजेट
1910 मध्ये समाधी घेतल्यानंतर तेव्हापासून दरवर्षी पुण्यतिथी सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. गजानन महाराज यांचे जीवन वर्णन करणारा ग्रंथ श्री. दासगणू महाराज यांनी लिहिला असून त्याचे नाव "श्री गजानन विजय असे आहे. या ग्रंथात महाराजांच्या आयुष्यातील अनेक आख्यायिका आणि ऐतिहासिक घटना वाचायला मिळतात.
गजानन महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर हे आवडते पदार्थ होते. कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन-चार दिवस उपाशी राहावे अशी त्यांची रीत होती. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्न भावाने त्याचेही ते सेवन करीत. गरीबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात. महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते . चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून ते खुलत असत. आजही महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वान्नांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात.
अधिक वाचा :जया किशोरीची Top 5 भजन, ज्यांना मिळालेत कोट्यवधीमध्ये व्ह्यूज
महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत. त्याचप्रमाणे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात. जेव्हा गजानन महाराजांना कळले की त्यांच्या अवतारसमाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे, त्यावेळी ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हणाले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषिपंचमीचा पुण्यदिनही ठरविला. समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले, "आम्ही आहोत येथे स्थित | तुम्हा सांभाळण्याप्रति सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||"
महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात गजानन महाराजांची समाधी आहे. दररोज सुमारे २५ ते ३० हजार लोक इथे दर्शनासाठी येतात. व्हीआयपींसाठी वेगळी काहीही व्यवस्था नसलेले हे भारतातले एकमेव समाधीस्थळ आहे. महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी इथे मोठी रांग लागते. मंदिराच्या परिसरात गजानन महाराजांच्या प्रतिमेशिवाय समाधीस्थळ, पादुका, महाराजांचा चिमटा, इतर वस्तू, चिलीम ओढण्याची जागा (जे आजही गरम असते) आणि प्राचीन हनुमान मंदिर आहे. असंख्य सेवक शिस्तबद्ध पद्धतीने मंदिराची व्यवस्था सांभाळतात.
गजानन महाराजांचे अनेक चमत्कार प्रसिद्ध आहेत. यापैकी काही तर त्यांच्या भक्तांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहेत. एकदा गजानन महाराजांना तहान लागली म्हणून त्यांनी भास्कर पाटील नामक व्यक्तीकडून पाणी मागितले. त्याने नकार दिला. तेव्हा महाराज बारा वर्षांपासून सुकलेल्या एका विहिरीकडे गेले आणि त्यांनी देवाचा जप केला. या सामर्थ्यामुळे विहीर आपोआप पाण्याने भरली.
रस्तामार्गे: शेगाव हे रस्त्यांनी भारतातल्या जवळपास सर्व मोठ्या शहरांशी जोडलेले आहे.
रेल्वेमार्गे: शेगावात रेल्वे स्टेशन आहे. हा मार्ग मुंबई-कोलकाता रेल्वेमार्गाशी जोडलेला आहे.
विमानमार्गे: इथून सर्वात जवळचा विमानतळ औरंगाबादला आहे जो शेगावपासून सुमारे १७० कि.मी.वर आहे.