Sant Namdev Punyatithi Images HD in Marathi : संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेअर अभिवादनपर संदेश

S ant Namdev Punyatithi Images HD in Marathi : आज नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे. नामदेव महाराजांनी संपूर्ण भारतात प्रवास करून भागवत धर्माचा प्रसार केला. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील ज्ञानदेववादी श्रेष्ठ संतकवींपैकी एक आहेत. त्यांचा जन्म २६  ऑक्टोबर १२७० रोजी झाला होता. १२९१ साली नामदेवांची ज्ञानेश्वरांची भेट झाली. गुरुशिवाय आपली भक्ती अधूरीच आहे अशी जाणीव त्यांना झाली. त्यानंतर नामदेव नागनाथ औंढा येथे गेले आणि विसोबा खेचर यांच्याकडून उपदेश घेतला आणि शिष्यत्व पत्करले.

Namdev Maharaj
नामदेव महाराज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे.
  • नामदेव महाराजांनी संपूर्ण भारतात प्रवास करून भागवत धर्माचा प्रसार केला.
  • संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील ज्ञानदेववादी श्रेष्ठ संतकवींपैकी एक आहेत.

Sant Namdev Punyatithi Images HD : मुंबई : आज नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे. नामदेव महाराजांनी संपूर्ण भारतात प्रवास करून भागवत धर्माचा प्रसार केला. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील ज्ञानदेववादी श्रेष्ठ संतकवींपैकी एक आहेत. (Sant Namdev Punyatithi Images share on facebook, instagram, twitter, whatsapp and other social media)

त्यांचा जन्म २६  ऑक्टोबर १२७० रोजी झाला होता. १२९१ साली नामदेवांची ज्ञानेश्वरांची भेट झाली. गुरुशिवाय आपली भक्ती अधूरीच आहे अशी जाणीव त्यांना झाली. त्यानंतर नामदेव नागनाथ औंढा येथे गेले आणि विसोबा खेचर यांच्याकडून उपदेश घेतला आणि शिष्यत्व पत्करले. नंतर नामदेव पंढरपुरात आले आणि त्यांनी तिथेच समाधी घेतली. नामदेवांनी ही घटना पाहिली. त्यानंतर नामदेव उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात भागवत धर्मप्रचारासाठी गेले. तब्बल ५३ वर्षे त्यांनी भारतात धर्मप्रसार केला. पंजाबमध्ये त्यांना बाबाजी म्हणून ओळखले जाते. इतकेच नाही तर नामदेवांची हिंदी भाषेतील ६१ पदे शिखांच्या ग्रंथसाहिब मध्ये नमूद आहेत. त्यानंतर ते महाराष्ट्रात परतले.

८० वय झाल्यानंतर त्यांनी हे जग सोडून जाण्याचा निर्धार केला. आषाढ शुद्ध एकादशी, १२७२ साली त्यांनी विठ्ठलापुढे आज्ञा द्यावी अशी विनंती केली. त्यानंतर आषाढ वद्य त्रयोदशीला पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात समाधी घेतली. विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार्‍या संतमहात्म्यांच्या पायाची धूळ आपल्या मस्तकी लागावी अशी त्यांची इच्छा होती. म्हणून मंदिराच्या महाद्वाराच्या पहिल्याच पायरीखाली त्यांचे समाधीस्थान तयार करण्यात आले होते. आज नामदेव महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांचे अभंग शेअर करून त्यांना अभिवादन करूया.


संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 

जाऊं म्हणतां पंढरी । यम थोर चिंता करी ॥१॥
धरितां पंढरीची वाट । पापें पळालीं सपाट ॥२॥
कळस देखतां नयनीं । होय पातकांची धुणी ॥३॥


संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 

वतन आमुची मिरासी पंढरी । विठोबाचे घरी नांदणूक ॥
सेवा करू नित्य नाचु महाद्वारीं । नामाची उजरी जागऊं तेथें ॥
साधुसंता शरण जाऊं मनोभावें । प्रसाद स्वभावे देती मज ॥
नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे । संत पाय हिरे देती वरी ॥
संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 
 

वैकुंठासी आम्हां नको धाडूं हरी । वास दे पंढरीं सर्वकाळ ॥१॥
वैकुंठ कोपत जुनाट झोंपटी । नको अडा अडी घालूं आह्मां ॥२॥
वैकुंठीं जाऊनि काय बा करावें । उगेंचि बैसावें मौनरूप ॥३॥
नामा म्हणे मज येथेंच हो ठेवीं । सदा वास देंई चरणांजवळी ॥४॥

संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 

पाय जोडूनि विटेवरी ।  कर ठेउनी कटावरी ॥१॥
रूप सांवळें सुंदर । कानीं कुंडलें मकराकार ॥२॥
गळां माळ वैजयंती । पुढें गोपाळ नाचती ॥३॥
गरुड सन्मुख उभा । म्हणे जनी धन्य शोभा ॥४॥
संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी