राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा

sant tukdoji maharaj jayanti 2022 tukdoji maharaj birth anniversary : तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे. ते राष्ट्रसंत म्हणून ओळखले जातात. अंधश्रद्धा निर्मूलन आणि जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला.

sant tukdoji maharaj jayanti 2022 tukdoji maharaj birth anniversary
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा 
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्म : ३० एप्रिल १९०९
  • तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला

sant tukdoji maharaj jayanti 2022 tukdoji maharaj birth anniversary :

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
जन्म : ३० एप्रिल १९०९
महानिर्वाण : ११ ऑक्टोबर १९६८

तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे. ते राष्ट्रसंत म्हणून ओळखले जातात. अंधश्रद्धा निर्मूलन आणि जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. त्यांनी माणसाने कसे वागावे बोलावे हे सांगण्यासाठी लिहिलेल्या ग्रामगीता आजही लोकप्रिय आहेत. ग्रामगीतेमध्ये गावांच्या विकासाची योजना सोप्या शब्दात मांडली आहे. त्यांनी मराठी आणि हिंदी भाषेत काव्यरचना केली. खंजिरी भजनांतून प्रबोधन केले.

आडकोजी महाराज हे तुकडोजींचे गुरू. गुरूंच्या सांगण्यावरून माणिक यांनी त्यांचे मूळ नाव बदलून तुकडोजी हे नवे नाव स्वीकारले. त्यांनी विदर्भात भरपूर संचार केला. विदर्भाप्रमाणेच महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये तसेच संपूर्ण देशात फिरून त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रबोधन केले. त्यांनी जपानमध्ये जाऊन विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. त्यांनी १९३५ मध्ये मोझरीत गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. 

इंग्रजांविरुद्धच्या १९४२च्या भारत छोडो आंदोलनात सहभागी झाल्यामुळे काही काळ ते अटकेत होते. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी रचलेले 'आते है नाथ हमारे' हे पद स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.

भारत हा खेड्यांचा देश असल्यामुळे देशातील खेड्यांचा विकास झाला तर संपूर्ण देशाचा विकास होईल, असे तुकडोजी महाराज नेहमी सांगायचे. समाजातील सर्वांच्या उद्धारासाठी ते आयुष्यभर झटत राहिले. महिलांची प्रगती व्हायला हवी, गावांचा विकास व्हावा यासाठी समाजात जनजागृती करण्याचे काम ते आपल्या काव्य रचनांमधून करत होते.

तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला. तरुण पिढीला बलोपासक आणि सुसंस्कृत होण्याचा संदेश दिला.

राष्ट्रपती भवनात झालेले तुकडोजी महाराजांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते. तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन कृष्ण पंचमी शके १८९० (३१ ऑक्टोबर, १९६८) रोजी झाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी