Shani maharaj aarati lyrics in Marathi: शनिची मराठी आरती, मंत्र आणि सूर्यग्रहण

आध्यात्म
Updated Dec 03, 2021 | 21:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

jai jai shri shanideva shanidevachi aarati : उद्या म्हणजेच 4 डिसेंबरला शनी अमावस्या आहे. शनिचा प्रकोप आपल्यावर होऊ नये यासाठी शनि देवाला अनन्यसाधारण महत्त्व पुराणात देण्यात आलंय. शनि देवाची कृपादृष्टी राहण्यासाठी ही आरती आणि मंत्र पठण नक्की करा.

Shani Dev Aarati in Marathi
शनिची मराठी आरती आणि मंत्र पठण  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पौराणिक ग्रंथात शनि अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व
  • उद्या शनि अमावस्या आणि सूर्यग्रहण
  • शनिची मराठी आरती, मंत्र आणि पठण


Shani Amavsya : उद्या म्हणजेच 4 डिसेंबरला शनी अमावस्या ( Shani Amavsya ) आहे. शनीचा प्रकोप आपल्यावर होऊ नये यासाठी शनि देवाला अनन्यसाधारण महत्त्व पुराणात देण्यात आलंय. पौराणिक धर्म ग्रंथांमध्ये शनिचा कर्म आणि न्याय देवता असाही उल्लेख केल्याचं पाहायला मिळतं. शनि देवाची कृपादृष्टी मानवाप्रमाणेच देवी देवतांवरही आहे.त्यामुळे त्यांना अनन्य साधारण महत्त्व देण्यात आलं आहे.

शनिवारी शनी देवाची मनोभावे पूजा केल्यास, त्याची आराधना केल्यास आपल्यावरील संकटं नष्ट होतात असा लोकांचाही समज आहे. आणि म्हणूनच दर शनिवारी भक्तगण शनी मंदिरात जावून शनी देवाची उपासना करतात.

तेल, उडीद, आणि रुईच्या फुलांचा हार शनी देवाला प्रिय आहे. आणि म्हणूनच हे अर्पण करून शनी देवाची मनोभावे पूजा केली जाते. यावेळी मार्गशीर्षातील सूर्यग्रहणाच्या दिवशीची शनी अमावस्या ( Shani Amavsya ) आहे. शुक्रवार ३ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ४ वाजून ५५ मिनिटांनी अमावस्या सुरू झाली असून शनिवार ४ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १ वाजून १२ मिनिटांनी संपेल. तसंच यंदाच्या वर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण शनिवार ४ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी ३ वाजून ७ मिनिटांनी संपेल. सूर्यग्रहणाचा जवळपास अर्धा वेळ अमावस्येदरम्यान येणार आहे. यामुळे सूर्यग्रहण आणि शनि प्रकोप हे दोन्ही त्रास होण्याची शक्यता आहे.
 आणि म्हणूनच शनि देवाची आरती करावी. (Shani maharaj aarati lyrics in Marathi)


शनि देवाची आरती

शनिदेवाच्या आरतीला विशेष महत्त्व आहे. केवळ अमावस्याच नाही तर नियमितपणे आरतीचं पठण करावं.


जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा


आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||


सुर्यसुता शनिमूर्ती | तुझी अगाध कीर्ति


एकमुखे काय वर्णू | शेषा न चले स्फुर्ती || जय || १ ||


नवग्रहांमाजी श्रेष्ठ | पराक्रम थोर तुझा

ज्यावरी
 कृपा करिसी | होय रंकाचा राजा || जय || २ ||


विक्रमासारिखा हो | शककरता पुण्यराशी


गर्व धरिता शिक्षा केली | बहु छळीयेले त्यासी || जय || ३ ||


शंकराच्या वरदाने | गर्व रावणाने केला


साडेसाती येता त्यासी | समूळ नाशासी नेला || जय || ४ ||


प्रत्यक्ष गुरुनाथ | चमत्कार दावियेला


नेऊनि शुळापाशी | पुन्हा सन्मान केला || जय || ५ ||


ऐसे गुण किती गाऊ | धणी न पुरे गातां


कृपा करि दिनांवरी | महाराजा समर्था || जय || ६ ||


दोन्ही कर जोडनियां | रुक्मालीन सदा पायी


प्रसाद हाची मागे | उदय काळ सौख्यदावी || जय || ७ ||


जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा


आरती ओवाळीतो | मनोभावे करुनी सेवा ||


शनि देवाचा मंत्र

'सूर्य पुत्रो दीर्घ देहो विशालाक्ष: शिव प्रिय:। मंदाचाराह प्रसन्नात्मा पीड़ां दहतु में शनि:।।' 

ईडा-पिडा टाळण्यासाठी आणि शनि देवाच्या कृपादृष्टीसाठी या मंत्राचे पठण करा. मंत्राचा १०८ वेळा जप करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी