पाहा लक्ष्मी पूजनासाठी कोणता आहे शुभ मुहूर्त 

आध्यात्म
Updated Oct 27, 2019 | 16:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

देशभरात जल्लोषात दिवाळी साजरी केली जात आहे. दरम्यान लक्ष्मी मातेचं पूजन नेमकं कोणत्या वेळी केलं गेलं पाहिजे हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे.  

see laxmi pujan vidhi and shubh muhurat diwali 2019
पाहा लक्ष्मी पूजनासाठी कोणता आहे शुभ मुहूर्त  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी केली जात आहे. दिवाळ सणामधील आज (रविवार) सर्वात मोठा दिवस आहे. कारण की, आज लक्ष्मीपूजन साजरी करण्यात येत आहे. आजच्या दिवशी धन, लक्ष्मी माता आणि गणपती बाप्पाची पूजा केली जाते. एवढंच नव्हे तर धनदेवता कुबेराची देखील पूजा केली जाते. असं मानलं जातं की, दिवाळीच्या दिवशी व्यापाऱ्यांचं देखील नवं वर्ष सुरु होतं. त्यामुळेच आजच्या दिवशी ते चोपडी पूजन करतात. 

आजच्या दिवशी व्यापारी आपली हिशोबाची वही बदलतात. पुजेआधी वहीच्या खात्यावर केसरयुक्त चंदनाने किंवा कुंकुने स्वस्तिक काढलं जातं. याच वही पूजनला चोपडी पूजन असं देखील म्हणतात. याच वेळी लक्ष्मीपूजन देखील केलं जातं. तर जाणून घ्या सगळ्या पूजेचा नेमका विधी आणि मुहूर्त. 

पूजेचा शुभ मुहूर्त कोणता: 

प्रदोष काल: संध्याकाळी ५.३० ते ८.१६ वाजेपर्यंत
शुभ काल: संध्याकाळी ७.०८ ते रात्री ८.४६ वाजेपर्यंत 
अमृत काल: रात्री ८.४६ ते १०.२३ वाजेपर्यंत 

लक्ष्मी पूजनचा विधी: 

पूजेच्या स्थळावर नवग्रह यंत्र ठेवा. त्यावर सोन्याचं किंवा चांदीचं नाणं किंवा काही पैसे ठेवा. त्यानंतर गणेश आणि लक्ष्मीची मूर्ती ठेऊन त्याला दूध, दही आणि गंगाजल याने स्नान घालावं. त्यानंतर मूर्ती फुलांनी सजवावी. त्यानंतर मूर्तीच्या उजव्या बाजूला तुपाचा किंवा तेलाचा पंचमुखी दिवा लावून पूजा संपन्न करावी. 

चोपडी पूजनाचा विधी: 

चोपडी पूजन हे नेहमी शुभ मुहूर्तावर केलं गेलं पाहिजे. पूजा सुरु करण्याआधी वहीवर स्वस्तिक आणि श्री गणेशाय नम: असं लिहावं. यासोबतच एक नवी कापडी पिशवी घेऊन त्यात पाच हळकुंड, अक्षता, दुर्गा, धणे आणि दक्षिणा ठेवावी. त्या पिशवीवर देखील स्वस्तिकाचं चिन्ह काढून सरस्वती आईचं स्मरण करावं. त्यानंतर सरस्वती आणि लक्ष्मी मातेचं ध्यान करुन वहीवर गंध, पुष्प अर्पण करावं. त्यानंतर धूप, दिवा याने पूजन करावं. त्यानंतर नैवेद्य दाखविण्यात यावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
पाहा लक्ष्मी पूजनासाठी कोणता आहे शुभ मुहूर्त  Description: देशभरात जल्लोषात दिवाळी साजरी केली जात आहे. दरम्यान लक्ष्मी मातेचं पूजन नेमकं कोणत्या वेळी केलं गेलं पाहिजे हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे.  
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola