Shakambhari Purnima 2023: शाकंभरी पौर्णिमा : पौराणिक कथा, शाकंभरी देवीची आरती आणि शाकंभरी देवी चालीसा

Shakambhari Purnima 2023:Shakambhari Devi Mythological Story, Aarti and Chalisa : नव्या वर्षातली पहिली पौर्णिमा शुक्रवार 6 जानेवारी 2023 रोजी आहे. ही पौष  महिन्यातील पौर्णिमा तसेच नव्या वर्षातील पहिली पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असेही म्हणतात. शाकंभरी या देवीच्या नावाने ही पौर्णिमा ओळखली जाते. 

Shakambhari Purnima 2023
शाकंभरी पौर्णिमा : पौराणिक कथा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • शाकंभरी पौर्णिमा : पौराणिक कथा
  • शाकंभरी देवीची आरती
  • शाकंभरी देवी चालीसा

Shakambhari Purnima or Shakambhari Poornima : Mythology, Mythological Story of Shakambhari Devi, Shakambhari Devi Aarti and Shakambhari Devi Chalisa, Paush Purnima 2023, Shakambhari Purnima 2023, Shakambhari Poornima 2023 : नव्या वर्षातली पहिली पौर्णिमा शुक्रवार 6 जानेवारी 2023 रोजी आहे. ही पौष  महिन्यातील पौर्णिमा तसेच नव्या वर्षातील पहिली पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असेही म्हणतात. शाकंभरी या देवीच्या नावाने ही पौर्णिमा ओळखली जाते. 

शाकंभरी देवी ही दुर्गा देवीचा अवतार समजली जाते. दुर्गा देवीचे रक्तदंतिका, भीमा, भ्रामरी, शताक्षी आणि शाकंभरी हे अवतार प्रसिद्ध आहेत. 

शाकंभरी पौर्णिमा : पौराणिक कथा

शाकंभरी देवी बाबतच्या प्रसिद्ध पौराणिक कथेनुसार पृथ्वीवर दुर्गम नावाच्या दैत्याने (राक्षस किंवा असूर) दहशत निर्माण केली होती. पाऊस पडत नव्हता. कोरडा दुष्काळ पडल्यामुळे अन्नपाण्याअभावी अनेकांचा तडफडून मृत्यू होत होता. पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा विनाश होत होता. या अशा बिकट परिस्थितीत दुर्गम दैत्याने ब्रह्मदेवाकडून वेद चोरले. वेदांची चोरी होताच आदिशक्ति माता दुर्गा देवी शाकंभरी देवीच्या रुपात प्रकटली. 

शाकंभरी देवीच्या शरीरावर 100 डोळे होते. देवीने पृथ्वीवर अवतार घेताच रडायला सुरुवात केली. देवीच्या सर्व डोळ्यांतून अश्रू रुपाने पाणी वाहू लागले. या पाण्याने पृथ्वीवरच्या जल प्रवाहांमध्ये भरपूर पाणी आले. दुष्काळ दूर झाला. यानंतर देवीने दुर्गम दैत्याचा अंत केला. या घटनेची आठवण म्हणून पृथ्वीवर शाकंभरी पौर्णिमा साजरी करतात. 

दुसऱ्या एका कथेनुसार शाकुंभरा अर्थात शाकंभरीने पृथ्वीवर एका कोरड्या निस्तेज ठिकाणी थांबून सलग 100 वर्षे कठोर तपस्या केली. तपश्चर्येच्या काळात तीन महिन्यातून एकदा जागा बदलून ती जवळच्या ठिकाणी जायची आणि शाकाहारी भोजन करुन यायची. ज्या वेळी तपश्चर्या फळाला आली त्यावेळी शाकंभरी ज्या ठिकाणी तपस्या करत होती त्या ठिकाणी वनराई निर्माण झाली होती. तपश्चर्या फळाला आली त्याचवेळी पृथ्वीवरचा एक समुदाय अन्न शोधत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाच्या दिशेने जात होता. या समुदायात साधू महंत पण होते. सर्वांनी शाकंभरीच्या तपस्येमुळे निर्माण झालेल्या वनराईत विश्रांती घेतली आणि शाकाहरी अन्न ग्रहण केले. प्रदीर्घ काळानंतर सर्वांना उत्तम अन्न मिळाले होते. या घटनेची आठवण म्हणून पृथ्वीवर शाकंभरी पौर्णिमा साजरी करतात. 

श्री शाकंभरी देवीची आरती

शताक्षी, बनशंकरी, चामुंडा काली दुर्गम, शुंभ निशुंभा स्वर्गी धाडियली येतां भक्ता संकट धावुनी ही आली दु:खे नाशुनि सकला सुखी ठेविली ॥१॥

जयदेवी जयदेवी जय शाकंभरी ललिते अज्ञ बालकावरी त्वा कृपा करी माते ॥धृ॥

मधुकैटभ, महिषासुर मातले फार दुर्गारूपाने शिवालिक पर्वते दानव संहार शक्ती तुझी महिमा आहे अपार म्हणूनि वंदन करिती ब्रह्मादिक थोर ॥२॥

अवर्षणाने जग हे झाले हैराण अन्नपाण्याविना झाले दारूण शरिरातुनि भाज्या केलिस उत्पन्न खा‌ऊ घालुनि प्रजा केलीस पालन ॥३॥

चंडमुंडादिक भैरव उद्धरिले भानू ब्राह्मणासी चक्षु त्वा दिधले नृपपद्माचे त्वा वंश वाढविले अगाध लीला माते करून दाखविले ॥४॥

पाहुनी माते तुजला मन होते शांत मी पण् उरे न काही मानव हृदयात प्रसन्न चित्ते राही तुझ्या क्षेत्रात ब्रह्मानंदी निमग्न होतो तुझा भक्त ॥५॥

वसंत प्रार्थी शंकरी शाकंभरी तुजसी आलो शरण तुला मी आशिष दे मजसी अखंड सेवा घडु दे इच्छा उरी ऐसी अंती सद्गती द्यावे मम या जीवासी ॥६॥

शाकंभरी देवीची चालीसा - हिंदी

दोहा
 
दाहिने भीमा ब्रामरी अपनी छवि दिखाए। 
बाईं ओर सतची नेत्रों को चैन दीवलए। 
भूर देव महारानी के सेवक पहरेदार। 
मां शकुंभारी देवी की जाग मई जे जे कार।।
 
चौपाई
 
जे जे श्री शकुंभारी माता। हर कोई तुमको सिष नवता।।
गणपति सदा पास मई रहते। विघन ओर बढ़ा हर लेते।।
हनुमान पास बलसाली। अगया टुंरी कभी ना ताली।।
मुनि वियास ने कही कहानी। देवी भागवत कथा बखनी।।
छवि आपकी बड़ी निराली। बढ़ा अपने पर ले डाली।।
अखियो मई आ जाता पानी। एसी किरपा करी भवानी।।
रुरू डेतिए ने धीयां लगाया। वार मई सुंदर पुत्रा था पाया।।
दुर्गम नाम पड़ा था उसका। अच्छा कर्म नहीं था जिसका।।
बचपन से था वो अभिमानी। करता रहता था मनमानी।।
योवां की जब पाई अवस्था। सारी तोड़ी धर्म वेवस्था।।
सोचा एक दिन वेद छुपा लूं। हर ब्रममद को दास बना लूं।।
देवी-देवता घबरागे। मेरी सरण मई ही आएगे।।
विष्णु शिव को छोड़ा उसने। ब्रह्माजी को धीयया उसने।।
भोजन छोड़ा फल ना खाया। वायु पीकेर आनंद पाया।।
जब ब्रहाम्मा का दर्शन पाया। संत भाव हो वचन सुनाया।।
चारो वेद भक्ति मई चाहू। महिमा मई जिनकी फेलौ।।
ब्ड ब्रहाम्मा वार दे डाला। चारों वेद को उसने संभाला।।
पाई उसने अमर निसनी। हुआ प्रसन्न पाकर अभिमानी।।
जैसे ही वार पाकर आया। अपना असली रूप दिखाया।।
धर्म धूवजा को लगा मिटाने। अपनी शक्ति लगा बड़ाने।।
बिना वेद ऋषि मुनि थे डोले। पृथ्वी खाने लगी हिचकोले।।
अंबार ने बरसाए शोले। सब त्राहि-त्राहि थे बोले।।
सागर नदी का सूखा पानी। कला दल-दल कहे कहानी।।
पत्ते बी झड़कर गिरते थे। पासु ओर पाक्सी मरते थे।।
सूरज पतन जलती जाए। पीने का जल कोई ना पाए।।
चंदा ने सीतलता छोड़ी। समाए ने भी मर्यादा तोड़ी।।
सभी डिसाए थे मतियाली। बिखर गई पूज की तली।।
बिना वेद सब ब्रहाम्मद रोए। दुर्बल निर्धन दुख मई खोए।।
बिना ग्रंथ के कैसे पूजन। तड़प रहा था सबका ही मान।।
दुखी देवता धीयां लगाया। विनती सुन प्रगती महामाया।।
मा ने अधभूत दर्श दिखाया। सब नेत्रों से जल बरसाया।।
हर अंग से झरना बहाया। सतची सूभ नाम धराया।।
एक हाथ मई अन्न भरा था। फल भी दूजे हाथ धारा था।।
तीसरे हाथ मई तीर धार लिया। चोथे हाथ मई धनुष कर लिया।।
दुर्गम रक्चाश को फिर मारा। इस भूमि का भार उतरा।।
नदियों को कर दिया समंदर। लगे फूल-फल बाग के अंदर।।
हारे-भरे खेत लहराई। वेद ससत्रा सारे लोटाय।।
मंदिरो मई गूंजी सांख वाडी। हर्षित हुए मुनि जान पड़ी।।
अन्न-धन साक को देने वाली। सकंभारी देवी बलसाली।।
नो दिन खड़ी रही महारानी। सहारनपुर जंगल मई निसनी।।

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी