Shani Amavasya 2023: हिंदू धर्मात प्रत्येक सण-उत्सव, पौर्णिमा, अमावस्येला विशेष महत्त्व असते. ज्यावेळी अमावस्या शनिवारी येते तेव्हा त्या अमावस्येला शनी अमावस्या किंवा शनिश्चर्य अमावस्या (Shanishchari Amavasya) असे म्हणतात. 2023 मधील पिहील अमावस्या शनिवारी म्हणजेच 21 जानेवारी रोजी आहे. ही पौष अमावस्या (Paush Amavasya) असून याला दर्श अमावस्या (Darsh Amavasya) असेही म्हणतात. शनी अमावस्येला शनीदेवाची विशेष पद्धतीने पूजा-अर्चना करण्यात येते. (Shani Amavasya 2023 Sun Rise Time Pune Thane Nagpur Nashik mumbai paush amavasya daan importance in marathi)
21 जानेवारी 2023 रोजी शनी कुंभ राशीत असल्याने एक विशेष संयोग बनत आहे आणि त्यासोबतच 4 इतरही शुभ योग बनत आहेत. यामुळेच शनी अमावस्येचं महत्त्व आणखी वाढलं आहे. जाणून ग्या 2023 मधील शनी अमावस्येचा शुभ मुहूर्त, तिथी, योग, पूजा मुहूर्त आणि सूर्योदयाची वेळ.
हे पण वाचा : मुलांची उंची वाढण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश
हिंदू पंचांगानुसार, पौष महिन्याची अमावस्या तिथी 21 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजून 17 मिनिटांनी सुरू होत आहे. म्हणजेच दर्श अमावस्या, पौष अमावस्येचा प्रारंभ सकाळी 6.17 वाजता होत आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 जानेवारी 2023 रोजी पहाटे 2.23 वाजता अमावस्या समाप्ती होत आहे. यामुळे शनी अमावस्या 21 जानेवारी असणार आहे. शनी अमावस्येला गंगा स्नान, दान आणि शनी देवाची पूजा या सर्वांना विशेष महत्त्व आहे. शनी देवाची पूजा करण्यासाठी संध्याकाळचा काळ उत्तम आहे.
हे पण वाचा : नॉर्मल डिलिव्हरीसाठी जबरदस्त उपाय, सिझेरियनला करा बायबाय
शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची विधीवत पूजा करणे शुभ मानले जाते. याच्यासोबतच अमावस्येच्या दिवशी स्नान, दान करणे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी काही उपाय केल्यास काल सर्प दोष आणि शनी साडेसाती, शनी ढैय्या पासून मुक्ती मिळू शकते.
हे पण वाचा : व्हाईट ब्रेड ठरू शकतो घातक, जास्त खाल्ल्यास आरोग्य धोक्यात
शहराचे नाव (Maharashtra Important Cities) | सूर्योदयाची वेळ (21st January 2023 Sun Rise Time in Maharashtra's various Cities) | चंद्रोदयाची वेळ (21st January 2023 Moon Rise Time in Maharashtra's various Cities) |
मुंबई | 07.14 | 06.23 |
ठाणे | 07.14 | 06.23 |
पुणे | 07.09 | 06.20 |
रत्नागिरी | 07.09 | 06.25 |
कोल्हापूर | 07.05 | 06.22 |
सातारा | 07.08 | 06.21 |
नाशिक | 07.12 | 06.18 |
जळगाव | 07.07 | 06.09 |
वर्धा | 06.54 | 05.58 |
यवतमाळ | 06.55 | 06.00 |
बीड | 07.03 | 06.12 |
सांगली | 07.04 | 06.20 |
सोलापूर | 07.00 | 06.13 |
नागपूर | 06.53 | 05.55 |
अमरावती | 06.58 | 06.01 |
अकोला | 07.00 | 06.04 |
औरंगाबाद | 07.06 | 06.12 |
भुसावळ | 07.06 | 06.08 |
परभणी | 06.59 | 06.07 |
बुलढाणा | 07.03 | 06.08 |
मालवण | 07.07 | 06.26 |
बेळगाव | 07.03 | 06.22 |