Shani Amavasya 2023 : शास्त्रात शनि अमावस्येला खूप महत्त्व आहे. जेव्हा अमावस्या ही शनिवारी येत असते तेव्हा त्याला शनिश्चरी अमावस्या (Shani Amavasya) म्हणतात. ही अमावस्या (Amavasya) पौष महिन्यातील तिसऱ्या शनिवारी येत आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा-अर्चा (Worship) केली जाते. या अमावस्येला एक खास योग जुळून येत आहे. शनिदेव हे कुंभ राशीत असल्याने एक दुर्मिळ योग निर्माण होत आहे. यामुळे या अमावस्येला पूजा विधी (Pooja vidhi) कशी केली पाहिजे. गंगा स्नानाचे काय महत्त्व आहे. शुभ मूर्हूत काय आहे हे सांगणार आहोत. (Shani Amavasya 2023:Daan Time,Ganga Snan Time,Shubh Muhurat,Vrat Katha, Shubh Muhurat,Significance)
अधिक वाचा : मोदींनी फुंकले BMC निवडणुकीचे रणशिंग
वैदिक पंचांगानुसार या वेळी अमावस्या 21 जानेवारी सकाळी 6 वाजून 16 मिनीटानंतर सुरू होणार आहे. अमावस्येचा काळ 22 जानेवारी सकाळी 2 वाजून 21 मिनीटापर्यंत राहणार आहे. उदय तिथीनुसार, अमावस्या 21 जानेवारीला असणार असेल. शनिदेवाची पूजा शुभ मुर्हूत सांयकाळी 6 ते 7.30 मिनीटापर्यंत असेल.
पंचांगानुसार यावेळी शनिश्चरी अमावस्येला खाप्पर योग, चतुग्रही योग, षडाष्टक योग आणि संसप्तक योग तयार होत आहेत. यासोबतच शनिदेवही त्यांच्या मूळ त्रिकोणी कुंभ राशीत असतील.
गंगास्नान हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्नान मानले जाते. गंगा आणि इतर नद्यांमध्ये स्नान करण्याचे पावित्र्य समुद्रमंथनाशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुासर, जेव्हा देव आणि दानवांनी समुद्र मंथन केलं होतं. या समुद्र मंथनातून अमृत कलश निघाले होते. ते घेण्यासाठी देव आणि दैत्यांमध्ये युद्धे होऊ लागली. अप्सराच्या रुपात आलेल्या भगवान विष्णू यांनी ते कलश त्यांच्यापासून हिसाकावून तेथून पळ काढला.
अधिक वाचा : शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या मुलाचा हवेत गोळीबार
ते पाहून सर्व दैत्य अप्सरारुपी विष्णूच्या पाठीमागे लागले. तेव्हा त्या कलशातून अमृताचे काही थेंब प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन, आणि नाशिक येथे पडली आणि येथील नद्या पवित्र झाल्या.. तेव्हापासून येथील नद्यांमध्ये आंघोळ करणे किंवा स्नान करणं पुण्याचं मानलं जातं. या पाण्यात स्नान केल्यास आपले पापं आणि आजार पळून जात असल्याचं म्हटलं जातं. याचमुळे या गंगा महत्त्वाचं मानलं जातं.
अधिक वाचा : Guru Pradosh Vrat Katha: गुरुवार प्रदोष व्रत कथा मराठीत वाचा
या दिवशी संध्याकाळी शनि मंदिरात जाऊन शनि देवाच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यासोबतच शनीच्या मूर्तीवर मोहरीचे तेल अर्पण करावे. त्याचबरोबर शनिदेवाच्या शनि चालिसा आणि बीज मंत्राचा जप करावा.
तर या दिवशी काळी घोंगडी, काळे शूज, काळे तीळ, काळे उडीद दान करण्यास ते उत्तम मानले जाते. सत्याचबरोबर ज्या लोकांना शनि साडेसती किंवा धैयाचा त्रास होत असेल त्यांनी या दिवशी शनिदेवाच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली चार तोंडी दिवा लावावा. तसेच शनी महाराजांना मोहरीच्या तेलाने अभिषेक करा. भाविकांनी असे केल्याने त्यांना शनिदोषापासून मुक्ती मिळू शकते.