shani amavasya and solar eclipse । सूर्यग्रहणाच्या दिवशी शनि अमावस्या, साडे साती असणाऱ्यांनी करा हे उपाय

shani amavasya and surya grahan यंदाच्या वर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण शनिवार ४ डिसेंबर २०२१ रोजी आहे. याच दिवशी शनि अमावस्या आहे. यामुळे त्रास होऊ नये म्हणून काही सोपे उपाय करता येतील. 

shani amavasya and surya grahan
सूर्यग्रहणाच्या दिवशी शनि अमावस्या, त्रास टाळण्यासाठी 'हे' करा 
थोडं पण कामाचं
  • सूर्यग्रहणाच्या दिवशी शनि अमावस्या, त्रास टाळण्यासाठी 'हे' करा
  • सूर्यग्रहणाला ज्योतिषशास्त्रानुसार अशुभ समजतात
  • शनि अमावस्या आणि सूर्यग्रहण असा दुर्मिळ योग असेल तर हा जास्त अशुभ काळ समजतात

shani amavasya 2021 marathi । नवी दिल्ली: यंदाच्या वर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण (Solar Eclips) शनिवार ४ डिसेंबर २०२१ रोजी आहे. याच दिवशी शनि अमावस्या (shani amavasya) आहे. शनि अमावस्या आणि सूर्यग्रहण हे दोन्ही योग एकाच दिवशी येणे ही अतिशय दुर्मिळ बाब आहे. पण दुर्मिळ योग यंदा ४ डिसेंबर (4 December )रोजी आहे. यामुळे त्रास होऊ नये म्हणून काही सोपे उपाय करता येतील. 

मार्गशीर्षातील सूर्यग्रहणाच्या दिवशीची अमावस्या यंदा शुक्रवार ३ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ४ वाजून ५५ मिनिटांनी सुरू होईल आणि शनिवार ४ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १ वाजून १२ मिनिटांनी संपेल. तर यंदाच्या वर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण शनिवार ४ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी ३ वाजून ७ मिनिटांनी संपेल. सूर्यग्रहणाचा जवळपास अर्धा वेळ अमावस्येदरम्यान येणार आहे. यामुळे सूर्यग्रहण आणि शनि प्रकोप हे दोन्ही त्रास होण्याची शक्यता आहे.

हे त्रास टाळण्यासाठी 'सूर्य पुत्रो दीर्घ देहो विशालाक्ष: शिव प्रिय:। मंदाचाराह प्रसन्नात्मा पीड़ां दहतु में शनि:।।' या मंत्राचे पठण करा. मंत्राचा १०८ वेळा जप करा. यामुळे लाभ होईल.

सूर्यग्रहणाला ज्योतिषशास्त्रानुसार अशुभ समजतात. शनि अमावस्या आणि सूर्यग्रहण असा दुर्मिळ योग असेल तर हा जास्त अशुभ काळ समजतात. यामुळे या कालावधीत कोणतेही शुभकार्य करणे टाळा. प्रवास करणे, महत्त्वाची कामे करणे या कालावधीत टाळा. इष्ट देवतेचे नामस्मरण करा. ग्रहण काळात खरेदी-विक्रीचे व्यवहार टाळा. ग्रहण काळात धारदार वस्तू खरेदी करणे टाळा. ग्रहण काळात काळ्या रंगाच्या वस्तूंचे दान करा. पण ग्रहण काळात काळ्या रंगाच्या वस्तूची खरेदी टाळा.

ग्रहण काळात स्वयंपाक करणे, खाणे टाळा. ग्रहण सुरू होण्याआधी तयार केलेल्या पदार्थ आणि पेयांमध्ये तुळशीचे एक-एक पान टाकून ठेवा आणि ग्रहण संपल्यानंतर ते पदार्थ खा. गरोदर महिलांनी ग्रहण काळात आराम करावा, घराबाहेर पडणे टाळावे.

ज्योतिषशास्त्र, शुभअशुभ यावर विश्वास नसल्यास उपाय करण्याचे बंधन नाही. कोणता उपाय करावा आणि कोणता नाही हा विश्वासाचा, श्रद्धेचा विषय आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी